घरगुती उपाय

आंध्रा पद्धतीचे तेल रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा, केस लांबसडक व काळे होतील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आजच्या लेखात एक खास तेलाबद्दल आंध्रा कढील विशेष तेलाबद्दल जाणून घेणार आहोत. हे तेल आपण रात्री झोपताना लावा एकही केस गळणार नाही केस काळे व लांबसडक होतील. केस मऊ होतील तुम्हालाच झालेला बदल जाणून आश्चर्य जाणवेल.

मित्रांनो आपल्याला कधी ना कधी ह्या समस्येला सामोरे जाव लागते, ते म्हणजे केस गळणे. आणि एकदा का केस गळती सुरु झाली कि त्यावर तुम्ही कितीही उपचार घ्या ती लवकर थांबत नाही. मित्रांनो अश्या सर्व लोकांसाठी ज्यांचे केस गळतात किंवा विरळ झाले आहेत अश्या सर्वांसाठी आजचा उपाय खूप खास आहे. केस दाट होतात केस काळे व लांबसडक होतात अशे हे परिणामकारक तेल आहे.

मित्रांनो हे तेल बनवण्यासाठी आपल्याला ५ ते ६ घटक लागणारे आहेत आणि हे सर्व घटक आपल्या घरीच उपलब्ध असतात चला तर जाणून घेऊयात. पहिला घटक म्हणजे खोबरेल तेल साधारण ५० ग्राम किंवा एक वाटी ह्या नारळाच्या तेलात व्हिटॅमिन इ असते आणि हे केसांच्या मुळांना आतून मजबूत करते. हे तेल आपण मंद आचेवर गॅस वरती एका भांड्यात ठेवायचे आहे. त्यानंतर दुसरा घटक आपण वापरणार आहोत ते म्हणजे जास्वंदीचे ४-५ पाने मग ती कोणत्याही कलर ची जास्वंद असूद्यात चालेल. ती आपण तोडून त्या गरम होत असलेल्या तेलात टाकायची आहेत.

तिसरा जो घटक आहे तो म्हणजे जास्वंदीची फुले साधारण ५ फुले आपण त्याचा चुरगुळून त्या तेलात टाकायची आहे ह्यामध्ये अमिनो ऍसिडस् असतात ज्यांना टक्कल पडलेले असेल त्या ठिकाणी ह्या फुलांचा रस चोळून लावावा आणि त्या जागी जिरवा अश्या केल्याने त्या भागात नवीन केस येतात. अशी हि ५ फुले आपण तोडून त्या तेलात टाकायची आहेत.

हे पण वाचा :-  भीमसेनी कापराचे फायदे व उपाय.

आता चौथा घटक आपण ह्यात घेणार आहोत ते म्हणजे तुळसीची माध्यम आकाराची ८- १० पाने तीही आपण तुकडे करून त्या तेलात टाकावी ह्यामुळे आपले केस लांब व जाडसर होतात. तसेच केसातील कोंढा ह्या पानांमुळे कमी होतो. त्यानंतर पाचवा घटक आपण त्यात वापरणार आहोत ती म्हणजे कडीपत्त्याची १० पाने हयामुळे केस काळे होतात. तसेच केसांना चकाकी येते. त्याच्या पानात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात जे केसांना बाहेरून पोषण करतात.

ह्यानंतर आपण ह्यात १ चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत मेथीचे दाणे आपल्या डोक्याची त्वचेला पोषण देऊन केसांची मुळे मजबूत करतात. व लास्ट आपण यात घटक टाकणार आहोत जो कि आवळा जो कि सर्वात महत्वाचा घटक आहे, ह्यामध्ये व्हिटॅमिन सि, इ असतात अश्या आवळ्याचे आपण साधारण १० तुकडे आपण ह्या मिश्रणात वापरणार आहोत. अशे हे सर्व मिश्रण रंग बदलूपर्यंत मंद आचेवर गरम होऊन द्यावे व नंतर ते आपण गॅस बंद करून ते मिश्रण तसेच २ दिवस तसेच ठेवावे व नंतर आपण हे मिश्रण काचेच्या बाटलीत काढून ठेवावे.

रोज रात्री झोपताना केसांच्या मुळांपासुन आपण हे लावावे आपल्याला काही दिवसातच फरक जाणवेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.