लाईफस्टाईल

मूड ऑफ झाल्यावर नेमकं काय करावे, काय खावे करा हे उपाय लगेच मूड चांगला होईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो तुमचा देखील मूड ऑफ असतो का म्हणजेच उदास असल्यासारखे वाटते. आणि कोणी आपल्याला विचारलं कि कारे काय झाले मूड का ऑफ आहे ह्यावर तुम्ही देखील जर माहित नाही असे उत्तर देत असाल तर आजचा लेख खास तुमच्यासाठीच आहे. रोज तेच तेच रुटीन झाले कि कंटाळा येतो त्या दिवशी टीव्ही पाहायला, आवडती गाणी ऐकायला नको वाटते. अगदी झोपायचं झालं तर झोप देखील येत नाही. खार तर ह्यामागे कारणे तर काहीच नसतात.

मन उदास, अस्वस्थ, एकटे एकटे वाटू लागते. रोजच्या रुटीन वाल्या कामात असा थकवा येणे कंटाळा येणे अगदी साहजिक आहे. म्हणूनच अश्या वेळी तुमच्या शरीराला काही हैप्पी हार्मोन्स ची गरज असते आणि आपण ती ओळखायला हवी. काही अन्न पदर्थांमधून आपल्याला हैप्पी हॉर्मोन्स नक्कीच मिळतात म्हणून मूड ऑफ असला कि आपण काय खावे जेणेकरून आपला मूड फ्रेश होईल हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी हे खाण्यातला देखील फार महत्वाचा भाग आहे, पाणी हे रोजच्या रोज मुबलक प्रमाणात पित असाल तर तुमचा मूड फ्रेश राहण्यास मदत होते. उठल्यानंतर पाणी हे योग्य प्रमाणात घ्या अगदी चहा कॉफी घेण्याआधी आपण पाणी प्या त्यानंतर दिवसभरात देखील योग्य प्रमाणात पाणी प्या ह्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते, आणि हैप्पी हॉर्मन्स हे जास्त ऍक्टिव्ह होऊन जातात.

व्हिटॅमिन बी १२ असलेले पदार्थ नक्की खा, हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्य अशी व्हिटॅमिन बी १२ असणारे पदार्थ आपण खाल्याने सुका मेवा, बदाम, अक्रोड, जवस अश्या पदार्थांमध्ये ट्रिप्टोफेन नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ सेरॉटेनिन ह्या पदार्थाचे सिक्रेशन वाढवतो. ह्यामुळे काय होते कि डिप्रेशन ची पातळी कमी होते. ह्यामुळे ह्या पदार्थांचे सेवन आपण सकाळी नाष्ट्यात किंवा दोन जेवणांच्या मध्ये स्नॅक्स मध्ये आपण खाल्ले तर आणखी उत्तम आहे. व्हिटॅमिन सि तुमच्या डाएट मध्ये असूद्यात लिंबू संत्री, आवळा असे व्हिटॅमिन सि जास्त प्रमाणात असलेले पदार्थ आपला मूड रिफ्रेश करण्याचे काम करतात.

ह्यामध्ये वेगवेगळी खनिजे असतात त्यामुळे शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण वाढते त्यामुळे तुम्हाला जास्त आनंदी वाटते, तसेच तुम्ही निरोगी देखील राहतात. तर मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेतले कि जर तुमचा मूड विनाकारण जर ऑफ असेल, तुमची चिडचिड होत असेल तर तुमचा मूड चांगल्या ठेवण्यासाठी आपण वरील सांगितल्याप्रमाणे पदार्थ खाऊन आपला मूड फ्रेश ठेवू शकता. तर मित्रांनो आजचा लेख आवडला असेल तर लेखाला लाइक व शेयर नक्की करा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट