लाईफस्टाईल

केसांची वेणी बांधल्याने नेमके काय फायदे होतात, केसांची वेणी बांधावी का घ्या जाणून.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत कि सुंदर घनदाट केसांसाठी आपण आपले केस हे घट्ट बांधायला हवे आहेत का . मित्रांनो वेणी बांधल्याने केस हे लांब व मजबूत होतात असे तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल महिला लांब केसांसाठी ट्रिमिंग, हेअर स्पा, मसाज इत्यादी वेगवगेळे उपाय करतात पंरतु योग्य हेअर स्टईल मुळे सुद्धा केसांची योग्य वाढ होऊ शकते ह्यांची माहिती खूप कमी जणांना असते.

प्रेत्येकाला सुंदर व घनदाट केस हवे आहेत, ह्यासाठी महागडे शाम्पू, हेअर स्पा आणि आणखी काही महागडी ट्रीटमेंट केली जातात. परंतु एवढे सर्व करूनदेखील केसांमध्ये किंचीतसाच फरक जाणवतो ब्युटी पार्लर वरती खर्च करण्याऐवजी साधी आणि सोपी हेअर स्टाईल केल्याने देखील केसांना भरपूर फायदा होतो. लांबसडक केसांसाठी वेणी बांधण्याची सवय लावून घ्या त्यामुळे केसगळती केस तुटणे हे सर्व प्रॉब्लेम्स कमी होतात.

आता वेणी बांधण्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात, तुम्ही लहानपणी आपल्या आज्जीकडून ऐकलं असेलच कि वेणी बांधल्याने केसांची वाढ होते, मात्र खुप लोकांना त्याच्यावर विश्वास नाहीए, वेणी बांधल्याने केसांची वाढ होते असे एका सर्वे मध्ये देखील दिसून आले आहे. वेणी बांधल्याने केस गळती तसेच केस तुटण्याचा त्रास देखील कमी होतो. ह्याशिवाय केसांच्या मुळांवर ताण देखील येत नाही व केसांची वाढ होण्यास मदत होते, ह्यसाठीच मोकळ्या केसांऐवजी वेणी बांधावी.

केसांचा गुंता, केस मोकळे ठेवले कि केसांचा गुंता जास्त होतो, आणि केस जास्त प्रमाणात तुटतात. ह्याशिवाय केस धूळ, दुर्गंध, मातीच्या संपर्कात देखील येतात म्हणून आपले केस कमकुवत होतात परिणामी ते तुटतात. वेणीमुळे केसांचा गुंता कमी होतो, ज्यामुळे केस विंचरताना देखील केस तुटण्याची समस्या राहत नाही. तेल लावून केसांची वेणी बांधावी, रात्री तेल लावून केसांची वेणी घालून झोपणे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरते.

हे पण वाचा :-  १ जानेवारी शनिवार ह्या नंबरची नोट पाकिटात ठेवा, वर्षभर पैस्याची कमी पडणार नाही.

वेणी बांधल्याने टाळूवरती देखील परिणाम होतो, जसे कि तुम्ही जर अतिशय घट्ट वेणी बांधली तर केस गळती देखील होऊ शकते. ह्यालाच ट्रकशन अलोपेशिया असे म्हणतात. म्हणून केसांचे नुकसान टाळण्यासाठी नेहमी सैल वेणी बांधयाला हवी. वेणीमुळे केसांमधील ओलावा टिकून राहतो, केसांना जास्त प्रमाणात पुरेसा पुरवठा होण्यास मदत होते. ह्यसाठी तुम्ही नारळाचं किंवा बदामाचे तेल लावून आपण केसांची वेणी बांधायला हवी.

केसांचा कोरडेपणा कमी होतो, ह्यामुळे केस दुभंगण्याची स्प्लिट एन्ड ची समस्या वेणी बांधल्याने कमी होते. तेल लावून वेणी बांधल्याने जास्त फायदे होतात असे शास्त्रज्ञ सांगतात. ह्यामुळे केसांना पोषक तत्वांचा पुरवठा होऊन कोरड्या केसांची समस्या कमी होते. वेणीमुळे कडक ऊन, माती, धूळ ह्यांपासून केसांचे संरक्षण होते. जर तुम्हाला देखील लांबसडक के हवे असतील तर तुम्ही देखील केस बांधण्यास सुरवात करा पण वेणी घट्ट बांधायची नाही तर ती सैल बांधावी. जेणेकरून केसांचा गुंता होणार नाही व केस तुटणार नाहीत.

मित्रांनो आमच्या आजच्या लेखातील टिप्स तुम्हाला कश्या वाटल्या ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा, तसेच तुम्हाला आणखी कोणत्याही विषयी माहिती हवी असेल तर ते देखील आम्हाला कॉमेंट करून कळवा. तसेच आमच्या आजच्या लेखाला जास्तीत जास्त शेयर करा, धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.