धार्मिक

बाप्पांच्या विसर्जनाचा संपूर्ण विधी, पूजेत वापरलेल्या वस्तूंचे काय करावे त्याची शास्त्रशुद्ध माहिती

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपल्या सर्वानी घरात बाप्पांची स्थापना केली आहे. आपण श्रद्धा भावनेने व बाप्पांचे पूजन करतो आणि काही जण दुसऱ्या दिवशी ५ दिवस, ७ दिवस व काही १० व्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन करतो. आपण गणपती बाप्पांचे दर्श करताना गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करतो व बाप्पांना ज्या कापडावर बसिवले होते त्यावरील तांदूळ, नारळ, सुपारी, दक्षिण, कलश ह्या सर्व वस्तू तश्याच राहतात. मग आपल्याला ह्या सर्व वस्तूंचे नेमके काय करावे ते सुचत नाही.

म्हणून ह्या सर्व वस्तूंचे नेमके काय करावे किंवा ह्या वस्तूंचा आपण काय वापर करावा ह्याबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. आपण गणपती बाप्पांना ज्या वस्त्रावर स्थापन करतो तंटे वस्त्र नवीन घेतलेले असते म्हणून त्या वस्त्राचा वापर आपण देवघरात करू शकतो. देवघरातील देवांना स्थापनपन्न करण्यासाठी आपण हे कापड अंथरु शकतो. किंवा देवघरात जर हे कापड अंथरण्याची तुमची इच्छा नसेल तर देवघर पुसण्यासाठी किंवा देवपूजावेळी हाथ किंवा कलश देव पुसणे ह्यासाठी देखील तुम्ही ह्याचा वापर करू शकता.

ज्या वेळी आपण गणपती विसर्जन करण्यासाठी नदीवर, तलावावर किंवा समुद्रात जातो तेव्हा आपण ज्या वेळी आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करतो त्या ठिकाणची आपण माती घेऊन आपण घरी यावे व गणपती बाप्पांना जिथे आपण बसवले होते त्या ठिकाणी आपण ती माती एखाद्या वाटीत ठेवून गणपती बाप्पांची आरती करावी, कारण आपण गणपती बाप्पांच्या स्थूल रूपाचे विसर्जन केलेले असले तरीहि सूक्ष्म रूपात गणपती बाप्पा तेथेच असतात. जी समई किंवा दिवा चालू असेल ते तसेच चालू ठेवावे.. त्यातील संपूर्ण दिवा संपेपर्यन्त तो दिवा तसेच ठेवावा.

दुसऱ्या दिवशी ती माती एकाद्या कुंडीत ठेवावी व त्याला पाणी अर्पण करावे म्हणजे बाप्पांचा वास आपल्या घरात स्थयी रूपात राहील. त्यानंतर तांदूळ जे आपण वापरले होते त्या तांदळाची खीर किंवा इतर काही गॉड पदार्थ करून खावेत. कळसाखालील किंवा नवग्रहांच्या खालील ठेवलेलं तांदूळ आपण आपल्या धान्यात ठेवून द्यावे, ह्यामुळे आपल्या धान्याला बरकत येते. पंरतु तुमची त्या धान्यात टाकण्याची इच्छा नसेल तर ते धान्य पक्ष्यांना किंवा गाईला खाईला द्यावे. सर्व सुपाऱ्या एका कुंडीत किंवा इतर ठिकाणी खड्डा खंदून त्यात टाकावा. त्याची झाडे येतील. सुपारीचे झाड सजावटीसाठी देखील खूप चांगले दिसते.

दक्षिना हि आपण घरातील कन्येला द्यावी, घरात जर कुमरीका कन्या नसेल तर इतर कन्येला दिले तरी चालते. कलशातील पाणी हे संपूर्ण घरात शिंपडावे. जर घरात बाथरूम आणि टॉयलेट असेल तर तो भाग टाळून सर्व भागात शिंपडावे व उरलेले पाणी सर्व कुंडीत टाकावे. पण तुळशीला अर्पण करू नये इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते अर्पण करू शकता. नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वानी ग्रहण करू शकता.

पूजेची फुले, पाने इतर सर्व काही निर्माल्य कलशात नदीवर अर्पण करावेत. अश्या प्रकारे गणपती बाप्पांच्या सर्व वस्तूंचा अगदी योग्य प्रकारे वापर करावा. तर मित्रांनो आजचा लेख आवडला असेलच, तर लाइक व शेयर करायला विसरू नका धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट