To get the full fruit of worship
धार्मिक

देवपूजेचे संपूर्ण फळ मिळण्यासाठी पूजा झाल्यावर आठवणीने करा हे कार्य.

प्रत्येकाला वाटत असते कि आपल्या घरावर देवाची कृपा असायला हवी. आपण रोज पूजा करतो पूजा करताना प्रत्येक गोष्ट हि काळजीपूर्वक करतो कोणतीच चूक होणार नाही याची काळजी घेत असतो. पण बऱ्याच जणांना हे माहित नाही आपली देवा पूजा झाल्यावर काय करायला हवे. न विसरत देव पूजा झाल्यावर करा हे कार्य आपल्या त्या देवपूजेचे नक्की मिळेल संपूर्ण फळ.

आज आपण देव पूजा झाल्यावर काय करायला हवे आणि देव पूजा करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली गेली पाहिजे या बद्दल आपण माहिती थोडी अजून जाणून घेणार आहोत. आधीच्या लेखात आपण पूजन करताना कोणत्या गोष्टीची काळजी अवश्य घायला हवी या बदल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. तरी सुद्धा काही अजून पण थोडक्यात जाणून घेऊ.

बऱ्याच जणांना एक प्रश्न नेहमी येत असतो कि पूजा झाल्यावर जे निर्माल्य आहे. त्याचे काय करायचे. ज्यांना काहीच माहिती नसते आशे लोक हे निर्माल्य कचऱ्यात टाकून देतात. असे न करता जे काही निर्माल्य तयार होते ते एखाद्या वाहत्या पाण्यात सोडून द्या. नदी, छोटासा ओढा किंवा एखादे तळे असेल तरी चालेल. जर का या पैकी काहीच आपल्या जवळ नसेल तर काय करावे तर आपल्या एखाद्या जवळच्या कोणत्याही झाडाखाली एक छोटासा खड्डा करून हे सर्व निर्माल्य त्या खड्ड्यात टाकून त्यावर माती टाकावी. किंवा आपल्या घरातील एखाद्या कुंडीत सर्व निर्माल्य टाकून त्यात माती भरून ठेवावी. पण एक लक्ष्यात असुद्या कचऱ्यात निर्माल्य टाकुनये.

बऱ्याच जणांना एक प्रश्न सर्वाना पडतो त्या पैकी अजून एक म्हणजे अंगठय जवळील जे बोट आहे त्याचा वापर पूजा करताना वापरूनये. आपल्या धर्म शास्त्रात कोणतेही शुभ कार्या करताना तर्जनी म्हणजेच अंगठ्या जवळील बोट वापरले जाऊनये असे सांगितले आहे. त्यामुळे देवपूजा करताना अनामिका म्हणजेच करंगळी आणि मधले (मोठे) बोट या दोघाच्या मधील बोट वापरावे.

पुष्प शुद्धी करण्याची गरज आहे का देवपूजा करण्या आधी. पुष्प शुद्धी करण्याची गरज नसते. तरी पण एक गोष्टीशी गोष्ट अवश्य करावी त्या एका ताटात फुले घ्यावीत आणि त्या फुलावर थोडे पाणी शिपडून थोडे गंध लावावे आणि त्या नंतर ते देवाला अपूर्ण करावे. तसेच बरेच जण देवाला फुलांच्या कळ्या अर्पण करतात. कळ्या अर्पण करण्या पेक्ष्या फुलेच अर्पण करावीत.

आजची महत्वाची गोष्ट देवपूजा केल्यावर आवर्जून हे कार्य नक्की करा. बरच जण देव पूजा झाली कि लगेच उठून जातात तसेच देवपूजा पूर्ण होण्याच्या वेळेस लक्ष हे दुसरी कडे असते. काही वेळेस तर देवपूजा करताना काय काय केले ते सुद्धा आठवत नाही. त्यामुळे कधीपण देवपूजा पूर्ण झाल्यावर एक ते दोन मिनटं डोळे बंद करून देवाचे नामस्मरण करावे. तसेच आपल्या कुलदैवत आहे त्याचे सुद्धा स्मरण करावे. आणि पूजा पूर्ण झाल्यावर स्वतः भवती प्रदक्षणा पूर्ण करावी.

आपण पहिले असेल देवपूजा झाल्यावर लगेच आपण त्या जागेवरून उठून जातो. तसे नकरता थोडावेळ डोळे बंद करून देवाचे नामस्मरण नक्की करावे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट