सतत डोळ्यातून आणि नाकातून पाणी येणे सर्दी, सारख्या शिंका येणे यावर प्रभावी घरगुती उपाय.
घरगुती उपाय

सतत डोळ्यातून आणि नाकातून पाणी येणे. सर्दी, सारख्या शिंका येणे यावर प्रभावी घरगुती उपाय.

काही व्यक्तीना बाराही महिने सर्दी असते त्याच सोबत व्यक्तींच्या नाकातून आणि डोळ्यातू पाणी येत असते. काहींना सतत शिंका येत असते. यावर आयुर्वेदिक उपाय आपण आज पाहणार आहोत. हा उपाय घरच्या घरी करण्यासारखा आहे. तसेच घरगुती उपाय मुळे आपल्या कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम आपल्याला दिसुन येत नाही.

या उपाया मध्ये तीन ते चार पदार्थ लागणार आहेत. शक्यतो हे सर्व पदार्थ आपण आपल्या घरात ठेवत असतो. आता पर्यंत आपण जितके घरगुती उपाय पहिले आहेत त्या सर्वां मध्ये लागणाऱ्या वस्तू घरीच उपलब्ध असतात. काही वेळेस बाजारातून आणाव्या लागतात. पण त्या वस्तू सहज रित्या दुकानात उपलब्ध असतात.

आजच्या उपायात लागणारे साहित्य खुप सहज रित्या उपलब्ध होणारे आहेत. काही वस्तू तर आपण रोजच्या रोज उपयोगत सुद्धा अंतोत. सर्दीशी संबंधित असणाऱ्या सर्व समस्यांवर हा उपाय खुप कर्गर आहे. नाकातून आणि डोळ्यातू पाणी येणे, नाक चोंदणे अशा सर्व गोष्टी कमी होतात. या साठी जे साहित्य लागणार आहे या बद्दल माहिती जाणून घेऊ.

डोळ्यातून आणि नाकातून पाणी येत असेल तर घरगुती उपयासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. दोन विड्याचे पान, तुळशीचे काही पाने, काळे मिरे, अद्रक आणि एक ग्लास पाणी. या सर्व घटकांचा उपयोग कसा करायचा याबद्दल माहिती जाणून घेऊ.

एक ग्लास पाणी घ्याचे आहे. गॅस वर त्याला उकळण्यासाठी ठेवायचे आहे. त्या सोबत त्यात हे सर्व पदार्थ टाकायचे आहेत. विड्याचे पानांची तुकडे करून टाकायची आहेत, तुळशीचे पाने त्यात टाका, वाळलेले आले बारीक करून किंवा खिसुन त्यात टाकायची अगदी थोडे. त्यनंतर तीन ते चार काळे मिरे. हे सर्व एकत्र मिक्स केल्यावर त्याला चागले उकळू द्याचे आहे.

हे पाणी पाच ते दहा मिनिट उकळू द्या. त्या नंतर गळून घ्या आणि त्यात थोडे गूळ टाकायचे आहे. चागल्या प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानतंर त्याचे सेवन करायचे आहे. दिवसातून दोनदा याचे सेवन करायचे आहे. सकाळी आणि रात्री झोपताना याचे सेवन करायचे आहे. सकाळी नाष्टा करायच्या अर्धा तास आधी आणि रात्री जेवनंतर घ्याचे आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट