भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे
बातम्या

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे. त्यांची संप्पती किती आहे हे तुम्हला माहीत आहे का.

भरात हा देश विविध संस्कृतीने तयार झालेला देश आहे. प्रत्येक राज्यात विविध प्रकारच्या रिती रिवाज आणि त्यांचे राहणीमान खुप वेगळे वेगळे आहे. जरी या सर्व गोष्टी वेगळ्या असल्या तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा स्थान हे कोणते ना कोणते मंदिर असते. तो व्यक्ती आपल्या व्यस्थ वेळेतून थोडावेळ काढून मंदिरात जाऊन येतो. थोडावेळ का असेना देवाचे नामस्मरण करत असतो.

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे

प्रत्येक भक्ताचा विश्वास हा आपल्या देवावर आहे. आपल्या जीवनात ज्या काही चागल्या आणि वाईट गोष्टी घडतात त्या देवामुळे होतात या विश्वासाने तो आपल्या कष्टातील जसे जमेल तसे तो काही प्रमाणत मंदिरात दान करत असतो. बरेच भक्त हे सोने, चांदी, काही मौल्यवान वस्तू सुद्धा दान करतात. आणि या मंदिरातील विश्वस्त व्यक्ती त्याची योग्य पद्धतीने मोजमाप करून जतन करून ठेवतात किंवा त्याचा वापर हा समाज सेवे साठी सुद्धा केला जातो.

साईबाबा, शिर्डी

Saibaba Shirdi साईबाबा शिर्डी

साईबाबा हे एक आध्यत्मिक गुरु होते. जगभरात साईबाबा याना मानणारे बरेच भक्त आहेत. त्यांची उपासना करणारे भक्त सुद्धा खुप मोठया प्रमाणात आहेत. शिर्डी साई मंदिरात जगभरातून भक्त दर्शना साठी येत असतात. तसेच या मंदिरात सर्व भक्त मनापासून दान करत असतात. हे मंदिर भारतातील एक श्रीमंत मंदिरा पैकी एक आहे. जवळ पास या मंदिराची संपत्ती हि ५०० कोटी पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

Siddhivinayak Temple Mumbai, सिद्धिविनायक मंदिर मुंबई

मुंबई शहरातील सिद्धिविनायक मंदिर हे सुद्धा एक श्रीमंत मंदिर आहे. दरवर्षी या मंदिरात लाखो रुपयांची देणगी येत असते. मुंबईतील सर्वत मोठया मंदिरा पैकी हे एक मंदिर आहे. मुंबईला आलेला प्रत्येक भक्त हा सिद्धिविनायक मंदिर गेल्याशिवाय रहात नाही. या देवस्थनाकडे जवळ पस १२५ कोटी संपत्ती असण्याची शक्यता आहे.

वैष्णो देवी मंदिर, जम्मू

Vaishno Devi Temple, Jammu. वैष्णो देवी मंदिर, जम्मू

वैष्णो देवी मंदिर हे जम्मू मध्ये आहे. जवळपास हे मंदिर ५२०० फूट उंच आहे. जवळपास या मंदिरात दर वर्षी दहा लाख पेक्षा जास्त भाविक या ठिकाणी येऊन जातात. हे मंदिर सुद्धा भरतील एक श्रीमंत मंदिर आहे. दरवर्षी या ठिकाणी ५०० कोटी पेक्षा जास्त देणगी येते.

पद्मनाभस्वामी मंदिर, केरळ

पद्मनाभस्वामी मंदिर, केरळ. Padmanabhaswamy Temple Kerala, भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे

पद्मनाभस्वामी मंदिर हे एक भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. तसेच हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरा पैकी एक आहे. काही दिवसापूर्वी या मंदिरच्या तळ घरातील काही खोल्या उघडण्यात आल्या, यामधून सुमारे १,००,००० कोटी रुपय मिळाले. या तळघरात विष्णूची सोन्याची मूर्ती सापडली जवळपास ती ५०० कोटीची असून. इतर खजिना सुद्धा सापडला त्याच बरोबर मौल्या वस्तू सुद्धा खुप मोठया प्रमाणत मिळाल्या. अंदाजे या मंदिराकडे १ लाख कोटी संपत्ती आहे.

तिरुपति वेंकटेश्वर मंदिर आंध्र प्रदेश

तिरुपति वेंकटेश्वर मंदिर आंध्र प्रदेश, Tirupati Venkateswara Temple Andhra Pradesh

तिरुपती मंदिर हे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात भारतातून नव्हे तर जगातून भक्त येत असतात. तसेच या मंदिरात दर दिवसाला लाखो लोक देणगी देत असतात. बरेच भक्त तिरुपती वेंकटेश्वर मंदिरात सोन्याच्या आणि चांदीच्या भेट वस्तू दान करत असतात. तसेच या मंदिरात दान धर्म केल्यास चागले मानले जाते. या मंदिरा कडे जवळ पास ५०० कोटी संपत्ती आहे.

सबरीमाला मंदिर केरळ

सबरीमाला मंदिर केरळ, Sabarimala Temple Kerala. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे

हे मंदिर तीनशे फूट उंच पर्वतावर आहे. या मंदिरात भगवान अयप्पा चे भक्त मोठया प्रमाणत येतात. जवळ पास या मंदिरात १५ कोटी रुपयाचे सोने आणि १५० कोटी रुपय दान येत असते. हे मंदिर सुद्धा भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरा पैकी आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे आजही लाखो भक्ताने भलेली असतात. या पैकी कोणत्या मंदिरात जाऊन आला असला तर या बद्दल आम्हला नक्की सागा.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट