लाईफस्टाईल

गरुडपुराणात सांगितले आहे कि तुमचा पुढील जन्म कोणता होणार.

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ. माणूस जे काही कर्म करतो त्याचेच त्याला फळ मिळत असते, पण तुम्हाला हे माहिती आहे का मृत्यूनंतरही आपले कर्म आपली पाठ सोडत नाही याचाच अर्थ मृत्यूनंतरची गती हे तुमचे कार्य कर्म ठरवत असते. मृत्यूनंतर तुमचा जन्म कोणता आहे हे देखील ह्या जन्मातील कर्म ह्यावर ते ठरते. मृत्यूपश्चात माणसाचे काय होते ह्याबद्दल काही माहिती गरुडपुराणात सांगितली आहे, आजच्या लेखात आपण ह्याबद्दल जाणून घेणार आहोत.

आजच्या लेखात आपण गरुड पुराणात केलेल्या ११ कर्मांबद्दल सांगणार आहोत ज्याच्या आधारावर माणसाला विविध प्रकारच्या प्राणांच्या योनी प्राप्त होतात. ह्या जगात मैत्रीचे नाते फार महत्वाचे असते. असे म्हणतात कि खरा मित्र वेळ आल्यावर आपल्या प्राणाची पर्वा देखील न करता मैत्री निभावतो. गरुड पुराणात अश्या लोकांबद्दल देखील सांगितले गेले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मित्राला फसवते, तेव्हा त्याला मृत्यूनंतर नर्कात जावे लागते, तसेच त्याचा पुढील जन्म हा गिधाडाच्या रूपात होऊन त्याला एका डोंगराळ ठिकाणी राहावे लागते.

मेलेल्या जनावरांचे मांस खाऊन त्याला उदरनिर्वाह करावा लागतो, थोडक्यात काय तर मित्राला फसवण्याची इतकी मोठी शिक्षा मिळते. तुम्हाला ह्या जगात असे अनेक लोक सापडतील कि जे आपल्यासोबत इतर धर्मांचा देखील आदर करतात. काही लोक असे असतात कि इतर धर्मांच्या लोकांना चिडवतात त्यांच्यावर धार्मिक टीका करतात त्यांच्याकडे तुच्छतेने वागतात अश्या लोकांबद्दल देखील गरुड पुराणात सांगितले आहे कि अश्या लोकांना नर्क तर मिळतोच तसेच त्यांना पुढील जन्म हा कुत्र्याच्या रूपात मिळतो.

ह्याचाच अर्थ काय होतो तर कोणत्याही धर्माबद्दल नेहमी आदराने वागावे, जी व्यक्ती आपल्या आई वडिलांची आणि गुरूंची अवहेलना करते ती व्यक्ती मृत्यू नंतर पुन्हा पुन्हा जन्म घेते, पंरतु ती व्यक्ती गर्भांतून बाहेर येत नाही त्याचा गर्भांतच मृत्यू होतो. असे अनेक लोक आहेत जी आपल्या कृतीने आपली मन जिंकतात, परंतु अशी पण काही लोक आहेत जे आपल्या सध्या भोळा चेहरा करून मूर्ख बनवतात अश्या लोकांबद्दल गरुड पुराणात सांगितले गेले आहे कि अशी लोक पुढील जन्मात घुबड बनतात. आपल्या धूर्तपणाचा पश्चाताप करत राहतात.

आपल्या आई वडिलांची सेवा करताना वैवाहिक जीवन सांभाळणे हे सर्व माणसांचे कर्तव्य आहे प त्याचबरोबर आदर्श सुनेची देखील काही कर्तव्य आहेत, पण ह्याउलट जी स्त्री सासू सासऱ्यांची सेवा करत नाही त्यांना शिवीगाळ करते तिला पुढील जन्मात उवांच्या रूपात जन्म घेयला लागतो, ऐकायला भयानक वाटतय मात्र हे पुराणात सांगितले आहे. आपल्या पुरणात अन्नदान हे सर्वात मोठे दान आहे, त्या व्यक्तीला स्वर्गात देखील प्रसिद्धी मिळते.

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल कि माता सरस्वती हे व्यक्तीच्या गळ्यात वास करतात. म्हणूनच धर्मग्रंथात सांगितले आहे कि माणसाने लोकांच्या भावना दुखावनारे शब्द कधीही उच्चारू नये, तरीही किती तरी लोक शिव्या गाळ करतात. अश्या लोकांना पुढील जन्मात शेळीच्या रूपाने काढावा लागतो.

ह्या जगात बहुतेक स्त्रिया ह्या सद्गुणी आहेत आणि त्या आपल्या पतीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाहीत पण जगातील बाकीच्या काही स्त्रिया असतात त्या स्वाभिचार करतात त्यांना विवाहबाह्य संबंध ठेवण्यात रस असतो त्यांच्या ह्या कृत्यामुळे समाजात त्यांना अनेकदा अपमान देखील सहन करावा लागतो. पण त्यांची बुद्धी त्यावेळी जागी येते जेव्हा त्यांना पुढील जन्म पालीच्या किंवा सरड्याच्या रूपात घयावा लागतो.

मित्रांनो आपण केलेल्या वाईट कर्माचे फळ हे आपल्याला ह्या जन्मी नाहीतर पुढील जन्मी तर मिळतेच मिळते. म्हणून कर्म करताना सावधान राहावे आपल्याकडून कोणी दुखावले जाऊ नये ह्याची आपण काळजी घ्यावी. सत्कर्म करावीत म्हणजे त्याची फळे देखील आपल्याला चंगीलीच मिळतील. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट