धार्मिक

हरतालिकेची व्रत व कहाणी नक्की वाचा, पुण्य मिळेल.

नमस्कार मित्रांनो ३० ऑगस्ट मंगळवार ह्या दिवशी आहे हरतालिका आजच्या लेखात आपण हरतालिकेची कहाणी सांगणार आहोत. हिमालयाचा राजा हिमवान त्यांची पार्वती हि कन्या. तिचे लग्न कोणाबरोबर करायचे अशी काळजी त्यांना लागली होती. एकदा नारद देव त्या हिमवानाकडे आले आणि त्यांना म्हणाले.

हे पर्वतश्रेष्ठा तुझ्या ह्या सुस्वरूप मुलीला मागणी घालण्यासाठी मला भगवान श्री विष्णू ह्यांनी पाठवले आहे. हे ऐकून हिमवानाला फार आनंद झाला. पार्वतीला हि बातमी सांगितली मात्र पार्वती ने मनोमन कैलासराणा श्री शंकरांना आपले पती म्हणून मानले होते.

तसे प्रेत्येक्ष आपल्या वडिलांना सांगण्याचे धैर्य त्यांना झाले नाही, तिने आपल्या मैत्रणींसह आपल्या वडिलांकडे निरोप पाठवला कि तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी प्राण देईल. नंतर पार्वती आपल्या मैत्रणींसह अरण्यात निघून गेली तिथे तिने घोर तपश्चर्या केली शिवशंकराना प्रसन्न करून घेण्यासाठी हि तपश्चर्या देवी पार्वती करत होती. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून पार्वती त्या शिवलिंगाची पूजा करू लागली सर्वप्रथम ती फक्त झाडाची कोवळी पानेच खात असे.

पुढे जाऊन तिने तेही करणे सोडून दिले व पुढे ती निरंकार शिवशंकराची पूजा करू लागली त्यामुळे तिला अपर्णा असे नाव पडले देवी पार्वतीच्या ह्या तपश्चर्याने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितला.

तशी देवी पार्वती म्हणाली तुम्ही माझ्या साधनेमुळे जर खरोखर जर प्रसन्न झाला असाल तर प्रभू तुम्ही माझे पती व्हा. शिवशंकरानी तिथे तथास्तु म्हणले आणि त्यांनी तिथून अंतर्धान पावले. इकडे पार्वतीचा शोध घेत तिचे वडील अरण्यात पोहचले. तिला घर सोडून येण्याचे आणि तपश्चर्या करण्याचे कारण विचारले.

तेव्हा तिने आपल्या वडिलांना तिचा दृढ निश्चय सांगितला, भगवान शंकरानी दिलेला वर हि सांगितला. आपल्या मुलीचा दृढ निश्चय पाहून त्यांनी तिचा विवाह भगवान शंकरांशी करून दिला. पार्वतीची हि निष्ठा, श्रद्धा ह्यांचा तो विजय. पार्वती शंकरांच्या निष्ठेमुळे प्रेमामुळेच शंकरांना पार्वतीपती म्हणून नाव पडले.

इच्छित पती शंकरांची प्राप्ती त्यांनी त्यांच्या मैत्रणीच्या मदतीने करून घेतली. पार्वतीने आपला वर आपला पती कडक तपश्चर्या करून मिळवला त्याप्रमाणे मनासारखा पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका हे व्रत अगदी श्रद्धेने करतात.

ह्या दिवशी उपवास करतात, काही काही तर पाण्याचा थेंब देखील घेत नाहीत. रात्री १२ वाजता बेलाचे पान चाटून बऱ्याच जण रुईच्या पानावर मध लावून तो चाटून तर काही केळी किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत संपन्न करतात. ह्या व्रताच्या वेळी एका स्वच्छ जागी एक चौरंग ठेऊन त्या ठिकाणी पूजा केली जाते जागरण सुद्धा केले जाते. खरतर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपट तृतीयेला हि हरतालिका प्रेत्येक हिंदू स्त्री साजरी करते.

ह्या दिवशी पार्वती मातेची विशेष पूजा केली जाते. हरतालिका ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे हरित म्हणजे हरण करणे आणि अलीका म्हणजे मैत्रणीच्या मदतीने. जसे पार्वतीने मैत्रणीच्या मदतीने केलेले शंकरांचे हरण असे ह्या शब्दांचा अर्थ होतो. हिंदू कुमारिका मुली आपल्या हवा असलेला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. तर विवाहित स्त्रिया आपले सौभाग्य दीर्घायुष्य टिकून राहावे म्हणून हरतालिकेचे व्रत करताना दिसून येतात.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट