धार्मिक

श्रवणातील कोणत्याही वारी आपण महादेवांच्या मंदिरात जाऊन नंदीच्या कानात बोला हे २ शब्द, सर्व इच्छा होतील पूर्ण.

नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे शिवशंकरांचा अतिशय प्रिय असा महिना. आणि आपण पाहिले असेल कि बऱ्याचश्या शिवमंदिरात नंदी देवाच्या कानात अनेक लोक काही तरी सांगताना दिसतात त्यांच्या मनातील इच्छा असतील त्यांच्या जीवनातील चालू असलेले प्रॉब्लेम्स असतील आणि नंदीदेव ह्या सर्व इच्छा समस्या ह्या महादेवांपर्यंत नक्की पोहचवतात. मित्रांनो अगदी प्राचीन काळापासून हि परंपरा चालत आलेली आहे तुम्ही भगवान नंदीदेव त्या ठिकाणी असतातच.

भगवान नंदी हे शिवशंकराचे भक्त आहे. भगवान शिव शंकर हे नेहमी तपस्या करत असतात, समाधीन असतात म्हणून का आपले काही मागणे असेल तर ते आपण भगवान शंकरांसमोर मांडायचे असेल तर हे नंदी देव आपली मदत करतात. आपली इच्छा ते शिवशंकरांकडे पोहचवतात. मित्रांनो आजच्या लेखात आपण असे दोन शब्द पाहणार आहोत कि जे आपण नंदीदेवांच्या कानात सांगायचे आहेत.

मित्रांनो हे दोन शब्द आपण सांगितल्यानंतर आपण आपली इच्छा त्यांना सांगायची आहे आणि हे सर्व आपण त्यांच्या उजव्या कानात सांगायचे आहे. लक्षात असूद्यात के आपण हे सर्व सांगणे आपण नंदी देवांच्या उजव्या कानात बोलायचे आहे. नंदीदेव हे खरं तर शिवांचे अवतार आहेत त्याबद्दलची कथा देखील खूप रंजक आहे एकदा शिलार नावाचे एक ऋषी होऊन गेले त्यांना कोणतेही अपत्य होत नव्हते म्हणून त्यांचा वंश हा नष्ट होण्याची वेळ अली होती. त्यांच्या पूर्वजांनी त्यांना साक्षात्कार दिला व त्यांना सांगितले कि तुम्ही भगवान शंकरांची पूजा करा.

त्यानंतर त्यांनी तपस्या केली व त्यांनी शिवशंकरणाकडे त्यांनी असे मागणे मागितले कि त्यांना एक अनियोजित व मृत्यूहीन अश्या प्रकारचे संतान प्राप्त व्हावे. एके दिवशी शेलार ऋषी आपल्या शेतात काही तरी काम करत होते, आणि तेव्हा त्यांना तिथे एक बालक आढळला त्यांनी त्या बालकाचा स्वीकार केला आणि त्यांनी त्याचे नाव नंदी असे ठेवले. काही दिवसांनंतर त्या ठिकाणी मित्रा व वरून नावाचे ऋषी आले व त्या ऋषींनी शिलाद ऋषींना सांगितले कि हे बालक अल्पआयु असणार आहे म्हणजे जास्त काळ जगणार नाही.

हे ऐकून त्यांना खूप दुःख झाले, आपल्या वडिलांना दुखी झालेलं पाहून नंदीदेवानी भगवान शंकरांकडे प्रार्थना केली, त्यावेळी भगवान शंकर नंदीवर प्रसन्न झाले आणि शिवशंकरानी त्यांना विचारले तू तर माझाच अंश आहे तर तुला मृत्यूचे भय कसले. तुला मृत्यूचे भय बाळगण्याचे काहीही कारण नाही. त्यावेळी भगवान शिवशणकरांनी आशीर्वाद दिला कि आजपासून तू माझा प्रमुख गण असशील. आणि मी तुझा वाहन म्हणून स्वीकार करत आहे. मित्रांनो आजही भगवान शिवशंकर विविध ठिकाणी स्वार होऊन विविध ठिकाणी जात असतात. आपल्या भक्तांचे कल्याण करत असतात.

मित्रांनो भगवान असे नंदीदेव जे शिवशणकरांचा अवतार आहे असे हे नंदीदेव त्यांच्या कानात आपण जे काही बोलू त्या सर्व इच्छा ते भगवान शिव शंकराणपर्यंत नक्की पोहचवतात मित्रांनो ज्या ज्या वेळी आपण शिवमंदिरात जाल त्यावेळी आपण सर्वप्रथम नंदीचे दर्शन अवश्य घ्या. त्यानंतर आपण त्यांच्या चरणांवर फुले अवश्य अर्पण करा त्यानंतर आपण त्यांच्या समोर एक दिवा अवश्य प्रज्वलित करा. त्यानंतर त्यांचे दर्शन घ्या व त्यानंतर त्यांच्या उजव्या कानात आपण हे दोन शब्द बोला ते शब्द आहेत, हरी ओम हे दोन शब्द बोल्यानंतर आपली जी काही समस्या आहे जे काही इच्छा मागणे असेल ते आपण त्यांच्या कानात बोलून द्या.

हे आपले सांगणे हे नंदीदेव भगवान शंकरांकडे नक्की पोहचवतात, मित्रांनो श्रावण महिना हा शिवशंकरांचा प्रिय महिना आहे म्हणून ह्या श्रावण महिन्यात तुम्ही अगदी कोणत्याही दिवशी हा उपाय आपण करू शकता. महादेवांची ह्या महिन्यात केलेली पूजा नक्की फलदायी ठरते त्यात कोणीही संकोच घेण्याचे काहीही कारण नाही. तर मित्रांनो आजचा लेख आवडला असेल तर लाइक व शेयर नक्की करा.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट