लाईफस्टाईल

२८ ऑक्टोबर गुरुवार गुरुपुष्यामृत योग, करा हा एक छोटासा उपाय लक्ष्मी धावत येईल घरी.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो २८ ऑक्टोबर २०२१ रोजी गुरुवारचा दिवस आणि ह्या दिवशी आला आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुवारी सकाळी ९:४० मिनीटांनी सुरु होत आहे आणि दुसऱ्या दिवशी ६:४० मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. ज्योतिषशास्त्र आणि हिंदुधर्मशास्त्रानुसार हा दुर्लभ संयोग मानला जातो. ह्या दिवशी लवकर उठून सर्व स्नान वगरे करून आपल्या दारासमोर एक सुंदर अशी रांगोळी रेखाटावी. आपल्या मुख्य दरवाजावर एक स्वस्तिक देखील नक्की काढा.

कुंकवाचा किंवा हळदीचा वापर करून काढलेले हे स्वस्तिक माता लक्ष्मीस आकर्षित करते. मित्रांनो ह्या दिवशी माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी लाक्षिमीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या देवघरात श्री यंत्राची स्थापना नक्की करा. आपण जर आणखी केली नसेल तर आपण ह्या गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ योग आहे आणि ह्या दिवसात स्थापन केलेली श्री यंत्र माता लक्ष्मीस प्रसन्न करते.

विशेषकरून धनलाभासाठी हे श्री यंत्र अत्यंत शुभ मानले जाते सोबतच जर तुमच्या घरात वादविवाद होत असतील भांडणे होत असतील मानसिक अशांतता असेल तर मानसिक शांती प्रस्थापित करण्यासाठी ह्या गुरुपुष्यामृत योगमध्ये भगवान शंकरांची आणि त्यासोबत पार्वती माता तसेच गणेश व कार्तिकेय ह्यांची पूजा करावी.

सोबतच आपण पिवळ्या रंगाची मिठाई दान करा त्यामुळे सर्व अशांत ग्रह शांत होतोत आणि मानसिक शांतता घरात प्रस्थापित होते. मित्रांनो गुरुपुष्यामृत योग आहे आणि ह्या दिवशी केलेली माता लक्ष्मीची पूजा हि विशेष फलदायी असते. आपण माता लक्ष्मीला कमळाचे फुल आणि सफेद मिठाई नक्की अर्पण करा.मित्रांनो कोणताही उपाय करताना त्यासोबत काही मंत्रांचा जप केला तर त्या उपायाचे फळ खूप लवकर भेटते.

ह्या गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी पूजन करताना तुमच्या घरात कमलगठ्याची माळ असेल कमलगट्ठा म्हणजे कमळाच्या बिया ह्यावर आपण १०८ वेळा नक्की जप करा. हि नसेल तर सेफ्टीक किंवा तुळशीची माळा असेल तरी चालेल. मंत्र आहे ॐ श्री ह्रीं दारिद्र्य विनाशने धनधान्य समृद्धी देही देही नमः ! हा मंत्र जप करून मातेजवळ प्रार्थना करा आपल्याला धनाचे नवनवीन योग येतील.

जी आपण रांगोळी घरासमोर काढलेली आहे त्या रांगोळीवर हळदी कुंकू टाकण्यास विसरू नका. कारण ह्या छोट्या गोष्टी लक्ष्मीला आकर्षित करतात. मित्रांनो ह्या दिवशी पतिपत्नी ह्यांनी दोघांनी मिळून एक छोटीशी गोष्ट नक्की करा. ह्या दिवशी दोघांनीही एखादा सोन्याचा दागिणा धारण करून भगवान शंकरांची ह्या दिवशी पूजा करावी. पूजा करताना पिवळ्या रंगाचा कपडा अंथरावा व त्यावर लाल चंदन ठेवून आपण पूजा करायची आहे. पूजा संपन्न झाल्यावर आपण त्या कपड्याची पुरचुंडी बांधून आपण ती पुरचुंडी आपण आपल्या तिजोरीत ठेवून द्याची आहे.

मित्रांनो हा छोटासा उपाय आपल्या घरात पैसे टिकवून ठेवतो. विनाकारण पैसा जो जातो तो खर्च होत नाही, पैस्यात सातत्याने वाढ होते. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट