धार्मिक

३० मे २०२२ सोमवार ह्या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करा हे सोपे उपाय.

सोमवारी जी अमावस्या येते तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. ह्या सोमवारी येणाऱ्या अमावस्याला खूप महत्व आहे, शास्त्रात आणि उपासनेच्या दृष्टीने देखील . ह्या दिवशी काही छोटे उपाय केले तर ह्या दिवशी खूप सारे लाभ आपल्याला मिळू शकतात अश्याच काही उपायांबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. मित्रांनो सोमवती अमावस्याच्या दिवशी खंडोबाचे भक्त आवर्जून त्यांच्या दर्शनासाठी जातात. पाल, जेजुरी ह्या ठिकाणी असंख्य भक्त दर्शनासाठी जमतात.

मित्रांनो ह्यावर्षी जी सोमवती अमावस्या येणार आहे तिची सुरवात दुपारी २ नंतर होणार आहे, तसेच सोमवती अमावस्याची समाप्ती हि सोमवारी संध्यकाळी ५ वाजता होईल. ह्या दिवशी आपल्याला काही उपासना आराधना करायची आहे ती ५ वाजूपर्यंत आपण करायची आहे. आपल्याला व्यवसायात काही अडचनी येत असतील काही आपल्या इच्छा असतील त्या जर पूर्ण होत नसतील घरातही काही अडचणी असतील तर ह्या दिवशी महादेवांची उपासना व आराधना करावी असे सांगतिले जाते.

सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. आपल्या जवळपास असलेल्या महादेवांच्या मंदिरात जवून आपण उपासना करायची आहे महादेवांना दुधाने किंवा पाण्याने अभिषेख करावा तसेच बेलपत्र अर्पण करून महादेवांना कमीत कमी १ माळ जप करावा, जर शक्य असेल तर ५ किंवा ११ माळी जप आपण करू शकता. महादेवांचा जप म्हणजे ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे.

सुख समृद्धी आणि आरोग्य चांगले प्राप्त होण्यासाठी महादेवांची उपासना करताना आपण आपल्या कुलदेवतेची आराधना व नामःस्मरण आपण करायचे आहे. ज्या मुलामुलींची लग्न जमण्यात अडचणी येत असतील त्यांनी ह्यादिवसापासून ते लग्न जमेपर्यन्त एक माळ जप अवश्य करा. मुलांच्या कल्याणासाठी पालकांनी शिवलीलाअमृतातील ११ वा अध्याय नक्की वाचावा. तसेच घरात जर आपल्या सतत कोणी तर आजारी पडत असेल तर त्यांनी घरात मृत्युंजय मंत्र अवश्य ऐकावा तसेच त्याचे पठण देखील करावे.

ज्या व्यक्तींना सतत आर्थिक अडचणी येत असतात, व्यवसायात प्रगती होत नसते, अश्या लोकांनी महालक्ष्मीअष्टकाचा पाठ आपण शिवमंत्रासोबत आपण अवश्य करावा. ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत पितृदोष आहे त्यांनी ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ११ वेळा प्रदिक्षणा घालून नमस्कार करून तप्रार्थना करायची आहे कि आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळू दे म्हणून. ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी श्री मार्तंड भैरवाय ह्या मंत्राचा जप आपण करायचा आहे.

सोमवती अमावस्याला ह्या दिवशी ज्यांना महादेवांच्या मंदिरात जाणे शक्य नसेल त्यांनी ह्या दिवशी घरात महादेवांच्या पिंडीसमोर किंवा फोटोसमोर बसून जप केला तरी चालेल. ह्या दिवशी अन्नदान वस्त्रदान केल्याने देखील खूप मोठे फायदे होतात. तर मित्रांनो तुम्ही देखील महादेवांचे भक्त असाल तर कॉमेंट मध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की लिहा, तसेच जर लेख जर आवडला असेल तर लाइक करून तो शेयर देखील करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. ह्यामागील कोणती अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट