लाईफस्टाईल

बिटकॉईन म्हणजे नेमकं काय घ्या जाणून सर्व माहिती

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. आज आपण आजच्या लेखात बिटकॉइन बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो बिटकॉइन हि जगातील पहिली क्रीप्टो करन्सी आहे. सध्या जसे आपण १००, ५०० च्या नोटा चलन म्हणून वापरतो तसे बिटकॉइन हे एक चलन आहे. जसे १०० च्या नोटा आपण atm मधून काढू शकतो तसे बिटकॉइन आपण काढू शकत नाही. कारण बिटकॉइन हे चलन डिजिटल आहे.

बिटकॉइन हे चलन २००८ मध्ये सातोशी नाकामोटो ह्यांनी लावला ३१ ऑक्टोबर २००८ मध्ये त्यांनी एका पेपर च्या माध्यमातून बिटकॉइन ची बातमी प्रकाशित केली त्यात त्यांनी त्याची सर्व माहिती दिली होती. २ जानेवारी २००९ मध्ये बिटकॉइन चे सॉफ्टवेअर सर्वांसाठी खुले केले पण सातोशी नाकामोटो हि एक व्यक्ती आहे का अनेक लोकांचा समूह हे अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही.

बिटकॉइन ची एकूण संख्या २१ मिलियन आहे म्हणजेच २ करोड १० लाख मित्रांनो २०१० मध्ये एखाद्या व्यक्तीने १००० रुपये गुंतवले असते तर त्याचे १५ करोड पेक्षा जास्त झाले असते. २०१० मध्ये त्याची किंमत फक्त २.८५ रुपये एवढी होती आणि २०२१ मध्ये ती ४५ लाखांच्या वर. बिटकॉइन विकत घेताना एक आपण अगदी १०० रुपयांची देखील घेऊ शकतो भारतात बिटकॉईन गुंतवणुकीसाठी कायदयशीर आहे. आपल्यापैकी कोणीही बिटकॉईन मध्ये गुंतवणूक करू शकतो. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कि बिटकॉईन कुठून आणि कशे घ्याचे.

मित्रांनो बिटकॉईन सारखे क्रीप्टो करन्सी मध्ये विकत घेण्यासाठी कॉइन स्विच कुबेर अँप वापरू शकता ह्या मध्ये तुम्ही ७५ पेक्षा अधिक क्रीप्टो करन्सी मध्ये गुंतवूणक करू शकता. तुम्ही ह्यामध्ये अगदी सहज सर्व माहिती घेऊन गुंतवणूक करू शकता. नवीन लोकांसाठी हे अँप खूप चांगले आहे. पण मित्रांनो बिटकॉईन मध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला अभ्यास करूनच गुंतवणूक करा.

खरेदी विक्री झाल्यावर त्या व्यवहाराचा तिथे एक ब्लॉक तयार होतो. ह्या सर्व ब्लॉक ची मिळून एक साखळी तयार होते. ह्यालाच ब्लॉकचेन असे म्हणतात हि चेन अगदी गुप्तशीर असते. त्यामुळे सर्व व्यवहार अगदी सुरळीत होतात. जिथे बिटकॉईनच्या सर्व व्यवहाराची नोंद होते त्याला लेजर असे म्हणतात. आणि व्यवहार व्यवस्थित चालले आहेत कि नाही हे जे लोक पाहतात त्यांना मयनर्स असे म्हणतात.

बिटकॉईन मध्ये केलेली गुंतवणूक हि एका डिजिटल वॉल्लेट मध्ये जमा होत असते. जसे आपले पैस्याचे पाकीट असते तसे बिटकॉईन ठेवण्यासाठी डिजिटल पाकीट असते ज्यात आपण आपले बिटकॉईन ठेवू शकता. हे पाकीट अनेक प्रकारचे असते जसे कि कॉम्पुटर, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, लॅपटॉप इत्यादी मद्ये तुम्ही जमा करू शकता. आणि ह्या सर्वाला एक पप्राइवेट कि असते ती वापरल्याशिवाय तुम्ही ते वॉल्लेट उघडू शकत नाही. त्यामुळे बिटकॉईन सुरक्षित मानले जाते.

एका देशातून दुसऱ्या देशात चलन पाठवायचे असेल तर आपल्याला दोन्ही देशांच्या बँकांची मदत घ्यावी लागते मात्र बिटकॉईन मात्र आपण कोणत्याही देशातून दुसऱ्या देशात कोणाचीही मदत न घेता पाठवू शकतो. बिटकॉईन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायला कोणताही शुल्क लागत नाही. ज्या प्रकारे बिटकॉईन अनेक प्रकारे फायदेशीर आहे त्याचप्रकारे बिटकॉईन मध्ये काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

बिटकॉईन चा केलेला व्यवहार परत माघे घेता येत नाही. बिटकॉईन मध्ये कोणतीही बँक किंवा अन्य कोणाची मध्यस्थी नसल्यामुळे आपण चुकीच्या झालेल्या व्यवहारांची कोणाकडेच तक्रार करू शकत नाही. मित्रांनो अशा करतो कि आजच्या लेखातील माहिती तुम्हाला समजली असेल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट