घरगुती उपाय

आपल्या घरातील हि एक वस्तू पाण्यात टाकून केस धुवा, केस गळती लगेच थांबेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो प्रेत्येक व्यक्तीचे सौंदर्य वाढवण्यात केस हे अतिशय महत्वाची भूमिका असते आणि हे केस जसे जसे गळू लागतात तसे अनेक लोक उदास होतात नाराज होतात आणि त्यावर अनेक उपाय करतात तरीही काही परिणाम होत नाही, आजच्या लेखात आपण केस गळतीसाठी आज आपण एक खास उपाय सांगणार आहोत ह्या पाण्याने जर केस धुतले तर तुमचे केस गळती पूर्णपणे थांबेल.

मित्रांनो ह्या पाण्याने जर तुम्ही केस धुतले तर हे पाणी तुमच्या केसांसाठी संजीवनी ठरू शकते. मित्रांनो हा लेख वाचल्यानंतर मला खात्री आहे कि तुम्ही नक्कीच हा उपाय करून पाहणार चला तर जाणून घेऊयात. मित्रांनो आपण केस विंचरण्यासाठी ह्याचा त्याचा कंगवा आपण वापरत असतो किंवा बऱ्याच ठिकाणी घरामध्ये सर्वजण एकच कंगवा वापरत असतात. आणि केस गाळातील मुख्य सुरवात तिथूनच होते. हे एक प्रकारचं केस गळतीसाठी आमंत्रण दिल्या सारखेच आहे.

केस गाळण्यासाठी अनेक करणे असतात जसे कि रात्रीचे जागरण, ताणतणाव, अंघोळ करताना गरम पाणी वापरणे ज्यामुळे केस कोरडी होतात व तुटतात. त्याचप्रकारे खूप ठिकाणी बोर चे पाणी वापरले जाते त्यामुळे देखील केस गळती खूप मोठ्या प्रमाणात होते. मित्रांनो ह्या सर्वांवर हे पाणी इतके गुणकारी आहे कि तुमच्या सर्व केससंबंधी समस्या ह्यामूळे दूर होतील.

चीनमधील एका संशोधनात असे जाणवून आले कि चीनच्या महिलांचे केस हे सिल्की, चमकदार, व लांब असतात ह्याचे तर ह्याचे रहस्य काय. तेच रहस्य आपण आपल्या आजच्या लेखात सांगणार आहे. मित्रांनो हे पाणी बनवण्यासाठी आपल्याला फक्त लागणार आहे मूठभर तांदूळ. आपण भात लावताना ते तांदूळ धुतले जातात आणि ते धुतलेले पाणी आपण फेकून देतो त्याचा कोणताही वापर आपल्याला माहिती नसेल मात्र मित्रांनो हे पाणी केसांसाठी अत्यंत उपयुक्त असते त्या पाण्याचा परिणाम म्हणून आपली केस गळती थांबते.

हे पण वाचा :-  पायांच्या आखडलेल्या शिरा करा झटक्यात मोकळ्या, कापूर वाडीचा रामबाण उपाय.

ह्या पाण्याचा परिणाम मिळावा म्हणून हे पाणी बनवण्यासाठी आपण एक ग्लास पाण्यात हे मूठभर तांदूळ आपण रात्रभर भिजत घालायचे आहेत आणि सकाळी उठून ते तांदूळ आपण बाजूला करून जे तांदळाचा अर्क उतरलेले पाणी आहे ते पाणी आपण अंघोळ करण्यापूर्वी साधारणपणे अर्धा तास किंवा १५ मिनटे आधी केसांच्या मुळांना लावा व चांगली मालिश करा. त्यानंतर अंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करा त्यावेळी शाम्पू किंवा इतर कोणतेही साबण लावू नये.

महिलांचे केस खूप गुंता होत असतील फक्त आयुर्वेदिक शाम्पू वापरू शकता. हा उपाय आठवड्यातून दोनदा करायचा आहे पुरुषांनी सलग ४ दिवस हा उपाय केला तरी चालेल. हा उपाय सलग २ महिने केल्यानंतर ह्याचे परिणाम दिसून येतील नक्की करून पहा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.