धार्मिक

शुक्रवारच्या दिवशी करा हा एक उपाय, माता लक्ष्मीची कृपा कायम राहील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो माता लक्ष्मीचा मनोभावे पूजा करण्याचा दिवस म्हणजे शुक्रवार. शुक्रवारावर शुक्र ग्रहाचा प्रचंड असर असतो. माता लक्ष्मींनप्रमाणे माता काली व दैत्य शुक्राचार्य यांची खूप लोक ह्या दिवशी पूजा करतात. तंत्र मंत्र करू इच्छता ते लोक माता कालीची उपासना करतात. मित्रांनो शुक्रवारचा व्रत ठेवल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान बनतो आणि परिणामी आपल्या जीवनात धन दौलत यांचे आगमन होते ह्या ना त्या मार्गे आपल्याकडे धन येऊ लागते. शुक्रवारच्या दिवशी काही कार्य काही कामे आपण चुकून देखील करू नयेत कारण हि कामे केल्यास आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह कमजोर होतो. सोबतच माता लक्षमी अशे कार्य केल्यास घरातून निघून जाण्याची शक्यता असते तर चला तर जाणून घेण्यात अशी ती कोणती कामे आहेत.

शुक्रवारच्या दिवशी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात काही तरी अशुभ घडत आहे आपल्या मार्गात संकटे येत असतील तर आपण ह्या दिवशी आंबट गोष्टींचा त्याग करावा. आंबट पदार्थ खाऊ नका. हे तुम्ही केले तर आपल्या जीवनामध्ये जे काही अशुभ घडत आहे ते सर्व कमी होऊ लागेल.

शुक्रवारच्या दिवशी आपण पश्चिम दिशेला प्रवास टाळावा आणि जर आपले काही महत्वाचे काम ह्या पश्चिम दिशेला असेल तर तुम्ही ह्या दिशेला जाणे टाळा कारण तुमचे काम ह्या दिवशी असफल होणार. पश्चिमेकडे दिशाशूल असतो शुक्रवारच्या दिवशी तसेच दक्षिण आणि नैऋत्य ह्या दिशा देखील प्रवासासाठी चंगल्या नाहीयेत. जर तुम्हाला काही अगदी महत्वाचे काम असेल तर जव असते त्या जवाचे दाणे आपण चावून आपण प्रवास करू शकता.

शुक्रवारच्या दिवशी आपल्याकडून कोणत्याही महिलेचा अपमान होणार नाही काही आपण अशब्द बोलणार नाही याची काळजी घ्यावी कारण शुक्रवार हा माता लक्षमीचा वार आणि ह्या दिवशी आपण जर चुकून जर महिलेचा अपमान किंवा अनादर केला तर आपण माता लक्ष्मीला अप्रसन्न करण्याचे काम करत आहात. शुक्रवारच्या दिवसच नव्हे तर इतर कोणत्याही दिवशी आपण स्त्रीचा अपमान करता काम नये ज्या घरात स्त्रीला मन सम्मान असतो त्या घरात लक्ष्मी आपोआप येत असते.

आता माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी ह्या शुक्रवारच्या दिवशी आपण लाल रंगाचं चंदन आपल्या माथी नक्की लावाव त्यामुळे आपल्याकडे धन खेचले जाते. ह्यादिवशी पूर्व, उत्तर, आणि ईशान्य ह्या ३ अश्या दिशा आहेत ह्या दिशेला आपण आपल्या एखाद्या महत्वाच्या कामासाठी आपण प्रवास केला तर तर ती कामे सफल होतातच. ह्या दिवशी आपण वस्त्र, आभूषणे, चांदी, तसेच नवीन गाडी घ्याची असेल तर तुम्ही ह्यादिवशी खरेदी करू शकता हे सर्व खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ असतो.

सुखांचा उपभोग घेण्यासाठी हा दिवस सर्वात जास्त चांगला दिवस आहे. मित्रांनो आपण सकाळी स्नान करण्यापूर्वी आपण पाण्यामध्ये फिटकरी म्हणजे तुरटी अवश्य टाका व आपल्या शरीरावर अत्तर देखील शिंपडावे अंघोळ झाल्यावर हे माता लक्ष्मीस प्रसन्न करतात. अनेकांचा ह्यावरती विश्वास बसणार नाही पण तुम्ही लागतार काही शुक्रवार हे उपाय करत चला आपल्यला फरक नक्की जाणवेल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट