काही लहान मुले किंवा मोठे याना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. कोणतेही काम हाती घेतले तरी त्याला अपयश येत राहते. लहान मुले बऱ्याच वेळेस खुप त्रास देत असतात. किंवा त्यांचे लक्ष एका ठकाणी न रहाता वेगळी कडे जात राहते. तसेच आपण काही वेळेस निर्जन स्थळी गेल्यामुळे सुद्धा काही बाधा होण्याची शक्यात असते. अशा वेळी आपण जी कोणाची नजर लागते ती कशी काढायची या बदललं जाणून घेऊ.
नजर लागल्याची काही कारणे असतात. यामध्ये बबऱ्याच वेळेस लोक नेहमी आजारी पडतात. घरात आलेला पैसे घराबाहेर सतत जात रहातो. पैशाचे नवनवीन मार्ग येण्याचे बंद होतात. उदयोग व्यवसाय असेल तर त्यात आर्थिक अडचणी जाणवत जातात. उदोगाची वाढ खुंटते. कोणत्याच कामात प्रगती दिसून येत नाही. नोकरी मध्ये सतत अडचणी येणे कोणतेही कारण नसताना. कर्ज वाढत जाणे. अशा या गोष्टी आहेत ज्यामूळे आपल्या समजू शकते कि आपल्या नजर लागली असेल किंवा घराला नजर लागली आहे.
या सर्व समस्यांवर काही उपाय आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणूनघेऊ . एक कापसाची वात आपल्याला घ्याची आहे. ती मोहरीच्या तेलात भिजत ठेवायची आहे. आणि त्या नंतर ज्या व्यक्तीला अडचणी येत आहे अशा व्यक्तीच्या डोक्या पासून ते पायपर्यंत स्पर्श न करता ती सात वेळा उत्तराव्याची आहे. आणि त्यानंतर हि वात जाळून टाकायची आहे. हा उपाय सात दिवस सतत करायचा आहे.
दुसरा आणि सोपा उपाय सात लाल मिरच्या घ्याच्या आहेत. आणि ज्या व्यक्तला नजर लागली आहे अशा व्यक्तीच्या डोक्या पासून ते पायापर्यंत सात वेळा ओवाळून टाकायच्या आहेत. आणि या लाला मिरच्या जाळून टाकायच्या आहेत. असे सतत तीन दिवस करायचे आहे. यामुळे सुद्धा समस्या दूर होतात. त्या नंतर सर्वात छोटा उपाय आपण ज्या वेळेस पोळी किंवा भाकरी तयार करतो अशा वेळी एक एक पोळी किंवा भाकरी हि मोहरीच्या तेलापासून तयार करायची आणि ती गयी ला खायला दद्याची आहे.
असे छोटेसे उपाय केल्याने आपल्याला जी काही बाधा झाली आले तर त्यापासून मुक्तता मिळू शकते.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




