धार्मिक

पक्ष पंधरवडा सुरू आहे. पितृ तुप्ता होण्यासाठी हे भोजन बनवावे.

आजच्या लेखात आपण पितृ पक्षात कसे भोजन बनवावे या साठी थोडी माहिती पाहणार आहोत. असे बोले जाते कि रोज आपण केलेल्या स्वयंपाकातून एक भाग आपल्या पितृनासाठी वेगळा काढला पाहिजे. जर आपले पितृ आपल्यावर प्रसन्न असतील तर ते कोणत्याही स्वरूपात येऊन ते भोजन करतात. शक्यतो आपले पितृ हे कावळ्याच्या स्वरूपात येतात. पण काही वेळेस ते विविध स्वरूपात सुद्धा येऊ शकतात. व भोजन ग्रहण करतात.

या काळात म्हणजे पक्षपंधरवडा सुरु असताना, आपल्या पितृनाचे जे आवडते पदार्थ होते ते श्रद्धा साठी बनवेल जातात. असे पदार्थ आपण पितृना दिल्यास ते खुप आनंदी होतात. असे म्हंटले जाते दरवर्षी पितृपक्षात आपले पितृ स्वर्गातून पृथ्वी येऊन आपल्या घरातील उबटयावर येऊन बसलेले असतात. जरी आपण त्यांना पाहू शकत नसलो किंवा त्यांचा भास जाणवत जरी नसला तरी ते आपल्या जवळ असतात.

या काळात आपण चागले पदार्थ केले आणि त्यांना दिलेले तर ते प्रेमाने त्याचे ग्रहण करतात, नाहीतर ते परत फिरतात. तसेच पितृ पक्षात एक दिवा रोज दक्षिण दिशेला लावावा. या दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला करावे. रोज सकाळी पोळी करताना पहिली पोळीचे चार भाग करावे त्याला साजूक तूप लावून एक भाग हा गाईल, एका भाग कुत्र्याला, एका भाग कावळ्याला तर एक भाग याचक किंवा भिकारीला द्यावा.

श्रद्धात विशेतः दुधाची खीर केली जाते. खीर काण्याची पद्धत हि वेगळी वेगळी असू शकते. दुसरा पदार्थ म्हणजे डागरची भाजी याला दुसरे नाव आहे कशी फळ सुद्धा म्हंटले जाते. असे सुद्धा बोले जाते या पक्षपंधरवड्यात मांसाहार करु नये, कोणाला सुद्धा देऊनये. त्या शिवाय कोणते पदार्थ या दिवसात केले जाते या बदल महती जाऊन घेऊ.

श्रद्धाच्या भोजना मध्ये पुरी कचोरी भजे या पदार्थां खुप महत्व असते. विशेष करून उडदाचे पदार्थ श्रद्धा मध्ये केले जातात. या शिवाय श्रद्धाचे ताट परिपूर्ण होत नाही. या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या केल्या जातात. त्यात गवार, पालक, कारले मेथीची भाजी, भेंडी, मुगाची उसळ अळूच्या वड्या, चवळी, कढी, भात खीर, पुरी, भजे, उडदाचे वडे, चपाती. असे संपूर्ण व परिपूर्ण भोजन बनविले जाते. श्राद्धाचे भोजन सात्विक असावे. ते जास्त मसाले दार आणि चमचमीत असू नये.

आपण पितृना देवाचा दर्जा देत असतो. ज्या प्रमाणजे देवाच्या नैवेद्य आपण कांदा, लसूण वापरत नाही त्या प्रमाणे श्रद्धाच्या भोजना सुद्धा वापरू नये. ज्या प्रमाणे आपण देवासाठी सात्विक भोजन बनवतो त्याच प्रमाणे पितृसाठी सुद्धा सात्विक भोजन तयार करावे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट