शेअर मार्केट मधील Sensex आणि Nifty म्हणजे काय, What is Sensex and Nifty
अर्थ

शेअर मार्केट मधील Sensex आणि Nifty कसा तयार केला जातो हे माहित आहे का.

सध्या बरेच लोक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत आहे. बऱ्याच जणांना त्यात खुप फायदा आहे, असे त्यांना वाटत असते तर काही जणांना त्यात खुप मोठी जोखीम आहे, असे सुद्धा वाटत असते. सध्या ज्या पद्धतीने शेअर मार्केट खाली वर होत आहे. या वरून असे समजते त्याचा अभ्यास केल्या शिवाय कुठेही गुंतवणूंक करणे म्हणजे वेडे पणा असेल .

शेअर मार्केट मधील Sensex आणि Nifty म्हणजे काय

शेअर मार्केट मध्ये बऱ्याच प्रमाणात तांत्रिक विश्लेषण (technical analysis) करून किंवा गुंतवणूक करण्याधी काही बाबींचा अभ्यास करणे गरजेचे असते. जर का हे तुम्ही हे केले नाही तर तुम्हला बऱ्याच प्रमाणत तोटा होण्याची शक्यता असते. तांत्रिक विश्लेषण (technical analysis) करण्यासाठी त्या आधी काही तांत्रिक शब्दांची किंवा तांत्रिक गोष्टीची माहिती करून घेण्याची गरज आहे.

आपण नेहमीच शेअर मार्केट मधील काही शब्दांचा सातत्याने वाचन किंवा बातम्यात ऐकत असतो, तो म्हणजे सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty). आज सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) वरती आहेत किंवा खाली गेले आहेत या सारख्या बातम्या पहात असतो. पण शेअर मार्केट मधील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहित नाही. आज याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ.

स्टॉक एक्स्चेंज(stock exchange) म्हणजे काय.

भारतात मध्ये दोन प्रकारचे स्टॉक एक्स्चेंज(stock exchange) आहेत. तुम्हला एक्स्चेंजचा अर्थ समजून घ्यावा लागेल. एक्स्चेंज म्हणजे शेअरची देवाण घेवाण करणे होय. पहिला प्रकार म्हणजे बॉंम्बे स्टॉक एक्स्चेंज (Bombay Stock exchange) म्हणजे प्रचलित शब्द आहे BSE आणि दुसरा प्रकार म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (National Stock Exchange) याचा प्रचलित शब्द आहे NSE.

या दोन प्रकारच्या स्टॉक एक्स्चेंज(stock exchange) मध्ये शेअरची देवाण घेवाण केली जाते. शेअरची देवाण घेवाण करण्यासाठी आधी या ठिकाणी काही तांत्रिक बाबी पूर्ण करून कंपनी रजिस्टर केली जाते. या दोन्ही स्टॉक एक्स्चेंज(stock exchange) मध्ये जवळ पास आठ हजार कंपन्या रजिस्टर आहेत. त्यापैकी सर्वात जात कंपन्या या BSE मध्ये रजिस्टर आहेत.

Sensex आणि Nifty म्हणजे काय

जवळ पास आठ हजार इतक्या कंपन्यांचे रोजच्या रोज विश्लेषण (analysis) करणे शक्य नाही. त्या साठी इन्डेक्स् (index) तयार करण्यात आला आहे. भारतात दोन प्रकारचे स्टॉक एक्स्चेंज(stock exchange) असल्यामुळे दोन प्रकारचे इन्डेक्स् (index) आहेत. एक सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty). सेन्सेक्स (Sensex) हा BSE मध्ये वापरला जातो आणि निफ्टी (Nifty) हा NSE वापरला जातो.

इन्डेक्स् (index) तयार करण्यासाठी काही काही तांत्रिक गोष्टीचा वापर केला जातो. सेन्सेक्स (Sensex) चे मोज माप करण्यासाठी BSE मधील सर्वात मोठ्या तीस कंपन्यांची कामगिरी पहिली जाते आणि त्यावरून सेन्सेक्स (Sensex) अप किंवा डाउन आहे हे ठरवले जाते. यामधील तीस कंपन्याची कामगिरी वरून अदलाबदल केली जाते पण तीस पेक्षा जास्त कविता कमी घेतल्या जात नाही.

त्याच प्रमाणे निफ्टी (Nifty) हा इन्डेक्स् (index) आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (national stock exchange) मधला. निफ्टी (Nifty) हा इन्डेक्स् (index) ठरवण्यासाठी काही तांत्रिक गोष्टी पूर्ण केल्यानंतर. पन्नास कंपन्यांची कामगीरी पाहून निफ्टी (Nifty) अप आहे कि डाउन हे ठरविले जाते. या मध्ये पन्नास पेक्षा जास्त किंवा कमी घेतल्या जात नाही. निफ्टी (Nifty) मधील पन्नास कंपन्यांची अदलाबदल केली जाते त्यांच्या कामगिरीवरून.

हे पण वाचा:- मोबाइल चार्ज करताना करू नका या पाच चुका.

शेअर मार्केट मधील सेन्सेक्स (Sensex) निर्मिती १९७८ मध्ये झाली तर निफ्टी (Nifty) ची निर्मिती हि १९९५ मध्ये झाली आहे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट