धावपळीच्या जिवंत आणि आहारामध्ये होणाऱ्या बदलामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होणे सहाजिक आहे.

जर तुम्हला अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपायामुळे तुम्हला आराम मिळू शकेल.

चलातर जाणून घेऊ अ‍ॅसिडिटी कमी करण्याचे घरगुती उपाय.

अ‍ॅसिडिटीचा त्रास नेहमीच होत असेल तर रोज सकाळी एक आवळा खाणे. यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

ओवा खाल्याने सुद्धा अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो; तसेच मळमळ, अपचन, गॅसेस कमी होतात.

गुळाचा वापर करून सुद्धा अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करू शकतात.

विशेष करून जेवणानंतर थोडा गूळ खाणे यामुळे सुद्धा त्रास कमी होतो.

जर तुम्हाला आम्लपित्त झाल्यास रोजच्या  जेवणात जिरे किंवा जिऱ्या पासून तयार झालेल्या पवडरचा उपयोग करा. यामुळे सुद्धा तुम्हला आराम मिळेल. 

अ‍ॅसिडिटी मध्ये पोटाला थंड ठेवण्यासाठी कलिगड किंवा त्याचा रस अवश्य घ्या.

पोटातील जळजळ किंवा पोट दुखत असेल तर थंड दूध घ्या.

बडिशोपचे पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होण्यास मदत होते, शिवाय मळमळ कमी होते. 

हि माहिती सामान्य आणि घरगुती उपायावर आधारित आहे. अवश्य वाटल्यास तज्ञाचा सल्ला घ्या.