धार्मिक

वाळलेली तुळशीचा करा असा वापर, सर्व अपूर्ण कामे होतील पूर्ण.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदुधर्मात तुळशीचे फार महत्व आहे तुळशीला आपण देवीचे स्थान आहे म्हणूनच हिंदू धर्मातील सर्वांच्या घरी दारात तुळस हि असतेच. तुळस हि आपल्या जीवनात फार महत्वाची आहे, तिचे धार्मिक तसेच आरोग्यदायी देखील खूप फायदे आहेत. आपल्या दरातील तुळस हि हिरवीगार व बहरलेली असावी ह्यसाठी आपले प्रयत्न चाललेले असतात.

आपण सकाळी व संध्यकाळी तिची पूजा करतो संध्यकाळी आपण तिच्या समोर दिवा लावतो. दररोज तुळशीला आपण पाणी अर्पण करतो अश्या प्रकारे आपण जेवढी करता येईल तितकी आपण तुळशीची काळजी घेत असतो. परंतु कधी कधी दरातील तुळस सुकून जाते अश्या वेळी त्या तुळशीचे आपण काय करावे हे आपल्याला माहिती नसते. वाळलेली तुळस हि दारात कधीही ठेवू नये म्हणून दरातील तुळस वाळली असेल तर ती दारातून लगेच काढून टाकावी.

जर तुळस हिरवीगार असेल परंतु वरवर तिच्या कढ्या म्हजेच मंजुळा सुकल्या असतील तर अश्या कोरड्या सुकलेल्या काड्या आपण अलगत तोडून घ्याव्यात व त्या सांभाळून ठेवाव्यात आणि जर संपूर्ण तुळस वाळलेली असेल तर तीही तिथून काढून घ्यावी आणि त्या ठिकाणी आपण नवीन रोप तुळशीचे लावावे. वाळलेली तुळस कधीही कुठे टाकू नये किंवा त्यांना विसर्जित देखील करू नयेत तर त्यांच्या कांद्यांना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे व नंतर आपण त्या वाळवून घ्याव्यात व त्यानंतर आपण त्यांची पावडर करून घ्यावी.

आपण दररोज पूजा करतो त्या पूजेत आपण भगवान श्री हरी विष्णूंना चंदनाचा टिळा लावतो. तर अश्या चंदनामध्ये आपण तुळशिची पावडर थोडीशी टाकून आपण तसा टिळा आपण भगवान श्री हरी विष्णूंना लावावा, कारण त्यांना तुळस हि अतिशय प्रिय आहे. अगदी त्यांना अर्पण केलेला नैवद्य देखील ते स्वीकारत नाहीत जर त्यावर आपण तुळशी पत्र ठेवले नाही तर, इतके तुळशीचे महत्व आहे तुळशीचे विष्णूंच्या पूजनात. म्हणून आपण पूजनात आपण तुळशीच्या काड्यांची पावडर मिक्स करून जर टिळा लावला तर भगवंत लवकर प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद आपल्याला देतात.

हे पण वाचा :-  ४ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन गुपचूप घरात घेऊन या हि एक वनस्पती पैसा इतका येईल कि.

भगवंत आपल्या पूजनाचा स्वीकार करतात तसेच दररोज सकाळी भगवंतांचे पूजन झाल्यानंतर घरातील सदस्यांनी देखील असा टिळा आपण कपाळी लावावा. ह्यामुळे आपले मन शांत राहते. आपल्यामध्ये सकारात्मकता येते, आपला आत्मविश्वास वाढतो, आपले मन एकाग्र होते व कामात लक्ष लागते. जर आपली तुळस खूप मोठी असेल आणि त्यापासून बनवलेली पावडर जर जास्त झालेली असेल तर अश्या वेळी आपण एक चमचा पावडर मध्ये एक चमचा मध मिक्स करून ती आपण दररोज पाण्यातून प्यावी.

ह्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच काही मानसिक समस्या असतील तर त्या सर्व ह्या उपायाने निघून जातील तसेच आपल्यामध्ये काही नाकारत्मकता भरलेली असेल तर तीही नष्ट होते. मनाला शांतता लाभेल, आत्मविश्वास वाढेल. तर आजच्या लेखात आपल्याला समजले असेल कि वाळलेली तुळस दारात असेल तर तिचा योग्य वापर कसा करायचा ते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.