व्हेगन डाएट म्हणजे काय, What exactly is a vegan diet, Vegan Diet
फूड

व्हेगन डाएट म्हणजे नक्की काय. त्याचे फायदे आणि तोटे थोडक्यात जाणून घेऊ.

सध्या बरेच जण आपल्या डाएट वर खुप लक्ष देत असतात. तसेच आहार खाण्याच्या वेळेवर सुद्धा खुप लक्ष देत असतात. त्या बरोबर कोणत्या वेळेस काय खायचे याकडे सुद्धा खुप लक्ष देतात. व्हेगन डाएट (Vegan Diet) बद्दल खुप चर्चा चालू आहे. पण बऱ्याच लोकांना व्हेगन डाएट म्हणजे काय या बद्दल पुरेशी माहिती नाही. तसेच याचे फायदे आणि तोटे काय हे देखील
माहीत नाही. व्हेगन डाएट बद्दल आज थोडी माहिती जाणून घेऊ.

व्हेगन डाएट म्हणजे काय ?

बरेच लोक ज्या पद्धतीचा ट्रेण्ड चालू असतो त्याला फॉलो करतात. त्यामागे काय चागले काय वाईट या कडे काही सुद्धा लक्ष देत नाही. फक्त ट्रेण्ड फॉलो करतात. सध्या व्हेगन डाएट करण्यावर सर्वांचा भर जास्त दिसून येत आहे. काही दिवशी पूर्वी विराट कोहली याने व्हेगन डाएट (Vegan Diet) सुरु केले अशी बातमी दिसून आली. आणि बरेच जण व्हेगन डाएट (Vegan Diet) करायला सुरवात केली.

व्हेगन डाएटचे फायदे, Benefits of Vegan Diet, Vegan Diet

पण नेमके व्हेगन डाएट म्हणजे काय असे कुणाला विचारले तर विविध लोकांचे विविध उत्तर येत असत. काही जनांच्या मते मांसाहारी (non veg) खाणे सोडून देणे. काही लोकांच्या मते फक्त हिरव्या पालेभाज्या खाणे. यापेक्षा सुद्धा वेगळी उत्तरे मिळाली. सध्याचे युग हे ट्रेण्ड फॉलो करण्यावर जास्त भर देताना दिसून येत आहे. एखादया सेलिब्रिटीने नवीन काही केले कि त्याला फॉलो केले जाते.

सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय तर व्हेगन डाएट म्हणजे काय? तर व्हेगन डाएट म्हणजे मांसाहारी पदार्थ खाणे सोडून द्यायचे त्याच सोबत प्राण्यांपासून तयार होणारे इतर पदार्थ सुद्धा खाणे टाळणे. म्हणजे काय तर, दूध, दही ताक, पनीर या सारखे पदार्थ सुद्धा वर्ज करावे लागतात. त्याला आपण व्हेगन डाएट (Vegan Diet) असे म्हणतो. व्हेगन डाएटचे फायदे सुद्धा खुप आहेत तर त्याच सोबत त्याचे तोटे सुद्धा आहेत.

व्हेगन डाएटचे फायदे

व्हेगन डाएटचे फायदे सुद्धा खुप आहेत. बरेच लोक आपले वजन कमी होण्यास मदत झाली आहे असे सुद्धा सांगतात . त्याच सोबत काही लोकांच्या मते दूध आणि त्यापासून तयार झालेले पदार्थ सोडल्यामळे अँसिडीटी: सुद्धा कमी झाल्याचे संगितले आहेत. बऱ्याच सेलिब्रिटीने व्हेगन डाइटची सुरवात केली आहे. आणि त्याचा फायदे सुद्धा होत आहे असे त्यानी संगितले आहे. विराट कोहली, सोनम कपूर, कंगना राणौत या सेलिब्रिटीनि व्हेगन डाएट (Vegan Diet) सुरु केले आहे.

Benefits of Vegan Diet, व्हेगन डाएटचे फायदे, व्हेगन डाएट म्हणजे काय

या व्हेगन डाएट (Vegan Diet) मध्ये आपल्या शरीराला लागणारे प्रथिने, कॅल्शियम, आणि जीवनसत्त्वे (protein, andcalcium, vitamins) हे सर्वप्रकाच्या डाळी आणि पालेभाज्या मधून पूर्ण केल्या जातात. तसेच सोयाबीन सर्वात जास्त प्रमाणत उयोगात आणले जाते. सोयाबीन हा महत्वाचा पदार्थ म्हणून पहिले जाते या डाएट मध्ये. सोयाबीन पासून तयार केलेल्या सोया मिल्कचा वापर हा इतर पदार्थ तयार करण्यासाठी वापतात.

व्हेगन डाएट बदल बऱ्याच आहारतज्ञाचे मतमतांतर आहेत. त्यामुळे ज्या साठी तुम्ही व्हेगन डाएट सुरु करणार आहेत त्यावेळेस आहारतज्ञ यांचा सल्ला घ्या. कोणतेही डाएट सुरु करण्याआधी संपूर्ण माहिती घ्या. शक्य असल्यास आहारतज्ञ यांचा सल्ला घेतल्या शिवाय कोणताही डाएट सुरु करू नका. कारण आपल्या शरीराला कोणत्या प्रकारच्या प्रथिने, कॅल्शियम, आणि जीवनसत्त्वे यांची गरज आहे. याची कल्पना त्यांना लवकर येते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

One Reply to “व्हेगन डाएट म्हणजे नक्की काय. त्याचे फायदे आणि तोटे थोडक्यात जाणून घेऊ.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट