नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ज्यांच्या डोक्यावर प्रचंड प्रमाणात कर्ज झाले असेल आणि ते आपल्यला चुकवणे शक्य होत नसेल तर अश्या वेळी सर्व झाडामध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष म्हणजे वडाचे झाड. स्कन्ध पुराण असे सांगते कि वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महाराजांची पूजा आपल्याला मोठ्यातील मोठ्या कर्जातून मुक्ती प्रदान करते. अगदी कितीही मोठे कर्ज असले तरी ह्या उपायामुळे आपले कर्ज फिटले जाते. हा उपाय आपण सोमवारच्या दिवशी करता येतो. सलग येणारे ३ सोमवार ज्या लोकांच्या माथी कर्ज आहे त्यांनी हा उपाय करावा ज्यामुळे त्यांची कर्जातून मुक्ती होते.
हा उपाय करण्यासाठी एक तांब्या स्वछ जल म्हणजेच पाणी आणि हो हा तांब्या हा तांब्याच्या धातूपासून बनलेला असावा. तर असे तांब्याच्या तांब्यात तांब्याभर जल आपण घ्यावे व यात थोडेसे तांदूळ जे कि त्यात टाकण्याआधी आपण थोडा वेळ भिजू घालावेत. त्यानंतर त्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकावी. या वस्तू आपण ह्या तांब्याच्या ताब्यातील पाण्यात टाकायच्या आहेत आणि हे पाणी कोणत्याही वडाच्या झाडाला त्याच्या बुंध्याशी वडाच्या खोडाला हे जल आपण मनोभावे अर्पण करायचे आहे.
हे जल अर्पण करताना आपण बटकेश्वर महादेवांचे स्मरण आपण करायचे आहे. आणि हे जल अर्पण करून झाल्यानंतर हात जोडून आपली जी समस्या आहे कर्जमुक्तीची. त्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपण त्या झाडाखाली बसून ओम नमः शिवाय ! ह्या महामंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. महिलांनी नमः शिवाय असा १०८ वेळा जप करावा.
हा ३ सोमवार आपण सलग उपाय करायचा आहे आणि हो तिसऱ्या सोमवारी हा उपाय करून घरात परत येताना ह्या वडाच्या झाडाची पारंबी किंवा मुळी आपण घरात आणायची आहे. घरात आणल्यानंतर एका सुती धाग्यामध्ये हि पारंबी आपण घट्ट बांधायची आहे आणि ती आपण गळ्यात धारण करायची आहे. गळ्यात धारण करणे शक्य नसेल तर आपण आपल्या पर्स किंवा पॉकेट मध्ये ठेवा जेणेकरून हि पारंबी आपल्या जवळ असेल २४ तास ह्याची काळजी घ्या.
मित्रांनो हि मुळी आपण सलग ३ महिने आपल्या सोबत ठेवायची आहे. असे म्हणतात कि स्कन्ध पुराणात असे सांगितले आहे कि हि जी मुळे आहेत ह्या पारंबी मध्ये बटकेश्वर महाराजांचा वास असतो आणि हि मुळी आपल्या जवळ सातत्याने ठेवल्याने ह्या ना त्या मार्गे आपल्याला ह्या कर्जातून मुक्ती मिळवून देते.
आपल्याकडे कोणत्याही मार्गाने पैसा येऊ लागतो आपला आर्थिक स्थर उंचावतो. अतिशय सोपा अन छोटा उपाय आहे आपण नक्की करून पहा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




