सरोगसी म्हणजे काय, What is surrogacy
बातम्या

सरोगसी म्हणजे काय? त्याचे नियम काय आहेत थोडक्यात जाणून घ्या.

काही दिवसा पूर्वीच एक बॉलीवुड चित्रपट येऊन गेला तो होता सरोगसी वर आणि त्या पासून बऱ्याच चर्चा सुरु झाल्या. त्याच सोबत बॉलीवुड मधील बऱ्याच सेलिब्रिटीनि सुद्धा सरोगसीचा पर्यायाची निवड केली आहे. सरोगसी म्हणजे काय हा प्रश्न आपल्या सामान्य लोकांना नेहमीच येत असतो. सरोगसी चे नियम काय आहेत या सारखे असंख्य प्रश्न आपल्या समोर येतात.

सरोगसी म्हणजे काय (What is surrogacy?)

सरोगसी म्हणजे काय या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ आणि त्याचे काय नियम असतात याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. सरोगसी मातेसंबंधी काही नियम संगितले गेले आहेत. आणि त्या मुलांच्या आई वडिलांबाबत काही नियम संगितले गेले आहेत. सरोगसी मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत.

सुरवातीला सरोगसी म्हणजे काय आहे हे जाणून घेऊ. अशा काही महिला असतात त्यांना गर्भधारणा करण्यास काही अडचणी येत असतील. तसेच सध्याच्या युगात काही महिलाना करिअर सोडून देणे शक्य होत नाही तसेच मोडलिंग करणाऱ्या महिला या आपल्या फिरगर ला जास्त प्रधान्य देतात. अशा वेळेस या महिलाना सरोगसीचा सर्वात मोठा आधार आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास. सरोगसी म्हणजे दुसऱ्या महिलेचा भाडेतत्वावर गर्भ घेणे. म्हणजे काय तर नवरा बायको मुलाला जन्म देण्यासाठी एका महिलेचा गर्भ भाडेतत्वावर घेतात. या प्रक्रियेला सरोगसी असे म्हणतात. एक महिला दुसऱ्याच्या मुलाला जन्म देण्यासाठी गरोधर रहाते. आणि त्या महिलेस सरोगेट आई (surrogacy mother) असे म्हणतात.

सरोगसी चे प्रकार

सरोगसी चे दोन प्रकार असतात. एक आहे पारंपारिक सरोगसी (Traditional Surrogacy) आणि दुसरा प्रकार आहे गर्भावस्थेतील सरोगसी. पारंपरिक सरोगसी (Traditional Surrogacy) म्हणजे काय तर जो कोणी डोनर असेल किंवा वडील असेल त्यांच्या शुक्राणू सोबत सरोगसी महिलेच्या बीजाणू सोबत जोडले जातात. आणि डॉक्टर कृत्रिमरीत्या शुक्राणू सोरोगेट महिलेच्या गर्भाशयात सोडतात. या नंतर नऊ महिन्यापर्यंत बाळाची वाढ होत असते. सरोगेट आई हि त्या बाळाची फक्त जैविक आई (biological mother) असते. जर का या ठिकाणी डोनरचे शुक्राणू वापरले असतील तरी त्या बाळासोबत त्याचा कोणताही सबंध रहात नाही.

दुसरा प्रकार आहे गर्भावस्थेतील सरोगसी (Gestational Surrogacy) या मध्ये खऱ्या आई वडिलांचे शुक्राणू लॅब मध्ये एकत्र करून सरोगसी महिलेच्या गर्भशयात सोडले जातात. होणाऱ्या बाळावर सरोगेट आईचा कोणताही अधिकार नसतो. सरोगसी गर्भधारणा थोडी किचकट आहे. यामध्ये IVF चा वापर केला जातो. हि पद्धत जास्त प्रचलित सुद्धा आहे.

सरोगसीचे नियम

काही वर्षपूर्वी सरोगसी आई बद्दल काही नियम नव्हते. पण आता भारतात कमर्शियल सरोगसीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सरोगेट आईची फिटनेस टेस्ट सुद्धा केली जते. भारतात याबद्दल काय नियम आहेत. याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोगसीच्या माध्यमातून बाळाचा जन्म झाल्यास त्यावर त्या सोरगेट आईचा कोणताच अधिकार नसतो.

भारतात कमर्शियल सरोगसीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत सरोगसी महिला विवाहित असली पाहिजे त्याच सोबत तिला एक मूल सुद्धा असले पाहिजे. सोरोगसी मातेचे वय हे पंचवीस ते पस्तीस (25 ते 35) असले पाहिजे. जी स्त्री सरोगसी पर्याय निवडणारी असणार आहे. ती त्याच कुटूंबातील असली पाहिजे. त्याच सोबत तिच्या जवळ मानसिक आणि शरीरिक फिटनेस प्रमाण पत्र असणे गरजेचे आहे.

सप्तशृंगी देवीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आणि रहस्य जाणून घ्या.

एका स्त्रीला फक्त एकदा सरोगसी आई होता येते. तसेच कायदेशी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच सरोगसी आई ची वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केली जाते. सरोगसी म्हणजे काय या बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगण्याच्या प्रयत्न केला आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट