धार्मिक

तुळशीसमोर दिवा लावताना हि एक चूक करू नका, घरात गरिबी येईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो सायंकाळ होताच आपल्या प्रेत्येकाच्या घरात दिवाबत्ती होते. आपल्या देवघरात एक आणि माता तुळशीपाशी एक असे दोन दिवे नक्की लावले जातात. हिंदू धर्मशास्त्र असे मानते कि ज्या घरात माता तुळशीसमोर जेव्हा दिवा लावला जातो त्या घरात दरिद्रता, कंगाली, गरिबी नावालाही उरत नाही थोडक्यात अश्या घरात माता लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो. मात्र आपण पाहतो कि अनेक लोक ह्या नियमांचे पालन करूनसुद्धा त्यांना त्याचे फळ मिळत नाही. त्यांच्या घरात गरिबी हि कायम टिकून राहते. त्यांच्या घरात पैसा येत नाही.

अश्या वेळी दिवा लावताना आपल्या हातून काही चुका तर होत नाहीत ना ह्याकडे आपण लक्ष द्याला हवे. हिंदूधर्मशास्त्र मध्ये दिवा लावण्याचे आणि त्यातल्या त्यात तुळशीसमोर दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत. मित्रांनो तुळस हि औषधी गुणधर्मांनी युक्त असते. आयुर्वेदात तिचे मोठे माहात्म्य आहे. म्हणून आपण आपल्या प्रेत्येकाच्या घरात तुळशीचे रोप लावावे. तुळस हि हिंदी धर्मशास्त्राप्रमाणे लक्ष्मी स्वरूप देखील आहे म्हणजे ज्या घरात तुळस असते त्या घरात लक्ष्मी देखील वास करते. आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी असते त्या ठिकाणी धन, वैभव, पैसा सर्व काही असते.

मित्रांनो सायंकाळी दिवा लावल्यानंतर घरातील दारिद्र्य अलक्ष्मी निघून जाते मात्र आपण हा दिवा लावताना काही गोष्टींचे पालन आपण अवश्य करा जसे कि ह्या दिव्याला विशेष असे आसन असणे महत्वाचे असते. आणि आसन देण्यासाठी सर्वात चांगली वस्तू आहे अक्षत म्हणजेच न तुटलेले फुटलेले तांदूळ. जर आपण असणं म्हणून ठेवले तर आपल्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो. तसेच अक्षत हे शुद्धतेचे व संपूर्णेतेचे प्रतीक आहेत म्हणून आपण एका प्लेट मध्ये तांदूळ घेऊन त्यावर आपण हा तेलाचा दिवा आपण प्रज्वलित करावा.

आणि हो दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची वाट हि आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला किंवा ह्यांच्या मधील ईशान्य दिशेला राहील ह्याची आपण काळजी घ्यावी. अनेकजण तुपाचा दिव्याचा आग्रह धरतात पण ते तूप गाईचे असेल तरच तुपाचा दिवा लावावा नाहीतर आपण तेलाचा वापर करणे चांगले ठरेल.

माता तुळशीची पूजा करत असताना आपण ह्या मंत्राचा जप नक्की करा मंत्र आहे ओम नमो भागवते वासुदेवाय ! ह्याचा जप अवश्य करावा आणि आपली जी काही इच्छा आले ती आपण माता तुळशी समोर अवश्य बोलावी. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट