What is Nira
फूड

नीरा म्हणजे काय? नीरा कशी तयार केली जाते..

मित्रानो आपण उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावर निरा विक्री केन्द्र असे बोर्ड बघितले असतील . अनेक लोकांना नीरा म्हणजे दारू असच वाटत असतं . पण नीरा विक्री हे सरकारमान्य आहे तर मग ती दारू कशी असु शकेल. तर आज आपण नीरा म्हणजे काय?,ती कशी तयार केली जाते? हे पुढील प्रमाणे बघुयात आणि आपल्या मनातील शंका दूर करूयात .

नीरा म्हणजे काय?

नीरा हे के मधुर आणि उत्साहवर्धक पेय आहे. हे ताड आणि नारळाच्या झाडाच्या फुलोऱ्यापासून आणि शेंड्यातून मिळणार हा रस आहे. नीरा ला विशिष्ठ स्वाद आणि वास असतो. नीरा हि चवीला गोड असते.निरा ही आपल्याला डिहायड्रेशन पासून वाचवते. उन्हाळ्यात नीरा हि आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते तर नीरा हि पिण्यास योग्य असते. नीरा मध्ये बी १,बी २ , बी १२ आणि क हि जीवनसत्वे असतात आणि नीरा हि गोड असल्यामुळे ती काही काळ ठेवल्यास ती आंबते .

नीरा कशी तयार होते ?

नीरा कशी तयार होते ती ताड आणि नारळाच्या झाडांचे फुलोरे बाहेर पडल्यावर त्या ठिकाणी कोयल्यानी बारीक छिद्र पडलं जात. त्या फुलोऱ्यातून रस येऊ लागतो तो रस म्हणजे नीरा असते, त्या चिद्रखाली मडकं ठेऊन नीरा जमा केली जाते , असं म्हणतात कि नीरा हि दिवसा पेक्षा रात्री नीरा जास्त मिळते. नीरा काढल्यानंतर ती आंबून तिची ताडी बनते. नीरा हि चोवीस तासच चांगली राहते म्हणून काही ठिकाणी म्हणजे तामिळनाडू नीरा काढताना त्या मडक्याच्या आतील बाजूस चुना लावला जातो तर काही जण मडक्याच्या खाली धूर करतात आणि नंतर नीरा जमा झाली कि तो चुना काढून टाकला जातो .नंतर गाळून नीरा हि विकण्यास योग्य असते. नीरा जास्त काळ टिकवण्यासाठी ती काचेच्या बरणीत भरून ठेवली जाते. अशी ठेवल्यास नीरा चोवीस तास चांगली राहते. एका झाडापासून एक लिटर नीरा मिळते. फक्त सात महिन्याचा काळ असतो या काळातच फक्त नीरा काढली जाते. पावसाळ्यात नीरा नसते.

नीरा हि गोड असते त्यात साखरेचे प्रमाण असते त्यामुळे काही तासांनी नीरा आंबते आणि त्या निराचे ताडीत रूपांतर होते आणि ताडी हे मद्य समजले जाते. आणि ताडी ना सरकारी मान्यता नाही. निराचे रूपांतर ताडीत होऊ नये मंहून नीरा विक्री करणार्यांना काळजी घ्यावी लागते. नीरा किती तास ठेवावी याची सूचना दिली जाते. तसेच ज्यांना परवाना असतो त्यांनाच नीरा विक्री करता येते. २०२१मध्ये राज्यसरकारने नीरा हि काढल्या नंतर चोवीस तासाच्या आत ती संपवली जावी नाहीतर नीरा वर प्रक्रियाकरून ती ४ डिग्री किंवा त्या पेक्षा कमी डिग्री तापमानावर ठेवावी लागते.

मित्रांनो इंडियन मेडिकल असोशीएशन ऑफ महाराष्ट्र चे माजी अध्यक्ष डॉ . अविनाश भोंडवे असे म्हणतात कि, नीरा हि पिण्यास योग्य आहे त्यात मिनरल असतात , नीरा हे झाडाच्या रसापासून बनते तसेच त्यात नैसर्गिक घटक असतात . आणि ते शरीराला चांगले असतात.नरा पिल्यास थकवा दुर होतो. पण लक्षात ठेवा बऱ्याचदा त्यात पाणी टाकून दिले जाते. पण एक दोन ग्लास नीरा शरिरासाठी ठीक आहे. पण ती खात्री करू प्यावी.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट