स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना काही नियमांचे पालन आपण केले तर त्याचे लाभ आपल्याला नक्की होतात. स्वयंपाक करण्याधी हि एक वस्तू अवश्य गॅस वर ठेवत चला. यामुळे घरात धन धान्याची कमी कधीच पडणार नाही. दरोजच्या कामात थोडा वेळ काढून जर हा उपाय जर केला तर त्याचे लाभ नक्की आपल्याला जाणवतात.
जर हि एका वस्तू तुम्ही स्वयंपाक घरातील गॅस वर स्वयंपाक करण्याधी ठेवली तर माता अन्न पूर्णा देवाचा आशीर्वाद नक्की मिळतो. अशा घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवत नाही. पैसा धन, वैभव, सुख यांची कमरता कधीच कमी पडत नाही. प्रत्येक स्त्रीने एक गोष्ट लक्षात ठेवावी. एक छोटा नियम आहे. स्वयंपाक करण्यापूर्वी एक छोटीशी पोळी किंवा भाकरी तयार करावी आणि ती अग्नी देवाला समर्पित करावी.
म्हणजेच काय तर हि पोळी किंवा भाकरी हि गॅसवर किंवा चुलीवर ठेवावी. या क्रियेला अग्निहोत्र कर्म असे म्हंटले जाते हिंदू धर्मा मध्ये. प्रत्येक घरामध्ये होम हवं करणे शक्य नसते अशा वेळी आपल्या हे कर्म करावे लागते. कारण यामुळे अग्नी देवतेचे उपकार फेडण्यासाठी हे कार्य नक्की करावे. यामुळे अन्नुपूर्ण देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो शिवाय अग्नी देवता सुद्धा प्रसन्न होते.
पण अग्निहोत्री कर्म म्हणजेच सकाळी एक पोळी किंवा भाकरी गॅसवर ठेवण्याआधी काही नियमांचे पालन अवश्य करावे. पहिला नियम असा आहे. अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरात प्रवेश करुनये आणि स्वयंपाक करुनये. तसेच अन्न वाया जाणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी. ताटात आधीही उष्टे अन्न ठेऊ नये. अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी घ्या.
बऱ्याच जणांच्या घरात लोक नेहमी आजारी पडत असतात. त्यामागे अनेक करणे आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा रात्री खरकटी भांडी कधीच बेसिन मध्ये ठेऊ नका. ताटात हात धु नका. तसेच जेवण करताना एकमेकांवरती कधीच क्रोध करू नका. जर एखाद्या घरात एकमेकांशी सारखे मतभेद होत असतील तर एकत्र बसून जेवण करत जावे यामुळे मतभेद कमी होऊ शकतात. आणि ज्या घरात मतभेद कमी असतात त्या घरात माता लक्ष्मी चे आगमन होत जाते.
तसेच रात्री दही खाणे शकतो टाळावे. त्याच सोबत जेवण करताना आपले तोंड हे उत्तर, पूर्व आणि पश्चिम या दिशेला राहील याची काळजी अवश्य घ्यावी. चुकून सुद्धा आपले तोंड जेवण करताना दक्षिणेला असणार नाही याची काळजी घ्या. तसेच जेवण करण्याधी तीन घास हे देवांसाठी काढून ठेवावे. त्याच सोबत आपल्या ताटा भवती थोडे पाणी सोडावे यामुळे आपले पितृ प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




