बातम्या

माईने पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आजच्या दिवसातील सर्वात दुःखाची व सर्वाना धक्का पोहचवणारी बातमी आहे ती म्हणजे माईच्या निधनाची. सिंधुताई सपकाळ, अनाथांची माई अश्या अनेक नावांनी ओळखली जाणारी माई ह्या गेल्या काही दिवसांपासून गॅलेक्सी रुग्णालयात होत्या त्यांचे काही दिवसांपूर्वी हर्निया चे ऑपेरेशन झाले होते. ह्यानंतर त्यांना पुन्हा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती नाजूक होती.

काळ संध्याकाळी ४ जानेवारी दिवशी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झाले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती खालवल्याबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना बोलावले होते त्यांच्या सर्व तब्बेतेची माहिती त्यांना दिली होती. सिंधुताई सपकाळ ह्यांनी वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईनी महाराष्ट्रात अनाथश्रम स्थापन केले, तिथल्या मुलांना अन्न, शिक्षण, निवारा उपलब्ध करून दिला. आणि अश्या माई निघून गेल्यामुळे त्यांची लेकरं हि पोरकी झाली आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येतीये.

सिंधुताई सपकाळ ह्यांचा अल्पपरिचय:

अनाथांची माय अशी जगभर ओळख, सिंधुताई सपकाळ ह्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७, वर्धा जिल्ह्यातील नवरगाव हे त्यांचे मूळ गाव. सिंधुताई यांचा जन्म झाल्यानंतर त्या नको होत्या म्हणून त्यांचं नाव चिंधी असं ठेवण्यात आलेलं. विवाह त्यांचा अगदी कमी वयात ९ वय असताना झाल्ता आणि २६ वर्ष मोठे असलेल्या श्री हरी सपकाळ ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

अठराव्या वर्षांपरेंत त्यांची तीन बाळंतपणे झालेली होती. चौथ्यांदा गर्भवती असताना त्यांनी पहिला संघर्ष पहिला. तिथून त्या घराबाहेर पडल्या आणि तिथून मग आपण त्यांचा इतिहास पहिला. त्यांनी समाजसेवेमध्ये आपले सर्व आयुष्य झोकले त्यांना त्यांच्या कार्यासाठी २०२१ साली पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार तसेच अहिल्याबाई होळकर पुरस्कार अश्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. पुणे विद्यापीठाचा गौरव जीवन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला होता. सिंधुताई सपकाळ ह्यांच्या जीवनाच्या आधारावर मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाची देखील निर्मिती झाली. अनाथांची यशोदा ह्या नावाचा अनुबोधपट १६ फेब्रुवारी २०१४ साली प्रदर्शनीत झालेला.

हे पण वाचा :-  मकरसंक्रांत साजरी करा ह्या पद्धतीने.

अश्या थोर सिंधुताई सपकाळ ह्यांचे निधनाची बातमी ऐकल्यानंतर सर्व महाराष्ट्र शोकाकुळ झालेला आहे. त्यांना कॉफीविथस्टोरी कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.