गरुड पुराणा नुसार या पाच वस्तू मुत्युनंतरही सोबत जातात.
धार्मिक

गरुड पुराणा नुसार या पाच वस्तू मुत्युनंतरही सोबत जातात.

या जगात ज्या व्यक्तीचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटल आहे. जन्म आणि मृत्यू हे चक्र कधीच संपत नाही. मुत्यू नंतर कोणताही मनुष्य आपल्या सोबत काही घेऊन जात नाही. माणसा जवळ कितीही पैसा असला कितीही साधन संपत्ती असली तरी तो सोबत घरून जात नाही. असे मानले जाते माणूस मृत्यू नंतर फक्त आपले कर्म घरून जातो.

गरुड पुराणा नुसार माणसाच्या मृत्यू नंतर पाच गोष्टी सोबत जातात. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यावेळेस त्याची यमलोकाची यात्रा सुरु होते. आणि त्या वाटेवरून जात असताना त्याच्या कर्म फळानुसार त्याचा जीवनातील पाच वस्तू बरोबर जातात. आणि ज्या वेळेस त्या आत्म्याच्या प्रवास संपतो व ते आत्मा नवीन शरीर धारण करते त्यावेळी त्या वस्तू नवीन शरीरात प्रवेश करतात.

असा कोणत्या वस्तू असतात ज्या मृत्यू नंतर सुद्धा आपल्या सोबत असतात. गरुड पुराणा नुसार काही असा वस्तू असतात ज्या नेहमी आपल्या सोबत असतात. त्या वस्तूचा अंत कधीच होत नाही. या कोणत्या वस्तू आहेत या बद्दल आपण आज माहिती जाणून घेऊ.

यातील पहिली गोष्ट म्हणजे कामना म्हणजेच इच्छा. असे मानले जाते कि जर का एखाद्या व्यक्तीची मृत्यूच्या वेळेस कोणती इच्छा असेल तर त्याची पुरतात करण्यासाठी म्हणजेच पूर्ण करण्यासाठी नवीन शरीराची प्राप्ती होत असते. गरुड पुराणानुसार इच्छे नुसारच नवीन शरीराची प्राप्ती होत असते. आणि त्या इच्छे साठीच कोणता ना कोणता जन्म त्या व्यक्तीला घ्यावा लागतो.

दुसरी वस्तू आहे वासना. वासना म्हणजे आपल्या संसारी सुखाची इच्छा करणे म्हणजे वासना होय. गरुड पुरणात असे दिले आहे. जो मनुष्य मृत्यू वेळी आपल्या परिवाराबद्दल विचार करत असतो. आणि त्याच्या सोबत तो सुख आणि दुःखाचा सुद्धा विचार करत असतो. ज्या इच्छा त्याचा राहिल्या आहेत त्या बदल विचार करत त्या पूर्ण कशा होतील यासाठी तो तगमगत असतो. आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. जी काही इच्छा असते त्या इच्छे नुसार त्याला पूणर जन्म मिळतो. म्हणूच असे मानले जाते कि मृत्यू वेळी मनात फक्त भगवंतांचे नामस्मरण करावे.

प्रत्येक जण आपल्या जीवनात चंगली आणि वाईट कामे करत असतात. मुत्यू नंतर सुद्धा मनुष्या सोबत चांगली आणि वाईट कर्मे सोबत जात असतात. भागवत गीता मध्ये असे संगितले आहे कि ज्या वेळी मृत्यू जवळ आला असेल त्या वेळी आपल्या सर्व कर्मे एकत्र केली जातात. आणि इथे केलेल्या कर्मा नुसार त्या आत्म्याला परलोकात सुख आणि दुःख मिळत असते. आणि त्या नुसार त्याला पुढील जन्माची प्राप्ती होत असते.

कर्ज हि एक वस्तू मागे मृत्यू नंतर येत असते. आपण या जन्मात जे काही कर्ज घेतले ते पूर्ण पणे फेडून टाकावे. अन्यथा ते आपल्या सोबाबत परलोकात येत असे. आणि जो पर्यंत आपली कर्जाची रक्कम पूर्ण होत नाही तोपर्यंत यातना मिळत असते. यामुळे कर्जाची परत फेड कसेही करून करावे. पाचवी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने केले पुण्य.

जो व्यक्ती आपल्या जीवनात जे काही दान धर्म करतो, इतरांना प्रत्येक वेळेस मदत करतो ते पुण्य काम आपल्या सोबत सतत रहात असते. आपण जितके जास्त पुण्य करतो तितकेच जास्त आपल्याला पुढच्या जीवनात त्याचा लाभ आपल्याला मिळत असते. आपल्या वाईट काळात आपल्याला सर्वात जास्त लाभ मिळतो ते म्हणजे आपण केलेली पुण्य पासून. म्हणून गरुड पुराणा नुसार या पाच पाच गोष्टी कडे आवश्य लक्ष द्यावे. आणि जिकते जास्त पुण्य आपल्याला करता येतील जितकी जास्त मदत दुसऱ्याला संकट काली करता येईल तितकी करत जावी.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट