धार्मिक

महिलांनी हनुमान चालीसा वाचल्याने काय होते, त्यांनी ती वाचणे योग्य कि अयोग्य

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपले स्वागत आहे, आपल्या दुःखाचे व अडचणीचीतून बाहेर पाडण्यासाठी आपण हनुमानांकडे पाहतो. हनुमान संधर्भात जे काही उपाय केले जातात ते खूप फळ देणारे असतात, व जास्तीत जास्त फळ देणारे असतात. कारण हनुमान हे चिरंजीव आहेत. त्यांना स्वतः राम भगवंतानी जगाचे कल्याण करण्यासाठी चिरंजीव राहण्याचा आशीर्वाद दिलेला आहे.

हनुमानाच्या पूजेचे जसे तात्काळ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तसेच हनुमान चालीसा पठाणाने देखील लवकर चांगले परिणाम बघायला मिळतात. म्हणूनच बहुतेक व्यक्ती मनोकामना पूर्तीसाठी मनातील भीती घालवण्यासाठी, नाकारात्मक शक्तींपासून बचाव करण्यासाठी हनुमान चालिसचे पठण करतात.

हनुमान चालीसा वाचल्यामुळे आपल्या मनातील भीती नष्ट होऊन आपण धाडसी बनतो, आपल्या अनेक इच्छा हनुमान स्वतः पूर्ण करतात. म्हणून हनुमान चालीसाचे पठण अवश्य करावे. परंतु असे अनेकजण म्हणतात कि स्त्रियांनी हनुमान चालीसाचे पठण करू नये, कारण हनुमान हे ब्रह्मचारी आहेत, त्यांना स्त्रियांची सावली देखील चालत नाही, परंतु हे पूर्णतः सत्य नाही.

आपल्यावरील संकटे, दुःख, बाधा दूर करण्यासाठी कोणीही हनुमान चालीसाचे पठण करू शकते. हनुमानांनी स्वतः अशोक वाटीकामध्ये जाऊन सीता मातेच्या दुःख व कष्टाचे हरण केले होते. त्या साक्षात प्रभू श्री रामांच्या अर्धांगिनी असताना, त्यांचे दुःख दूर केले तर आपण तर साधारण स्त्री आहोत आपले दुःख तर सीता मातेच्या दुःखासमोर काहीच नाही.

म्हणून आपले दुःख देखील हनुमान नक्कीच निवारतील म्हणून हनुमान चालीसाच्या पठण करून आपण हनुमंताची नक्कीच सेवा करू शकतो त्याशिवाय, हनुमान चालीसा मध्ये देखील बोलले आहे कि जो पढे हनुमान चालीसा म्हणजेच जो कोणी हनुमान चालीसा वाचेल मग त्यात स्त्री पुरुष लहान मोठे असा काहीही उल्लेख नाही, म्हणजेच सर्वजण हनुमान चालीसा वाचू शकतात त्यात भेदभाव चा काहीच विषय येत नाही.

असे म्हणतात कि स्त्रिया जन्मतःच धाडसी असतात, आणि हनुमान ब्रह्मचारी असल्याने जर स्त्रियांनी हनुमान चालीसा पठण केल्याने त्यांच्यात पौरोशिय गुण उतरण्याचे शक्यता असते, म्हणून शक्यतो हनुमान चालीसाचे पठण स्त्रियांनी करू नये मात्र आजकाल स्त्रियांनी देखील मागे राहून चालणार नाही त्यांना देखील पुरुषांच्या बरोबरीने यायचेच आहे. मग एका अर्थी चांगलेच आहे कि स्त्रिया जास्त स्ट्रॉंग व धाडसी बनतील. मित्रांनो आजचा लेख तर तुम्हाला आवडलाच असेल तर आमच्या आजच्या लेखाला लाइक व शेयर नक्की करा.

टीप: लेखात दिली गेलेली माहिती हि धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. ह्या मागील कोणती अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट