धार्मिक

प्रचंड बळ देणारा श्री स्वामी समर्थांचा संदेश

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपले स्वामी म्हणतात कि मूळ पुरुष, दत्तनगर, वडाचे झाड स्वामी महाराज अक्कलकोटी असंख्य लीला करत होते त्यांचा लीला अतर्क्य होत्या. अक्कलकोट मध्ये सरस्वती नावाची सोनारीन राहत होती तिचे वागणे हे वेडसर होते परंतु तिचे वागणे हे अत्यंत वेडसर होते. परंतु तिच्यावर महाराजांची पूर्ण कृपा होती, कधी कधी ती जनाबाईचा अभंग म्हणत ती ढळढळा रडत आणि वेड्यासारखे रस्त्यातून फिरत असत तिच्याकडे चिंद्याचे गाठोडे आणि एक गाढगे एवढेच होते.

ह्या सोनारीनचे वैशिष्ट असे कि तिला स्वामींच्या वाक्याचा अर्थ कळत असे इतकेच नव्हे तर कधी स्वामी महाराज रागवले आहेत आणि त्यांचा राग शांत होत आहे तेव्हा ज्ञानबा ह्या सोनारीन स्त्रीला शोधून अनत असे, मग पुढे हा ज्ञानबा आणि मागे हि सोनारीन असे हातात काठ्या घेऊन ते चालत चालत एक जण ज्ञानबा तुकाराम तर मागून हि सोनारीन ह्या बोडकीचे काय काम असे म्हणत ते भजन करून नाचू लागत असे हे भजन गाताना ऐकून स्वामी महाराजांचा राग शांत होत असे अन मग स्वामी मोठमोठ्याने हसत असत.

अशीच एकदा नरसोबाच्या वाडीचे लोक दर्शनाला अली होती त्यांनी स्वामींना प्रश्न केला कि स्वामी तुम्ही नक्की कोण आहेत तेव्हा ते म्हणाले मूळ पुरुष, दत्तनगर, वडाचे झाड हे ऐकताच ती सोनारीन म्हणाली वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रय रूपाने अवतरले आहेत, मित्रांनो असे उत्तर त्या वेड्या सोनारणीने देताच सर्वाना आश्चर्य वाटले. कारण परब्रम्हाच्या वणीची उकल हि त्या वेड्या स्त्रीने केली ह्याला लीला नव्हे तर काय म्हणावे.

सरस्वती सोनारीनसह ज्ञानबा हे दोघेही वेडे होते, परंतु स्वामींना सर्वात प्रिय होते. वेद, उपनिषद, शास्त्र आदिग्रंथ तोंडपाठ असलेल्या ज्या ज्ञानी लोकांना स्वामींच्या वाणीचे उकल होत नसे त्या वाणीच्या अर्थ एका वेड्या स्त्रीला समजत असे. आजच्या ह्या स्वामीलीलेतून स्वामी आपल्याला हाच संकेत देत आहेत कि गुरुत्त्वाचे मार्गदर्शन तुम्हाला समजून घ्याचे असेल तर त्याचा भक्तीत वेडे व्हावेच लागेल.

सोनारीन सांगते कि मूळ पुरुष म्हणजेच स्रोत कि ज्यातून अक्षय वडाच्या वृक्षाप्रमाणे हे अनंत कोटी ब्रह्माण्ड प्रसरण पावते आहे. प्रेत्येक पक्षी, कीटक जीवांसह मानवाला सतत मार्गदर्शन करत आहे असे गुरुतत्व म्हणजे श्री दत्त, अशी निर्गुण निरागर अवस्था म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो मूळ पुरुष, दत्तनगर, वडाचे झाड हे स्वामीवानी म्हणजे म्हणे अनुभव अनुभूती आहे, हा बोध आहे. आपण ह्याचा स्वादच घ्याचा आहे. ह्या स्वामीवाणीचा अनुभव घेणे हेच प्रेत्येक व्यक्तीचे ध्येय आहे.

पुस्तकी पंडित होण्यापेक्षा स्वामींचा वेडा भक्त झालो तर ह्या स्वामींच्या वाणीचा स्वाद होणे घेणे सोपे वाटते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट