धार्मिक

सोमवारी करा ह्या वस्तूंचे दान जीवनात कितीही खराब वेळ चालू असुद्या, दुर्भाग्य दूर होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो शिवमहापुराणानुसार सोमवारच्या दिवशी ह्या वस्तूंचे दान अवश्य करा. जीवनातून दुर्भाग्य दूर होईल, म्हणजेच जर तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नसेल तुमची कामे होतात होता राहत असतील.

तुमच्या जीवनात काही त्रास असे एखादे दुःख असेल कि ज्यातून मुक्ती मिळत नाहीए तुम्ही हा त्रास इतर कोणासोबत वाटू शकत नाही सांगू शकत नाही तर अश्या वेळी मित्रांनो हे सर्व त्रास, दुःख दूर करण्यासाठी आणि नशिबाची साथ प्राप्त करण्यासाठी आपण ह्या वस्तूंचे दान अवश्य करा.

मित्रांनो हे दान धर्म तर कराच कारण ह्याचे हिंदुधर्मशास्त्रात फार महत्व सांगितलेले आहे. तुम्हाला महाराज बली, महाधुरंधर कर्ण आणि राजा हरिश्चंद्र तुम्हाला माहित असतील हे सर्वात मोठे दाणी व्यक्ती होऊन गेलेत. असे म्हणले जाते कि आपण एकादी गोष्ट दान केली कि आपल्याला त्या वस्तू १०० पटीने परत भेटत असतात. म्हणजेच आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते.

मित्रांनो आपण ह्या वस्तूंचे दान ह्या सोमवारी कराच परंतु ह्या दिवशी महादेवांना आपण शरण जा. तुमच्या हातून कळत नकळत जी काही पाप, पुण्य घडली आहेत त्याबाबत तुम्ही त्यांना शरण जा. आणि दुःख कष्ट करण्याची प्रार्थना करा.

मित्रांनो सोमवारी गोष्टी दान करायची आहे त्यातील पहिली गोष्ट आहे, मीठ जर मोठे मीठ असेल तर अति उत्तम नसेल तर साधे मीठ असते त्याचे दान केले तरी चालेल. मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट हे मीठ आपण आपल्या हातात घेऊन कधीही दाना करू नका.

तुम्ही ज्या भांड्यात मीठ टाकले आहे ते भांडे खाली ठेवा आणि समोरच्याला ते मीठ त्यातून घेण्यास विनंती करा. आपल्या हातातून कधीही मीठ देऊ नये कारण लक्ष्मी जाण्याचा धोका असतो. ज्यांच्या जीवनात गरिबी आहे अश्या व्यक्तींनी ह्या मिठाचे दान अवश्य करा गरिबी निघून जाईल.

हे पण वाचा :-  ही एक वस्तू वर्षभर ठेवा गणपती बाप्पांच्या समोर पैसा कधी कमी पडणार नाही.

दुसरी गोष्ट आहे गूळ ज्या घरात २ व्यक्तींमध्ये सतत वादविवाद होत असतील एकमेकांशी पटत नसेल तर. तर अश्या वेळी नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी आपण सोमवारी ह्या गुळाचे दान अवश्य करा. ह्या दिवशी आपण गोमातेला आपण ह्या दिवशी गूळ व भाकरी किंवा चपाती खाऊ घातली तर मित्रांनो आपल्याला धनप्राप्तीचे नवनवीन योग निर्माण होतात.

तिसरी वस्तू आहे तूप ज्यांच्या घरात सतत रोगराई असते सतत कोणी ना कोणी आजारी असते. अश्या वेळी आजारपण दूर करण्यासाठी आपण सोमवारच्या दिवशी तुपाचे दान अवश्य करा. जी आजारी व्यक्ती आहे त्याने ह्या तुपाच्या भांड्यास स्पर्श करावा आणि असे हे तूप आपण गोरगरिबाला दान करावे आपल्याला आजारापासून मुक्ती मिळते.

मित्रांनो चौथी वस्तू आहे ते म्हणजे तीळ हे दोन प्रकारचे असतात काळे आणि पांढरे तीळ ज्यांच्या जीवनात शनीची साडेसाठी चालू आहे, शनीची अंतर्दशा महादशा चालू आहे अश्या प्रकारचे कोणतेही शनीचे दोष दूर करण्यासाठी आपण शनिवारी काळ्या तिळांचे दान करावे. सोबतच हे काळे तीळ आपण शिवलिंगावरती देखील हे काळे तीळ अर्पण करू शकता.

आणि सोमवारच्या दिवशी आपण पांढऱ्या तिळांचे दान करा, त्यामुळे आपल्या आत्मविश्वास वाढतो. तुमच्याकडे बुद्धी भरपूर आहे पण ज्यावेळी एखाद्यसमोर प्रेसँटेशन करण्याची वेळ येते तेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तर हा आत्मविश्वास वाढवण्याकरिता ह्या तिळांचे दान फार महत्वाचे आहे.

मित्रांनो पाचवी गोष्ट आहे कपडे, सोमवारच्या दिवशी आपण कपड्याचे दान केल्याने आपल्याला दीर्घायुषयची प्राप्ती होते. लक्षात घ्या कोणतेही दान करताना आपण कोणतेतरी खूप काही मोठं करत आहोत अशी भावना मनात अनु नये, दान हे निस्वार्थ भावनेने करावे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

हे पण वाचा :-  घरातील मुख्य दरवाजाजवळ ठेवा हि एक वस्तू , गरिबी निघून जाईल

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.