श्री स्वामी समर्थ महाराजांचे पत्र
धार्मिक

श्री स्वामी समर्थ महाराजांचे पत्र, प्रेत्येक स्वामी भक्ताने एकदा तरी नक्की वाचा.

नमस्कार मित्रानो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.तर मित्रांनो स्वामी समर्थ महाराज असे पत्र लिहतात की,
माझ्या प्रिय भक्ता,

ज्यावेळेस तू सकाळी उठलास व मी तुझ्या अंथरुणापाशीच उभा होतो. वाटलं होत कि तू माझ्याशी काहीतरी बोलशील काल झालेल्या घटनांविषयी ज्या तुझ्या आयुष्यात काल झाल्या होत्या त्याबद्दल काही तरी सांगशील पण तू उठल्यास तुझं सर्व आवरलास आणि चाहा प्यायला, पेपर वाचलास कशीतरी अंघोळ केली आणि कपडे घालून डबा घेऊन तू ऑफिस ला गेलास माझ्याकडे तू नुसते पाहिलं देखील नाही मला वाटलं होत कि अंघोळ केल्यावर तरी तू माझा कडे पाहशील पण असं काई झालं नाही. ऑफिस ला जाताना ट्रेन पकडली वाटलं आता तरी बोलशील पन पेपर वाचून मोबाइल वर गेम खेळात बसला होता. मी मात्र तिथेच उभा होतो तुझ्याजवळ मी तुला सांगणार होतो की दिवसभरातील काही वेळ माझ्यासोबत घालवून पहा तुझी कामे आणखी चांगली कशी होतील ह्याची काळज़ी मी घेईन पण तू माझ्याशी बोलत नाही. मध्ये ऐक क्षण असा आला होता की खुडचीवर तू एकटाच बसला होता.
पूर्ण १५ मिनटे गेली पण त्यावेळीदेखील सुद्धा तुला माझी आठवण नाही आली दुपारच्या जेवणाच्या वेळेला तू हिकडे तिकडे पाहत होता वाटलं माझी आठवण काढशील पण असं काई झालं नाही दिवसामध्ये खूप वेळ वाचला होता ह्या वेळेत ही आपलं बोलणं होईल असं वाटलं होत पण तू घरी आला जेवण सुद्धा झालं म्हणलं आता मोकळा झालास पन नाही तू नंतर टीव्ही लावून बसला. मग तू आपल्या बायका मुलांना शुभरात्री म्हणाला मी तुझ्या बाजूलाच होतो. तू दमलास व झोपी गेला मला वाटलं होत कि आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात थोडास बोलावं तुझ्याशी काई तरी तुझं ऐकावं काही माझ्याकडून सांगावं काही मार्गदर्शन करावं तुला कि ह्या भूमीवर कशासाठी आलाय आणी कोणत्या कामात व्यस्त झालाय पण तुला वेळच नाही मिळाला मी मात्र मनातल्या मनात विचार करत होतो कि कधी एकदा तुला वेळ काढता येईल माझ्यासाठी मी खूप प्रेम करतो रे तुझ्यावर रोज वाटत मला की कधीतरी तू माझाशी बोलशील तुझ्या जीवनात काही ज्या चांगल्या घटना घडत आहे त्याबद्द धन्यवाद म्हणशील पण तू केव्हा येतो माझ्याकडे जेव्हा तुला माझ्याकडून काही तरी हवे असते ते तुला मिळाले कि रीतसर नेहमीप्रमाणे सर्व विसरून जातोस तू तुझ्या लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे असते आणि मला पूर्णपणे विसरून जातो. ठीक आहे काही हरकत नाही मला विश्वास आहे तू पुन्हा बोलशील माझाशी. मला विश्वास आहे आज नाही तर उद्या तरी नक्की आठवण काढशील माझी.

तुझेच स्वामी.

मित्रानो ह्या पत्रातून आपल्याला असं समजलं असेल की आपले स्वामी भक्तीभावाचे भुकेलेले आहेत श्री स्वामींनी जो उपदेश केला त्यात स्वामींनी सांगितले होते की तू माझी अनन्य भावाने सेवा कर मी तुझा योगस्थ स्वतः चालवेल. एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्या माझा ठिकाणी अप्राप्त च्या ठिकाणी प्राप्ती आणि प्राप्त वस्तूंचे सवरक्षण मी स्वतः करत असतो. म्हणून मित्रानो श्री स्वामी समर्थांचे नित्य स्मरण करा कारण स्वामी नामाचे स्मरण म्हणजे
परमेश्वराचे स्मरण म्हणुनच आज देखील स्वामी महाराज आपल्या सोबतच आहेत आपले स्वामी महाराज म्हणजे हाक मारताच भक्तासाठी अवतरणारे परमेश्वर आहेत. श्री स्वामींचा आजही चैतन्य स्वरूपात वास आहे. स्वामी नेहमी सोबतच असतात. श्री स्वामी समर्थ… !! तर मित्रानो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट