फूड

तूप कढवलेल्या बेरीचे उययोग व त्याचे फायदे.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण तूप कढवत असताना निघणाऱ्या बेरीचे काही महत्वपूर्ण उपयोग जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपण लोण्यापासून आपण तूप बनवतो आणि जो शिल्लक राहिलेला भाग आहे त्याला आपण बेरी असे म्हणतात. पूर्वी मुले हि बेरी अगदी आवडीने खायची मात्र आजकाल हे खायला नाकारतात. हि बेरी खूप जास्त पौष्टिक असते तुपापासूनच बनलेली असते, हि कोणाला देता हि येत नाही व फेकता हि येत नाही.

मित्रांनो तूप कढवत असताना आपण वेलची टाकतो जेणेकरून आपल्या तुपाला सुंगध येईल, आज आपन एक मस्त पदार्थ बनवण्यासाठी लागणारी कृती आपण आज सांगत आहोत हा पदार्थ अगदी इतका टेस्टी बनतो कि सर्व अगदीच आवडीने खातील व पुन्हा पुन्हा मागतील. तर ह्या बेरीत आपण गव्हाचे पीठ मिक्स करायचे आहे. जितके आपली बेरी निघाली आहे तितकेच आपण गहूचे पीठ घ्याचे आहे. कारण त्यात नंतर तूप टाकण्याची गरज नाहीए. त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण एका भांडण्यात घेऊन आपण ते लो फ्लेम वरती भाजून घ्याचे आहे.

पीठ खुसखुशीत भाजून घेतल्यानंतर आपण त्यात पिठी साखर त्यात टाकायची आहे. मित्रांनो तुम्हाला आता समजले असेलच कि हा पदार्थ कोणता आहे तो, पदार्थ आपण बनवत आहोत तो आहे बेरीचे लाडू, तूप काढवताना आपण वेलची टाकली असेल तर त्यात नंतर आपण वेलची टाकू नका, हवं तर तुही त्यात नंतर जायफळ थोडेसे टाकू शकता. तर अश्या प्रकारे आपण जे भाजलेले पीठ थोडेसे गरम असते थोडेसे ते गार झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे लाडू बांधून घ्याचे आहेत.

मित्रांनो आजपासून जर तुम्हाला ह्या बेरीचे काय करायचे प्रश्न पडला असेल तर हा लाडू तुम्ही अवश्य बनवा. मित्रांनो आणखी एक पदार्थ आपण ह्या बेरीचा बनवू शकतो, कारण एखाद्याला लाडू खायला आवडत नसतील त्यांनी हा दुसरा पदार्थ नक्की करून पहा. बेरी ज्या पातेल्यात राहिली आहे त्यात आपण थोडेसे पाणी टाकून ते पाणी आपण उकळून घ्याचे आहे आणि उकळलेले हे पाणी आपण एका भांड्यात काढून घ्याचे आहे.

मग हे भांडे आपण गाळून घ्यावे नंतर हे पाणी आपण फ्रीझ मध्ये ठेवून द्याचे आहे ह्याचे कारण म्हणजे जे खाली पाणी साचलेले राहील व वर तुपाचा तवंग राहील. थंड झालेले तूप आपण वर वर काढून घ्याचे आहे नंतर तुम्ही हे तूप पोळ्यांवर लावायला वापरू शकता. त्यानंतर आपण बेरी आपण खात असाल तर त्यात आपण थोडे दूध व साखर टाकायची आहे. आणि व्यवस्थित आपण गॅस वरती आपण हे मिश्रण मिक्स करून तापवून घ्याचे आहे. जितकी बेरी आहे तिच्या निम्मी आपण साखर घ्याचि आहे.

दूध जोपर्यंत आटत नाही तोपर्यत हे मिश्रण आपण हलवायचे आहे, कॅडबरी सारखे ह्याचे मिश्रण तयार होते, हे नंतर आपण बाउल मध्ये काढून घ्याचे आहे व ते फ्रीझ मध्ये आपण ठेवून द्याचे आहे. नंतर आपण त्याच्या कॅडबरी सारख्या वड्या बनवायच्या आहेत. खूप छान चवीला लागते नक्की करून पहा. तर मित्रांनो हे सर्व बेरीचे पदार्थ कसे वाटले हे आम्हाला कंमेंट करून कळवा तसेच लेख आवडला असेल तर तो लाइक व शेयर नक्की करा, धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट