धार्मिक

घराच्या घरी ब्राह्मण न बोलावता तुळशीचा विवाह कसा करावा, ते घ्या जाणून.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. दिवाळी झाली आणि आता आपल्याला तुळशी विवाहाची ओढ लागली आहे कारण आपल्या हिंदू धर्मात विवाह झाल्याशिवाय विवाहसोहळे साजरे केले जात नाहीत. म्हणजेच तुळशीचा विवाह एकदा संपन्न झाला कि लग्नाच्या तारखा निगतात. आपल्याकडे घरोघरी तुळस असते आणि तिचा विवाहसोहळा प्रेत्येक घरी साजरा केला जातो आजच्या लेखात आपण तुळशीच्या विवाहाचा शुभ मुहूर्त त्याची योग्य वेळ व पूजा विधी आपण पाहणार आहोत.

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात जी कार्तिकी एकादशी येते तिला आपण देवउठी एकादशी देखील म्हणतो त्या एकादशीला तुळशीचा विवाह लावला जातो. हा एक अध्यात्मिक उत्सव आहे. हिंदुमान्यतेनुसार ह्या दिवशी तुळशीचा विवाह श्री हरी विष्णूनसोबत लावला जातो कारण विष्णुदेव ह्यावेळी ४ महिन्यातून उठतात.

श्री हरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीला एक नाव वृदां देखील आहे. ज्या वेळी नारायण निद्रेतून जागे होतात त्या वेळी सर्वात आधी ते हरी वल्लभा तुळशीचे म्हणणे ऐकतात. म्हणून तुळशीविवाहाला देवजागरनाचा पवित्र मुहूर्त मानले जाते.

ह्या वर्षी तुळशी विवाह १५ नोव्हेंबर पासून सुरवात होत आहे. तुळशी विवाह लावल्याने कन्यादानाचे फळ प्राप्त होते. आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार गोदान व कन्यादान सर्वात मोठे दान मानले जाते म्हणून तुळशी विवाह करणे अत्यंत आवश्यक आहे.

तुळशी विवाह शालिग्राम ठेवून संपूर्ण विधिपूर्वक केले जाते परंतु काही व्यक्ती घरी ब्राह्मणाला बोलावून किंवा मंदिरात जाऊन तुळशी विवाह करू शकत नाही म्हणून आपण आजच्या लेखात घराच्या घरी ब्राह्मण न बोलावता कश्या प्रकारे तुळशीचे लग्न करू शकतो हे पाहणार आहोत.

सर्वात आधी कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे ते पाहुयात. एक तांब्या, नारळ, आंब्याची पाने, पाणी, लाल रंगाची ओढणी, पिवळे कापड, गंगेचे पाणी, पांढरे तीळ, हळद, कुंकू, कापूर, धूप, दीप, ऊस, वेलची, सुपारी, श्रुंगाराच्या वस्तू, पाच फळे, आवळा, एखाद्या प्रकारची मिठाई, खीरपुरी, पंचामृत, मसाला पान, फुलांच्या माळा, तुळशीची कुंडी, शालिग्राम आणि दोन चौरंग हि सर्व सामग्री घेऊन आपण तुळशीच्या विवाहाची तयारी करावी.

हे पण वाचा :-  १० जून शनी जयंती महासंयोग, करा ह्या वस्तूंचे दान मिळेल प्रेत्येक कामात यश.

त्यानंतर विवाह विधीची तयारी करावी, विवाह हा सायंकाळी गोरखमुहूर्तवर केला जातो त्यासाठी तुळशीच्या आसपासची जागा स्वच्छ करूंन सुंदर रांगोळी काढावी. त्यानंतर एका चौरंगावर तुळस असलेली कुंडी व दुसऱ्या चौरंगावर शालिग्रामची किंवा श्री विष्णूंची स्थापना करावी. वरती उसाचा मंडप टाकावा.

तुळशीच्या चौरंग उजव्या बाजूला ठेवावा, त्यानंतर श्री हरी विष्णूंच्या चौरंगावर अष्टदल कमळ बनवावे आणि त्यानंतर त्यावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवून त्यावर स्वस्तिक काढावे. आंब्याच्या पानांना कुंकू लावून ती पाने कलशावर ठेवावीत.

त्यानंतर एक नारळ घेऊन ते लाल कपड्यात गुंडाळावे व कलशावर ठेवावे. त्यानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. कारण अग्नीला साक्षी मानूनच तुळशीचा विवाह संपन्न केला जातो. त्यानंतर गंगेच्या पाण्यात एक फुल बुडवून ते पाणी ओम श्री तुळसीए नमः अश्या मंत्राचा जप करत तुळशीवर शिंपडावे.

त्यानंतर त्याच फुलाने गंगेचे पाणी ओम नमो भागवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करत श्री हरी विष्णूनंवर शिंपडावे. त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू व हरी विष्णूंना चंदनाचा तिला लावावा. त्यानंतर दुधात हळद टाकून दोघांना लावावी. त्यानंतर विष्णूंना तुळशीच्या मंजिरा व्हाव्यात. तुळशीला लाल ओढणी टाकावी, व लाला रंगाच्या बांगड्या देखील अर्पण कराव्यात, तसेच सर्व सौभाग्याचा वस्तू अर्पण कराव्यात.

त्यानंतर हरी विष्णूंना स्नान घालून पिवळे वस्त्र अर्पण करावीत. पिवळे फुल वाहावे, त्यानंतर श्री हरी विष्णूंना व तुळशीला माळा अर्पण कराव्यात. त्यानंतर लाल वस्त्र घेऊन त्यांचे गठबंधन करावे, त्या कपड्यात एका बाजूला फुल, वेलची, सुपारी, व दक्षिणा ठेवावी. त्यानंतर घरातील पुरुषाने तुळस असलेली कुंडी उचलून शालिग्राम किंवा कृष्णाच्या मूर्तीला सात प्रदिक्षणा घालाव्यात सात प्रदिक्षणा झाल्यानंतर तुळशीला तिच्या ठिकाणी स्थानापन्न करावे. त्यानंतर शाळीग्राम ला धूपदीप अर्पण करून फळे खीरपुरी मिठाई ह्यांचा नैवद्य दाखवावा.

त्यानंतर तुळशीची व विष्णूंची आरती करावी. अश्या प्रकारे सध्या व सोप्या पद्धतीने तुळशी विवाह तुम्ही घराच्या घरी संपन्न करू शकता. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

हे पण वाचा :-  देवशयनी आषाढी एकादशी नक्की करा ह्या ५ पैकी एक उपाय, मनासारखे घडेल.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.