उशी खाली रात्री तुळशीचे पाने ठेऊन झोप, Sleep with basil leaves at night
लाईफस्टाईल

सकाळी अंघोळ झाल्यानंतर बोला हा एक मंत्र, दिवस मंगलमय जाईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो आजच्या दैनंदिन जीवनातील आपली कामे पार पाडण्यासाठी आपण आजच्या लेखात काही दैनंदिन टिप्स आपण देणार आहोत, आम्हाला अशा आहे कि ह्या टिप्स तुम्हाला तुमचे जीवन सुखी व समृद्ध बनवण्यास मदत करतील. एखाद्या दिवशी आपल्याला उदास वाटते किंवा कंटाळवाणं वाटते. आणि कामामध्ये मन लागत नाही, परंतु काम तर करावेच लागते अश्या वेळी ओम चैतन्य गोरक्ष नाथय नमः ! ह्या मंत्राचा सकाळी अंघोळीनंतर जप करा, तुमच्या जीवनात खूप सकारात्मक बदल होईल.

जीवनातील उदासीता निघून जाते, कामामध्ये मन रमु लागते. मित्रांनो जर तुमचे खूप महत्वाचे एखादे काम असेल आणि त्या कामासाठी जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर त्या कामाबद्दल लोकांना सांगू नये आपल्याला रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या ओळखीच्या प्रेत्येकाला त्याबद्दल सांगू नये. असे केल्याने कामात विघ्न येतात. ह्यामुळे काम पूर्ण न होण्याची शक्यता असते. विनाकारण फाटे फुटून ते काम न होण्याचे शक्यता जास्त असते. आणि आणखी एक जर महत्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर पडत असाल तर काहीतरी आपण खाऊनच बाहेर पडावे.

जर काम खूप महत्वाचे आहे तर आपल्या घरातील श्री यंत्र आपण आपल्या खिशात ठेवावे आणि मगच घराबाहेर पडावे, आपल्याला कामात हमखास यश प्राप्त होते. लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे. महत्वाचे निर्णय घेताना ते नीट विचारपूर्वक व काळजीपूर्वक घ्यावेत. गडबडीत घेतलेले निर्णय चुकतात. एखादा महत्वाचे निर्णय घेताना श्यकतो त्याला २४ तास द्यावे विचार करण्यासाठी.

मित्रांनो घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती खूपदा आपले निर्णय चुकीचे ठरवते. आपण रागाच्या भरात आपण चुकीचे निर्णय घेऊन टाकतो अश्या वेळी हि नाकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आपण दररोज फरशी पुसताना आपण खडे मीठ म्हणजेच मोठे मीठ आपण फरशी पुसण्याचा पाण्यात टाकावे व अश्या पाण्याने आपण फरशी पुसावी त्यामुळे आपल्या घरातून नाकारात्मक ऊर्जा निघून जाते.

आपल्या वास्तूमध्ये एखादी फुटलेली काच असेल किंवा आरसा असेल किंवा आणखी काही काचेच्या गोष्टी ज्या कि फुटलेले असतील तर त्या लगेचच नवीन लावून घ्याव्या कारण ह्या तुटलेल्या काचेतून एक मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती सतत बाहेर पडत असते. आपल्या घरात जे कोणी सदस्य आहेत त्यांनी तुमची ज्या कोणत्या देवावर भक्ती आहे त्या देवाचा मंत्र कमीत कमी १०८ वेळा आपण लिहून काढावा किंवा म्हणावा. उदाहरणार्थ जर स्वामीभक्त असाल तर श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करा विष्णू भक्त असाल तर ओम भागवते वासुदेवाय अश्या पद्दतीने आपण जप करावा. ह्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता निघून जाते, घरात सुख शांती व समृद्धी नांदते.

घरातील गृहिणींनी सर्वात महत्वाची एक गोष्ट ती म्हणजे आपण स्वयपांक घरात बनवलेली सर्वात पहिली चपाती गाईसाठी तर शेवटची चपाती हि कुत्र्यासाठी काढून ठेवावी. पितृदोष ह्यामुळे दूर होतात. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट