वास्तू शास्त्र

ह्या वेळी घरात जो झाडून काढतो त्याचे घर धनाने भरते.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो असे म्हणतात कि हाथ फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणजे जेथे स्वछता असते तिथेच देवी लक्ष्मी वास्तव्य करते घर साफ, निटनिटके ठेवणे सर्वांनाच आवडते त्यासाठी स्त्रिया नेहमी हातात झाडू व पोछा घेऊन तत्पर असतात परंतु कधी कधी आपण चांगले करायला जातो आणि त्यातून आपल्याला त्रासच निर्माण होतो घर नेहमी स्वछच राहावे यासाठी महिला हातात झाडू घेऊन कधीही झाडायला सुरु करतात.

परंतु शास्त्रात असे सांगितले आहे कि कोणत्याही वेळी घरात झाडू मारू नये, झाडू मारण्याचे देखील काही नियम आहेत. घर स्वछता असेल तिथे लक्ष्मी निवास करते परंतु चुकीच्या वेळी जर आपण झाडून काढले तर माता लक्ष्मी नाराज होते. ह्यामुळे आपले संपूर्ण घर बरबाद होऊ शकते. शास्त्रानुसार आपण सकाळी उठल्याबरोबर घर स्वच्छ करावे. त्यामुळे घरातील नाकारात्मकता घराबाहेर निघते.

सूर्यास्तनंतर घरात कधीही झाडू मारू नये झाडू मारताना स्त्रियांनी जर काही गोष्टींकडे लक्ष दिले तर आपल्या घरात कधीही गरिबी येणार नाही. तसे तर शास्त्रानुसार झाडू मारण्याचा मुहूर्त पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान आहे ह्याच वेळॆला आपण ब्रह्ममुहूर्त देखील म्हणतो ह्याचे खास कारण असे आहे कि ह्यावेळी आपल्या घरात सकारत्मक ऊर्जा व दैवी शक्ती पसरलेल्या असतात. ह्या वेळी झाडू मारल्याने आपल्या घरातील संपूर्ण नाकारात्मकता निघून जाते व घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरातील दारिद्र्य निघून जाते

पहाटेची वेळ हि गुप्त वेळ म्हणून पण संबोधली जाते ह्या वेळी झाडझूड करून घर स्वच्छ केल्यास देवी लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होते, कारण देवी लक्ष्मी त्यांचाच घरी प्रवेश करते ज्यांच्या घरात स्वछता असते. मग ज्या घरात देवी लक्ष्मी येते त्या घरातील लोकांवर माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद कायम राहतो. जर ब्राह्ममुहुर्ताला झाडणे शक्य नसेल तर कमीत कमी सूर्योदयापूर्वी तरी घरात झाडझूड करावी.

पण चुकूनही संध्याकाळी सूर्यास्तानंतर झाडून काढू नये कारण सायंकाळी माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते आणि त्यावेळी आपण जर झाडात असाल तर माता लक्ष्मी घरात प्रवेश न करता बाहेरूनच निघून जाते व ह्यामुळे घरात दारिद्र्यता येते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट