आपल्याकडे भरपूर पैसा असावा, आपले जीवन सर्व सुख सोयींनी युक्त असावे असे सर्वाना वाटते त्यासाठी आपण खूप कष्ट करतो मात्र कष्टाच्या मानाने उत्पन्न मिळत नसेल तर आपली नाराजगी होते, आपण काही उपाय देखील करतो पण म्हणावे तेवढा फरक जाणवत नाही त्याचे खरं कारण आहे कि आपण जेव्हा संकटाच्या दारात उभे असतो तेव्हा आपल्याला देवाची आठवण येते.
म्हणजेच आपण जास्त अडचणीत असलो कि आपण उपाय करतो मग त्यात थोडासा बदल झाला कि आपण उपाय थांबवतो, म्हणूनच एकदा नियम केला तर तो पाळला पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो. आज आपण पाहणार आहोत स्वामींचा वार गुरुवारी करण्याचे काही उपाय ज्यामुळे चारीही दिशांनी आनंदमय बातमी येईल.
गुरुवार हा आटवड्याती पाचवा दिवस गुरुवारी श्री विष्णूंचे, स्वामींचे पूजन केल्याने आपल्याला लाभ होतात, गुरुवार हा देवी लाक्षिमीचा देखील वार असल्याने धनप्राप्तीसाठी केलेले उपाय सफल ठरतात. आर्थिक अडचणीत असाल तुमच्यकडे पैसे येत असतील पण टिकत नसतील आणि ह्या त्रासापासून कायमची सुटका करून घ्याची असेल तर आपण आजच्या लेखातील काही छोटे उपाय करून तुमच्या ह्या त्रासातून मुक्ती मिळवू शकता. ह्या उपायांची सुरवात महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून केली तरी चालेल.
गुरुवारी सकाळी स्नान झाल्यावर तुळशीला न तापवलेले दूध २ चमचे अर्पण करावे ह्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. गुरुवार हा विष्णूंचा व माता लक्ष्मीचा आवडता वार आहे व त्यांचा आवडता रंग पिवळा आहे, म्हणून ह्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत.
हयामुळे तुम्हाला प्रेत्येक कामात यश मिळेल जर पिवळ्या रंगचे कपडे आपल्याला घालणे शक्य नसेल तर अगदी पिवळ्या रंगाचा रुमाल तरी आपल्या बरोबर ठेवावा. गुरुवारी आपल्याला कोणत्या कामानिमित्त बाहेर पडायचे असल्यास पिवळ्या रंगाची मिठाई आणून त्याचा नैवैद्य आपण लक्ष्मी माता व श्री हरी विष्णूंना दाखवावा व तो प्रसाद खाऊन घराबाहेर पडावे, आपले काम नक्की यशस्वी होणार.
जर शक्य असेल तर प्रेत्येक गुरुवारी आपण श्री विष्णूंच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. त्यांना आपण गुरुवारी पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. स्वामींना देखील ह्या दिवशी आपण पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. ह्या दिवशी आपण काम करता असताना किंवा इतर वेळी आपण ओम विष्णूवेन नमः ! ह्या मंत्राचा जप करावा म्हणजे आपल्या प्रेत्येक कामात भगवंत आपल्या सोबत असतील.
आपल्याला धनाची अपेक्षा असते आणि धनाची देवी माता लक्ष्मी आहे परंतु जर आपण श्री विष्णूंचे ध्यान जर केले तर आपल्या सोबत ते असतील व जेथे विष्णू स्वतः असतील तिथे माता लक्ष्मी असतेच. असे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या घरात धनाचा वर्षाव करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




