भारतीय संस्कृतीत स्वस्तिक ला खूप मानले जाते. कोणत्याही मंगल कार्यात स्वस्तिक ला खूप शुभ मानले जाते. स्वस्तिकचा अर्थ “सु+अस्ति”म्हणजे ” सु” म्हणजे ” शुभ” आणि “अस्ति’ म्हणजे “असणे’,याप्रमाणे स्वस्तिक म्हणजे” शुभ असणे” होय . स्वस्तिक म्हणजे शांती,समृद्धी आणि मंगल असणे.
स्वस्तिक चे महत्व
सूर्याचे आसन स्वस्तिक आहे.मित्रानो, स्वस्तिकची चारही बाजू म्हणजे धर्म,काम, अर्थ आणि मोक्ष आहेत. हे म्हणजे विष्णूचे चार हाथ मानले जातात आणि हे चार हे चार दिशांचे रक्षण करतात. तसेच महिलांचे मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक होय. म्हणून त्या रोज दारात स्वस्तिक काढतात.
मित्रानो, स्वस्तिकाला एवढे पावित्र्य का आहे? स्वस्तिक ला एवढे शुभ का मानतात/ गणपती बाप्पा आणि स्वस्तिकचा संबंध तर काय आहे? याची सविस्तर जाणून घेऊयात..
मित्रानो देवी पार्वतीने तिच्या मळापासून एक मूर्ती बनवली होती आणि त्यात तिने प्राण आणला आणि एका बालकाचा जन्म झाला. थोड्या वेळानी तिथे महादेव आले आणि त्यांनी त्या बालकाचे शीर उडवले आणि पार्वतीने ते पहिले व त्या ते पाहून खूप चिडल्या आणि त्यांनी त्या बालकाला महादेवांनी पुन्हा जिवंत करावे स त्यांनी सांगितलं. अश्या वेळेस महादेवांनी सेवकांना सांगितले कि तुम्ही जावा आणि जो प्राणी प्रथम तुम्हाला दिसेल त्या प्राण्याचे शीर तुम्ही छाटून आणा असं महादेवांनी सांगितलं.
सेवक निघाले तर त्यांना सर्वात आधी हत्ती दिसला त्यांनी त्या हत्तीचे शीर छाटून आणले आणि ते त्या बालकाला लावण्यात आले आणि गणपती बाप्पा चा जन्म झाला आणि हे पाहून पार्वती खूप खुश झाल्या. आणि सगळ्या देवदेवतांनी , महादेवांनी आणि पार्वतीने त्या बालकाला वर दिले आणि आशीर्वाद देखील दिले.
हे सगळं चालू असताना भृगी तिथे रडत होता . महादेवांनी त्या विचारले तू का रडत आहेस,तुला काय झालं.त्यावर भृंगी म्हणाला कि मी ज्या हत्तीचं शीर आणलं आहे तो हि कोणाचा मुलगा सेल त्याच्या आई ला पण वाईट वाटत असेल तीही तिथे रडत असेल .महादेव मला असं वाटतंय तुम्ही त्या धडा ला देखील आशीर्वाद द्यावाआणि त्याला शांत करावे.
हे सगळं ऐकताच सगळ्यात आधी गणपती त्या धाड जवळ पोहोचले,तर ते तडफडत होत ते पाहून गणपती बाप्पा ला वाईट वाटले. त्या धडावर हात ठेऊन गणपती बाप्पानी त्याला शांत केलं. तेव्हा त्या हत्तीचे चार पाय चार दिशेला झाले होते. अस्या प्रकारे स्वस्तिकची निर्मिती झाली. महादेवांनी तेव्हा त्याला आशीर्वाद दिला कि ज्या ठिकाणी गणपती बाप्पाची पूजा केली जाईल तेव्हा त्या जागी आदी तुझी म्हणजेच स्वस्तिकची पूजा होईल. तसंच त्या ठिकाणी स्वस्तिक काढले जाईल.
स्वस्तिकाला सर्व देवी देवतांनी सुद्धा आशीर्वाद दिला.देवी लक्ष्मी देवी म्हणल्या कि, स्वस्तिकची चीर बिंदू म्हणजे चार वेद असतील आणि त्या स्वस्तिकची मधोमध माझे वास्तव्य असेल असाही वर त्यांनी दिला.. म्हणूनच स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते.
मित्रानो, तुम्ही एखादे शुभ कार्य करत असाल तर तुमच्या कडे देवी देवतांचे फोटो नसेल तर तुम्ही त्या जागी स्वस्तिक काढून त्याची पूजा करू शकता. कारण त्या स्वस्तिक मध्ये तेहतीस कोटी देवांचा समावेश आहे,असे मानले जाते.
मित्रानो, आपण कोणतीही नवीन वस्तू ,घर,कारखाना ,नवी गाडी या सगळ्यांची पूजा आपण स्वस्तिक काढून करतो. तसेच घरातील मंगल कार्य करतांना आपण स्वस्तिक काढतो, तर हे होते स्वस्तिकचे महत्व ,म्हणूनच भारतीय संस्कृतीत याला एवढे मह्त्व आहे.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




