धार्मिक

वरूथीनी एकादशी आज नक्की करा हे १ काम.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या ७ मे रोजी शुक्रवारचा दिवस आणि ह्या दिवशी अली आहे वरूथीनी एकादशी. आज आपण आपल्या लेखात ह्या एकादशीचे माहात्म्य जाणून घेणार आहोत आणि भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करणायसाठी आपण नक्की काय करावे ह्याबद्दल देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो ह्या एकादशीला केले जाणारे व्रत हे मोक्षदायी मानले जाते आणि यमराज यम लोकांच्या भयापासून मुक्त होण्यासाठी लोक ह्या वरूथीनी एकादशीचे व्रत करताना दिसतात.

चैत्र महिन्यापासून नववर्षास सुरवात होते आणि ह्या नववर्षातील कृष्णपक्षातील येणाऱ्या एकादशीस वरूथीनी एकादशी म्हणले जाते. ह्या वरूथीनी एकादशीला भगवान श्री हारींच्या वराह ह्या अवताराचे पूजन करण्याची प्रथा आहे. वरूथीनी हा शब्द संस्कृत भाषेतील वरूथीन ह्या शब्दापासून आला आहे. ह्याचा अर्थ कवच किंवा प्रतिरक्षक म्हणूनच जी व्यक्ती मनोभावे ह्या एकादशीचे व्रत करते त्या व्यक्तीस भगवान श्री हरी विष्णूंचे कवच मिळते संरक्षण मिळते. अशी हिंदू धर्म शास्त्रात मान्यता आहे म्हणून भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करावी आणि विष्णू सहस्त्र नामाचे पठण न चुकता करावे. खूप शुभ फळे आपल्याला प्राप्त होतात.

ह्याचे पठण करणे शक्य नसेल तर आपण विष्णू सहस्त्र नामाचे श्रवन देखील करू शकता. मित्रांनो ह्या दिवशी खूप लोक भगवान श्री विष्णूंच्या दशावताराची कथा ऐकतात. भगवान श्री हरीचें ह्यादिवशी आपण पूजन करावे संकल्प करावा व संपूर्ण दिवसभर आपण फलाहार करून व्रत करावे. यंदाची वरूथीनी एकादशी हि ७ मे ला अली आहे. हि एकादशी हि सर्व प्रकारची पापे नष्ट करणारी आणि सर्वात शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे. जे कोणी ह्या दिवशी हे व्रत करतात त्याला सौभाग्याची प्राप्ती होते.

वरूथीनी एकादशीचे फळ हे १० हजार व्रत करून मिळणाऱ्या फळासमान आहे. ह्याचे व्रत केल्याने मनुष्य ह्या मृत्यू लोकात तर सुख भोगतोच परंतु मृत्यूपश्चात त्याला स्वर्गाची देखील प्राप्ती होते. गंगास्नानाहून देखील श्रेष्ठ फळ ह्या एकादशीच्या व्रत केल्याने मिळते.

तर मीत्रांनो आपण हि ह्या वरूथीनी एकादशीला भगवान श्री हरी विष्णूंचे व्रत अवश्य करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट