प्रत्येक व्यक्तीची एका पेक्षा अनेक अपेक्षा जो पूर्ण करतो तो देव कसा असेल याची कल्पना कोणी केली नाही. देव हा प्रत्येकांची इच्छा पूर्ण करतो. मागेल त्याला सर्व गोष्टी देत राहतो. पण देव असतो कुठे हा प्रश्न सर्वां येत असेल. पण त्याचे उत्तर विविध पुस्तकात किंवा ग्रंथात दिले आहे. देवहा आपल्या मध्ये असतो. आपल्या आजूबाजूला असतो. प्रथ्वी तळावर प्रत्येक ठिकाणी त्याचा वास असतो.
देव सर्वत्र असतो याची प्रचिती काही वेळेस अली असेल.त्यासाठी तुम्हला एक गोष्ट सागतो. एक वयस्कर व्यक्ती काही काम साठी एक शहरात आलेला असतो. पण काही वाईट गोष्टी त्याच्या सोबत घडतात. आणि त्याच्या कडील सर्व पैसा संपतात. त्याला जेवण्यासाठी सुद्धा काही त्याच्या कडे नसते. बराच वेळ भूकेने व्यकुल झालेला व्यक्ती एका बागेतील झाडाखाली बसतो. त्या बागेतील काम करणारे व्यक्ती त्या झाडा खाली बसून डबा खण्यासाठी येतात.
त्यातील एकाची नजर त्या व्यक्ती कडे जाते. आणि बागेतील कर्मचारी त्याला आपल्या डब्यातील भाजी भाकरी खण्यासाठी देतात. त्या वयस्कर व्यक्तीच्या चाऱ्यावर आलेले हास्य पाहून मनाला जो आनंद मिळतो तो देव भेटण्यासारख्या असतो. देव हा सगळीकडे असतो पण त्याचा अनुभव कधी येतो, ज्या वेळेस आपल्या मनात कोणताही विचार न येता क्षणात आपण समोरच्या व्यक्तीस मदत करतो आणि त्याची परत फेड व्हवी याची इच्छा सुद्धा येत नाही. तसेच या मदती मुळे समोरच्या चाऱ्यावर जे हास्य निर्माण होते त्याचा अनुभव हा खुप मोठा असतो.
सर्वानी गीता वाचली असेल त्यात म्हंटले आहे ईश्वर सर्व भुतानं. म्हणजे काय तर देव सर्व ठिकाणी आहे. ईश्वर सर्वांना मध्ये आहे. देव प्रत्येक घटकात आणि प्रत्येक ठिकाणी आहे. पण त्याची प्रचिती कधी येत. जेव्हा आपण एक मेकांना मदत करो, एक मेकांना आनंदी ठेवण्यासाठी मदत करतो. मंदिरातील देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण विविध गोष्टी अर्पण करतो.
पण मंदिरच्या बाहेर आपल्यावर. आपण दुसऱ्या बद्दल वाईट बोलत राहतो; समोरच्या व्यक्तीचे विनाकारण वाईट व्हवे म्हणून विचार करत बसतो, मदत मगण्यासाठी आलेल्या व्यक्तीस आपण नको तसा अपमान करतो, जर का आपल्याला देवाला प्रसन्न करून घ्याचे असेल तर आपल्याला प्रत्येक माणसात देव पाहता आला पाहिजे. आपल्या परीने जी काही मदत करता येईल ती केली पाहिजे. तसेच मदत शक्य होत नसेल तर कमीत कमी त्या व्यक्तीचे वाईट चिंतन केले नाही पाहिजे.
देव फक्त देवाच्या गाभाऱ्यात असतो असे नाही. तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला मदत करण्यासाठी तयार असतो. देव कोणत्या रूपाने आपल्या समोर येईल हे सांगता येत नाही. आपण सर्वानी मिळून एक मेकांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विश्वास बसत नसेल तर एकदा अनोळखी व्यक्तीच मनापसून मद्दत करून पहा आणि त्याच्या चऱ्यावरील आनंद पाहून काय होते हे आम्हाला नक्की सगा. किंवा अशी तुम्ही कधी कोणाला मद्दत केली आहे का हे आम्हला सागा.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.



