धार्मिक

२८ एप्रिल गुरुवार स्वामी पुण्यतिथी, स्वामींना गुरु बनवा हे नियम पाळून.

मित्रांनो स्वामींची कृपा आपल्यावरती रहावी, घरात त्यांच्या आशीर्वादाने सुख समृद्धी राहावी, त्यांची कृपा आपल्यावरती राहावी ह्यासाठी स्वामींची सेवा आपण करत असतो. मित्रांनो स्वामींना गुरु करून घ्याचे असेल तर त्यांना गुरु करून घेण्याचा सर्वात चांगला दिवस कोणता त्याचबरोबर स्वामींना गुरु करण्याचे कोणते नियम आहेत का, स्वामींना गुरू केल्यावर आपल्याला कोणते नियम पाळायला लागतात. आजच्या लेखात आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

मित्रांनो स्वामींना गुरु करून घेण्यासाठी दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, आणि स्वामींची पुण्यतिथी हे शुभ दिवस स्वामींना गुरु करण्यासाठी मानले जातात. मित्रांनो आपल्या सर्वाना देखील माहितीच आहेकि स्वामींची २८ एप्रिल गुरुवारच्या दिवशी स्वामींची पुण्य तिथी आहे.

म्हणूनच स्वामींना गुरु करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे, म्हणूनच मित्रांनो आपण स्वामींच्या पुण्यतिथीदिवशी त्यांना गुरु करून घेण्याचा जर विचार असेल तर अश्या वेळी तुम्हाला काही नियम देखील तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊयात ते नियम कोणते आहेत.

मित्रांनो स्वामींना गुरु करण्यासाठी लागणाऱ्या नियम आहेत त्यातील पहिला नियम म्हणजे सर्वात आधी तुम्हाला सर्व वाईट गोष्टींचा त्याग करावा लागेल, तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर त्याचा त्याग आपल्याला करावा लागेल. मनात वाईट विचार आणणे, इतरांशी वाईट कर्म करणे, फसवणूक करणे अश्या सर्व वाईट गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस स्वामींना गुरु करून घेण्यासाठी निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या दिवशी आपण एक छोटीशी सेवा स्वामींच्या समोर बसून करायची आहे.

मित्रांनो हि सेवा करण्यापूर्वी आपण सकाळी ह्या दिवशी स्नान करून आपण एक लाल रंगाचा एक धागा आपण बाजारातून आणायचा आहे. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून आपण सर्वप्रथम त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यानंतर स्वामींच्या प्रतिमेसमोर आपण एक तुपाचा दिवा लावावा त्यानंतर अगरबत्ती ओवाळावी, व नंतर आपण स्वामींच्या श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा किमान ११ वेळा जप करायचा आहे.

जप करून झाल्यावर आपण स्वामींना नमस्कार करावा, स्वामींकडे त्यांना आपण त्यांचे शिष्य व ते आपले गुरु आहेत आणि आजपासून तुम्ही जो मार्ग दाखवाल त्या मार्गावर मी चालेन मी सर्व वाईट गोष्टींचा त्याग करत आहे. तुमची सेवा करण्याची संधी मला अवश्य द्या अश्या पद्धीतिने आपण स्वामींसमोर बसून प्रार्थना करायची आहे. स्वामींसमोर बसून तुम्हाला हा दोरा आपण आपल्या हातात बांधायचा आहे. अश्या पद्दतीने हि छोटीशी सेवा आपण स्वामींची करायची आहे.

ह्या दिवसांपासून तुमचे गुरु हे स्वामी व स्वामींचे शिष्य तुम्ही हे तुमच्या लक्षात ठेवायचे आहे. ह्या दिवसापासून पुढे तुम्हाला दिवसातून थोडा वेळ तरी काढायचा आहे. आणि दररोज तुम्हाला स्वामींच्या कोणत्याही मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे.

अगदी दिवसात तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामींच्या श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट