ज्या लोकांना झोप पटकन लागत नाही त्यानी करावा हा उपाय. झोप लागण्यासाठी उपाय
लाईफस्टाईल

ज्या लोकांना झोप पटकन लागत नाही त्यानी करावा हा उपाय. झोप लागण्यासाठी उपाय

सध्याचे युग हे खुप फास्ट आहे. प्रत्येक जण या जगात पुढे जाण्याच्या तयारीत आहे. त्यसाठी लागणारी धावपळ किंवा अवेळी जेवण या सर्व गोष्टी लोक करत असतात. तसेच प्रत्येक व्यक्ती हा रोज नवीन स्पर्धेत भाग घेत असतो. त्यामुळे त्याला सतत परिश्रम करावे लागतात. या सततच्या सवयी मुळे आपण आपल्या शरीराकडे कधीच लक्ष देत नाही आणि त्यामुळे काही शरीरिक समस्या आपल्याला होतात.

शाररिक समस्या कोणत्याही स्वरूपाच्या असू शकतात काही लोकं जेवण कमी होणे, केसा संबंधित काही तक्रारी असू शकतात. तसेच पोटाचे काही विकार होऊ शकतात. या काही समस्यांमुळे इतर हि काही आजार आपल्याला होतात. व त्याचे गंभीर परिणाम पुढे दिसून येतात. हे परिणाम आपल्या खुप मोठ्या आजाराकडे घेऊन जातात. योग्य वेळेस त्यावर आपण काहीच उपाय केले नाही तर त्याचे गंभीर परिमाण आपल्या दिसून येतात.

त्याच बरोबर अवेळी केलेले जेवण, जास्त प्रमाण फास्ट फूड खाणे यामुळे पोटाच्या आणि झोपेच्या समस्या निर्माण होतात. आणि जर का झोप आपली पूर्ण होत नसेल तर खुप प्रकारचे इतर समस्या निर्माण होतात. हर का आपली झोप होत नसेल तर पित्ताचा त्रास सुरु होणे, शरीरातील साखरेचे संतुलन कमी जास्त होणे, रक्त दाबाचा त्रास सुद्धा होऊ शकतो. या पेक्षा तर समस्या सुद्धा तुम्हाला होऊ शकतात.

झोप योग्य रित्या पूर्ण झाली नाही, तर आरोग्य बिघडण्यास सुरवात होते. प्रत्येकाची झोपण्याची एक विशिष्ट्य वेळ असते. जर की ती वेळ टाळली तर पुन्हा झोप येत नाही. बरेच व्यक्ती झोपेच्या वेळी मोबाईल किंवा टीव्ही पहात रहातात आणि पुन्हा झोप लागत किंवा येत नाही. पुन्हा झोप लागत नसेल तर त्या साठी काही घरगुती उपाय आपण केले तर त्याचे खुप चागले लाभ आपल्याला मिळतात.

झोप लागण्यासाठी काही घरगुती उपाय. दूध जर रोज एक ग्लास रात्री गरम करून पिले तर रात्री झोप चागली लागते. तसेच दिवस भरात एकदा तरी दह्याचे सेवन करावे. अर्धा चमचा खसखस तोंडी खडी साखर आणि एक चमचा मध घेतले तर झोप खुप छान लागते. त्याच बरोबर रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा खाल्याने सुद्धा शांत झोप लागते. झोप लागण्यासाठी अजून एक सोपा उपाय असा.

ज्या लोकांना रात्री लवकर झोप येत नाही त्यांनी झोपेच्या काही मिनटं आधी गरम पाण्या मध्ये कडुलिबचे पाने किंवा तुळशीचे पाने टाकून अधोळ करावी या मुळे सुद्धा झोप लागते. तसेच काही लोकांना शाररिक कष्ट कमी आणि मानसिक त्रास किंवा सतत विनाकारण करत असलेला विचार यामुळे सुद्धा झोप लवकर लागत नाही. त्यामुळे रोज कमीत कमी वीस मिनिटे शाररिक व्यायाम करावा. हे काही उपाय करून पहा तुम्हला नक्की फरक जाणवेल. आणि रात्री लवकर झोप लागेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीचा वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट