वास्तू शास्त्र

वास्तुशास्त्र: घरातून आजच ह्या वस्तू बाहेर काढून टाका नाहीतर घरावर येऊ शकते खूप मोठे संकट.

मित्रांनो वास्तुशास्त्राच्या मते घरात कोणत्या वस्तु घरात ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू घरात ठेऊ नयेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे. एखाद्याला अगदी लहानश्या वस्तूने देखील खूप मोठे संकट अडचणीला सामोरे जावे लागू शकते. लक्षात असूद्यात कि निर्जीव वास्तूत देखील आपली अशी एक ऊर्जा असते. अश्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण घरात ठेवू नयेत. ज्या ठेवल्याने आपले जीवन दुःखी होऊ शकते. काही अगदी बेसिक गोष्टी असतात ज्या घरात नसाव्यात मात्र आपल्या आठवणी त्यात असल्याने त्या ज्या अवस्थेत आहे त्या घरात आपण तश्याच ठेवतो.

तुटलेली फुटलेली काच असूदेत इलेकट्रीक सामान असुदे, किंवा अगदी कुंचा सुद्धा. ह्यामुळे काय होते तर घरात नाकारात्मक ऊर्जा तयार होते आणि व्यक्तीला त्यामुळं मानसिक त्रास झेलावा लागतो. ह्या वस्तूंमुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, ह्यामुळे अश्या ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही. महाभारतातील एखादे चित्र असेल, किंवा एखादे ताजमहालाचे चित्र असेल एखादे जहाज, जंगली जनावराचे चित्र, काटेदार झाडांचे चित्र हे घरात कधीही लावू नये ह्यामुळे आपल्या मनावर वाईट परिणाम होतात. आणि सतत ह्यांना पाहिल्याने नाकारात्मक भाव निर्माण होत असतात.

ज्याने जीवनात चांगले घडणेच बंद होते, मित्रांनो महाभारतातिल चित्रांमुळे घरात कलह निर्माण होतो. ताजमहाल एक कबर असल्यामुळे मानसिकता हि नकारात्मक होते, बुडत असलेले जहाजाचे चित्र लावल्याने आपले सौभाग्य बुडू शकते, जर घरात आपण फवाऱ्याचे चित्र लावले तर आपल्या घरात येणारा पैसा देखील वाहत्या पाण्यासारखा वाहत जातो तसेच जंगली जनावरांचे चित्र लावल्याने घरातील लोकांचे स्वभाव देखील तसे होऊ लागतात. काटेरी झाडे त्यांचे फोटो किंवा पैंटिंग लावल्याने घरात क्लेश निर्माण होतात भांडणे निर्माण होतात.

वाळलेले झाड, पसरलेले घर, उजाडलेले गाव, ह्यासारखी चित्र पैंटिंग्स कलात्मक जरी वाटत असले तरी त्याचा आपल्या वर नाकारात्मक परिणाम होत असतो. बऱ्याच लोकांच्या कपाटात कपड्यांचे गाठोडे असते असे कपडे जे कि लागत नाही किंवा आपल्याला बसत नाहीत असे.

हे पण वाचा :-  घरात ह्या दिशेला खिडकी असल्याने घरात येतो, पैसा धन व आरोग्य.

मग ते आपण टाकून देण्यापेक्षा आपण ते एका कपाटात ठेवतो, फाटक्या चादरी ह्या आपल्याला कधी तरी उपयोगी येतील म्हणून आपण त्या घरात ठेवतो. मात्र ह्यामुळे घरात नाकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशी वस्त्रे दान केली पाहिजेत किंवा इतर कामांसाठी त्याचा उपयोग केला पाहिजे.

लोक घराच्या छतावर भंगार गोळा करून ठेवतात का तर त्याचा उपयोग कश्यासाठी तरी होईल. घरात वेगळी स्टोरेज खोली असेल तर तिथे ठेवा मात्र घर छोटे असेल तर अश्या वस्तू लगेच घरातून बाहेर काढून टाकाव्यात. घरातील भंगार घरात पैस्यांची कमतरता निर्माण करू शकते.

म्हणून घरातील किंवा गच्चीवरील भंगार जे लागणार नाही ते तात्काळ काढणे हे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. ह्यामुळे घरातील पितृदोष देखील उत्पन्न होऊ शकतो म्हणून जितक्या गोष्टी पाळणे आपल्याला शक्य असेल तितक्या गोष्टी आपण पाळाव्यात. जेणेकरून लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव चांगली राहील.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.