धार्मिक

२६ मे गुरुवार अपरा एकादशी, घरात इथे ठेवा एक रुपयाचे नाणे पैश्यांचा पाऊस पडेल.

गुरुवारी २६ मे २०२२ दिवशी आलेली आहे अपरा एकादशी. मित्रांनो ह्या अपरा एकादशीच्या दिवशी आपण छोटे छोटे उपाय आपण अवश्य करा. हे उपाय आपल्या जीवनातील अनेक अडचणींपासून दूर करतील. मित्रांनो एकादशीचे व्रत हे भगवान श्री हरी विष्णूंचे व्रत आहे. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीस भगवान श्री हरीच्या कृपेने सर्व काही जीवनात मिळते. अपरा एकादशीचे महत्व असे आहे कि ह्या दिवशी जी कोणी व्यक्ती विष्णूंची विधिवत पूजा करते तिला हातून कळत नकळत घडलेल्या कर्मातून मुक्ती मिळते.

मित्रांनो वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात आलेल्या एकादशीला अपरा एकादशी असे म्हण्टले जाते. ह्यावर्षी हि एकादशी गुरुवारी आल्याने त्याचे महत्व किती तरी पटीने वाढले आहे, कारण गुरुवार हा भगवान हरी विष्णूंचा वार आहे, ह्या दिवशी आपण भगवान हरी विष्णूंची तर पूजा कराच परंतु जर तुमच्या घरात गरिबी असेल, काही आर्थिक अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण माता लक्ष्मीची देखील पूजा आपण ह्यादिवशी करावी. माता लक्ष्मीची कृपा त्यामुळे आपल्याला प्राप्त होते.

मित्रांनो आपण ह्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठावे किंवा आपण सूर्योदयाच्या आधी तरी किमान उठावे. ह्या एकादशीला जलक्रीडा एकादशी, अचला एकादशी अशी देखील नावे आहेत. ह्या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये शक्य असेल तर स्नान करावे नाहीतर आपण घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून अंघोळ करावी. ह्यामुळे आपल्याला हातून घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते.

तसेच आपण ह्यादिवशी दानधर्म देखील करावे अगदी आपल्या कुतवटीनुसार दान करावे. जर आपल्यावरती कर्ज असेल तर ते कर्ज लवकर फिटावे म्हणून आपण आपल्या घराच्या जवळील पिंपळाच्या झाडाखाली आपण एक तांब्या जल पाणी अर्पण करावे व ह्या दिवशी सायंकाळी एक तुपाचा दिवा आपण लावावा. हे सर्व करताना आपण ओम नमो भागवते वासुदेवाय ह्या विष्णूंच्या महामंत्राचा जप करावा.

आपण आपल्या घरात एक दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच पूर्व आणि उत्तर ह्यांच्या मधील दिशेला स्वच्छता करून आपण एक दिवा अवश्य प्रज्वलित करा कारण हि दिशा हि देवीदेवतांची दिशा मानण्यात येते. हा दिवा लावण्याआधी आपण त्याच्याखाली मूठभर तांदळाचे आसन द्यावे. ह्यामुळे घरातील आजारपण, घरातील नाकारात्मक शक्ती ह्यांचा वास राहत नाही. मित्रांनो ह्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र आपण बोलायचा आहे तो म्हणजे ओम नमो भागवते वासुदेवाय नमः त्यानंतर आपण आपली जी काही इच्छा असेल ती आपण बोलून दाखवा.

ज्यांना शक्य असेल त्यांनी शंखाने जलाभिषेख करावा, म्हणजे आपण शंखात पाणी भरून त्याने मूर्तीवर किंवा त्यांच्या फोटोवर पाणी सोडायचे आहे, ह्यामुळे आपले भाग्य प्रबळ बनते. त्यांना नैवेद्य म्हणून आपण खीर दाखवा आणि ते दाखवताना आपण त्यावर तुळशीचे पान आपण त्यावर नक्की ठेवा. कारण तुळस हि हरिप्रिया आहे. म्हणूनच आपण आपल्या घरात तुळस हि असायलाच हवी.

ज्यांच्या कुंडलीत गुरु ग्रह अशुभ फळे देतो आहे त्यांनी ह्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले व वस्त्र अर्पण करावे. तसेच आपला गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी किंवा ज्यांच्या घरात दरिद्री आहे त्यांच्यासाठी एक उपाय आपण सांगत आहोत. एक रुपयाचे नाणे आपण घ्याचे आहे. ते आपण भगवान हरी विष्णूंसमोर ठेवायचा आहे, घरात गंगाजल असेल तर त्याने तो पहिला धुवून घ्यावा. त्यानंतर आपण तो सिक्का आपण माता लक्ष्मी व विष्णूच्या फोटोसमोर ठेवायचा आहे.

माता लक्ष्मीला प्रार्थना करा कि आपल्या घरातील गरिबी दूर होऊदे म्हणून प्रार्थना करा, त्यानंतर आपण पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सिक्का आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पाकीटात आपण जपून ठेवायचा आहे. मित्रांनो मनोभावे आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील गरिबी दूर होते, घरातील पैसा वाढत जातो. अगदी काही दिवसातच तुम्हाला ह्याचा फरक दिसेल. हा उपाय करत असताना माता लक्ष्मीच्या ओम श्रीमं नमः ह्या मंत्राचा जप करावा.ह्या मंत्राचा जप आपण १०८ वेळा करावा. हे सर्व छोटे छोटे उपाय आपण जर केले तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट