घरातील स्त्री हि घरातील लक्ष्मी असते. तिला आपण गृह लक्ष्मी असे म्हणतो. सकाळी लवकर उठून ते तरी झोपे पर्यंत काम ती करत असते. छोट्या छोट्या गोष्टी कडे लक्ष देत असते. प्रत्येका कडे ती लक्ष देऊन काम करत असते. घरातील प्रत्येकाच्या कामाला ती मदत करत असते. त्यामुळे घरातील कर्त्या पुरुषाला आपल्या कामात लक्ष देता येते.
ज्या कामात घरातील कर्ता पुरुष पूर्ण क्षमतेने काम करतो त्या घरात माता लक्ष्मीचे योग्य प्रकारे आगमन होत असते. त्या घरात कधीच आर्थिक समस्या जाणवत नाही. एखादे काम घरातील पुरुष हाती घेतो ते पूर्ण करण्याची त्यात ताकत येऊन जाते. कारण त्या मागे घरातील गृह लक्ष्मीचा हात असतो. आणि त्यामुळे घरात धन संपत्ती यांचे आगमन सतत होत असते.
त्याच उलट जर का घरातील स्त्री ही आनंदी नसेल तसेच घरात नेहमी काही ना काही सतत वाद विवाद होत असेल. घरात जो करता पुरुष आहे त्याच्या कामात सतत अडचणी येत असतील. तर त्या कर्त्या पुरुषाचे आपल्या कामात मन लागत नाही आणि त्यामुळे कोणतेही काम असो ते पूर्ण होत नाही. आणि त्या घरात आर्थिक निर्माण होत जातात. प्रगतीचे मार्ग दिसून येत नाही.
काही घरामध्ये स्त्री या आनंदी नसतात. त्याना आपण दुःखी असल्याच्या सतत भावना येत असतात. त्यातून बाहेर येण्यासाठी एक छोटीशी ओवी तुम्हला सागत आहोत. ही ओवी आपण रोज सकाळी काम करताना किंवा स्वयंपाक करताना त्याचा उच्चर जर का केला तर तिचे परिणाम संपूर्ण घरावर होते. त्यामुळे घरातील वातावरण सुद्धा आनंदी आणि प्रसन्न मय तयार होते.
ज्या ओवी बद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत त्या श्री राम याना समर्पित आहेत. हि ओवी बोल्यानंतर आपल्याला श्री रामचे स्मरण झाल्याशिवाय रहाणार नाही. हि ओवी जर का तुम्ही स्वयंपाक करताना बोललात तर त्याचे खुप मोठ्या प्रमाणत लाभ मिळतात. तसेच कोणतेही काम आपण हातात घेतले तर ते पूर्ण करण्याची आपली मनाची तयारी होते. तसेच प्रत्येक कामात आपले मन रमते ते काम करण्याचा आनंद आपल्या येत जातो.
छोटीशी ओवी आहे. पण खुप मोठा अर्थ सांगून जाते. ही ओवी अशी आहे. ” जिन्हके कपट, दम्भ नहिं माया, तिन्हके ह्रदय वसहु रघुराया।.” या ओवीचा अर्थ असा आहे. ज्या व्यक्तीचा मनात राग नाही कोणाचे वाईट झाले पाहिजे असे कपट मानत नाही. अशांच्या हृदया मध्ये स्वयं श्री प्रभुराम असतात. ज्या व्यक्तीला श्री प्रभू आपल्या मनात असावे असे वाटत असेल तर काही गोष्टीचे पालन अवश्य करावे.
त्यापैकी काही वाईट गोष्टी आहेत त्या सोडून दिल्या पाहिजे. दुसऱ्याची निदा करणे सोडून दिले पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीचा तिरस्कार करणे सोडून दिले पाहिजे. दुसऱ्यांची चुगली करणे या सारख्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. मोह माया या सारख्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. ज्या व्यक्तीच्या मनात परमेश्वर असतात त्यांचे मन प्रेमळ आणि स्वच्छ असते.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




