नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आजच्या लेखात जी दोन वाक्य आपण सांगणार आहोत ती इतकी घातक आहेत कि जी व्यक्ती हि वाक्ये बोलते आणि अमलात आणते तिच्या आयुष्यात बरबादी येते. तुम्हाला जर आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल प्रगती करायची असेल तर ह्या दोन वाक्यांना आपल्या डिकश्नरी मधून आजच काढून टाका. दिसायला हि वाक्य खूप साधी वाटतील परंतु जेव्हा तुम्ही त्याचा खोलात विचार कराल तेव्हा तुम्हाला समजेल कि खरंच हि वाक्ये तुमच्यासाठी किती घातक आहेत.
पहिले वाक्य आहे, मला हे काम करायचे आहे पण मी हे उद्यापासून करेल. मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवता आणि ती गोष्ट तुम्ही उद्यापासून करेल हे तुम्ही अप्रत्येक्षपणे म्हणत असता कि मी हे काम कधीच करणार नाही. बघा तुम्हीच कि तुम्ही आतापर्यन्त किती कामे व गोष्टी ठरवल्या होत्या आणि बोलला होता कि मी उदयपासून करेल परंतु तुम्ही त्यातील किती गोष्टी करू शकला किंवा केल्या.
मला वाटते कि १० पैकी एखादे काम तुम्ही केले असेल. मित्रांनो ह्याचे कारण म्हणजे जेव्हा आपल्या मनाला एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा आपले मन हे काम पुढे ढकलते. हा मनाचा स्वभाव आहे. त्याला एखादी गोष्ट कंफर्ट झोन च्या बाहेरची दिसली कि तो ती गोष्ट टाळायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आजपासून मित्रांनो मनाचा हा स्वभाव ओळखा आणि मनापासून एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती लगेच करायला सुरुवात करा तिला उद्यावर ढकलू नका.
तुम्ही म्हणाल लगेच कसे शक्य आहे, तर शक्य आहे तुम्हाला एक युक्ती सांगतो तुम्ही जे पण काम करायचे ठरवले आहे ते आजच ५ मिनटे का होईना करा. उदाहरणार्थ एखादे पुस्तक तुम्ही वाचायचे ठरवले असेल तर तुम्ही एखादे पान वाचून काढा. व्यायाम करायचा असेल तर ५ पुशप्स काढा किंवा ५ मिनटे वॉक करून या. ५ मिनिटापेक्षा जास्त करायचे असेल तर नक्कीच करा हेतू हा आहे कि तुम्हाला त्या कामाची सुरवात होते आणि तुमच्या मनाला एक सिग्नल जातो कि मी ह्या कामाला सुरवात केली आहे आणि पुढील काही दिवसात हे काम मला पूर्ण करायचे आहे.
मित्रांनो हा प्रयोग करून बघा काही दिवसात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. दुसरे वाक्य आहे मी जे काही करेल ते परफेक्टच करेल. मित्रांनो ह्या परफेक्ट च्या नादात खूप लोक कामाला सुरवातच करत नाहीत. त्यांना सर्व काही परिपूर्ण हवे असते. त्यांना परफेक्ट परिस्थिती काही येत नाही आणि तंटे कामाला सुरवात काही करत नाही. जगातील श्रीमंत माणूस जेफ बेझो ह्याने ऍमेझॉन ह्या कंपनी ची सुरुवात एका गॅरेज मधून केली होती. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान त्याने आपले करियर ची सुरुवात टीव्ही कलाकार पासून केली होती अक्षय कुमार तर बँकॉक मध्ये वेटर म्हणून काम करत होता अशी अनेक उदाहरणे आहेत.
ह्या लोकांनी परफेक्ट ची वाट पहिली नाही जिथे होते तिथून सुरवात केली म्हणून आज ते इथे पोहचले आहेत. त्यामुळे मित्रांनो परस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहू नका. जे काही तुमच्याकडे आहे त्याचा वापर करून सुरवात करा. कुठे चुकत आहे कुठे सुधारणा करायची आहे हे पहा. पण जर आपण वाट पाहत बसलो तर वेळ निघून गेलेली असेल. मित्रांनो हि होती ती दोन वाक्य ज्यमुळे आयुष्यात लोक यश मिळण्यापासून अडवले जातात. तुम्ही हि वाक्य आजपासून आत्तापासून तुमच्या डिकश्नरी मधून आजच काढून टाका.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




