लाईफस्टाईल

श्री कृष्णांनी सांगितलेले हे ४ उपदेश तुमचे आयुष्य बदलून टाकतील नक्की वाचा.

नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या वेबसाइट वरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ज्या वेळी महाभारतात अर्जुन जेव्हा नैराश्य मध्ये गेला होता त्याला काय करावे सुचत नव्हते त्याला आपल्या नातेवाईकांना युद्धामध्ये पाहून काय करावे सुचत नव्हते त्याचे हात पाय गळाले होते तेव्हा श्री कृष्णांनी त्याला भगवत गीता सांगून त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला दिली होती. अर्जुनाची जी अवस्था त्या वेळी झाली होती त्याप्रमाणेच आपली सुद्धा अवस्था काही वेळा त्याच्यासारखीच अवस्था होऊन जाते.

आपल्याला सुद्धा आयुष्यात खूप वेळा असे होते कि काय करावे सुचत नाही टेन्शन कसे दूर करावे, सततची काळजी, योग्य निर्णय कसे घ्यावा, आत्मविश्वास कसा वाढवावा, मृत्यूची भीती कशी घालवावी अश्या सर्व प्रश्नांवर श्री कृष्णांनी उत्तरे दिली आहेत आणि आपण आजच्या लेखात ह्याबद्दल जाणून घेणार आहोत.
निर्णय कसा घ्यावा कृष्णांनी सांगितल्याप्रमाणे सहाव्या अध्यायात ३५ श्लोकामध्ये ते अर्जुनाला सांगतात, चंचल मनाला संयमित करणे निःसंशय अत्यंत कठीण आहे. पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे म्हणजेच आयुष्यात कोणत्याही ठिकाणी स्पष्टता पाहिजे असेल तर कोणत्याही ठिकाणी शांत आणि संयम ठेवणे गरजेचे आहे. चंचल आणि घाईगडबडीने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता असते. पण मनाला वषमध्ये करणे खूप गरजेचे असते त्याला कष्ट घ्यावे लागतात त्याला ध्यानधारणा कष्ट अभ्यास करावा लागतो. इथे अभ्यास म्हणजे चांगल्या गोष्टींचे चिंतन वाचन व श्रवण करणे होय.

जेव्हा आपण हे करतो तेव्हाच आपले मन स्थिर होते आणि आपण योग्य ते निर्णय घेऊ शकतो. दुसरा म्हणजे टेन्शन काळजी कशी दूर करावी. कृष्ण दुसऱ्या अध्यायात ४७ व्या श्लोकात सांगतात कि तुला कर्म म्हणजे काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु त्याच्या फळावर तुझा अजिबात अधिकार नाही. त्यामुळे परिणामांचा विचार न करता आपले पूर्ण लक्ष हे कामावर ठेवणे गरजेचे आहे.

मित्रांनो आपण जे काही करतो ते आपण काही तरी मिळवण्यासाठी करतो पैसे, बंगला, गाडी वगरे हे करणे चुकीचे नाही परंतु आपण परिणामांना इतके चिकटून घेतलेले असते कि आपल्या डोक्यात तेच चाललेलं असते कि माझ्याकडे एवढे पैसे आले कि मी हे घेईन. आणि इथेच सर्व टेन्शन ला सुरुवात होते कारण ह्या सर्वांचे मूळ आहे अपेक्षा. आणि ती पूर्ण झाली नाही कि दुःख होते, म्हणून श्री कृष्ण सांगतात कि तुझ्या हातात फक्त कर्म करणे आहे बाकी तुझ्या हातात काही नाही. त्यामुळे परिणामांचा विचार न करता काम करत राहा.

तिसरा प्रश्न म्हणजे आत्मविश्वास निर्माण कसा करावा. श्री कृष्ण १७ व्या अध्यायात २८ व्या श्लोकात सांगतात कि श्रद्धेविना कोणतेही केलेलं काम मग ते दान असेल त्याग असेल तपस्या असेल किंवा अजून कोणतेही काम असेल त्या कामावर विश्वास नसेल तर ते काम व्यर्थ आहे. त्या कामाला काहीच अर्थ नाही म्हणजे काय मित्रांनो कोणतेही काम करताना तुमची त्यावर श्रद्धा असायला हवी. विश्वास असायला हवी. जेव्हा आपण विश्वासाने एखादे काम करतो तेव्हा ते सफल होतेच.

चौथा प्रश्न आहे यशस्वी कसे व्ह्याचे कृष्ण तिसऱ्या अध्यात २१ व्या श्लोकात सांगतात, श्रेष्ठ व्यक्ती जे काही करते त्याचे अनुयन सामान्य व्यक्ती करते, आपल्या कामांनी जे काही आदर्श ती व्यक्ती घालून देते तसे सर्व व्यक्ती त्याचे अनुसरण करतात म्हणजेच कोणत्याही क्षेत्रात असाल आणि तुम्हाला त्यात यशस्वी होईचे असेल तर जेव्हा तुम्ही तुमच्या मनात मला माझ्या क्षेत्रात टॉप ला जायचं आहे असे विचार करचाल तेव्हा तुमचे प्रयत्न देखील त्याच दिशेने पाऊले घेतात तुमच्या मार्गात कितीही संकटे अली तरी तुम्ही त्याला घाबरत नाही मार्ग काढतात व यशस्वी होतातच.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट