लाईफस्टाईल

कोंडा घालवण्यासाठी तेलात काय मिसळावे, पावसाळ्यात केसातील कोंडा घालवा अश्या पद्दतीने.

मित्रांनो आता पावसाळ्याचा सीजन सुरु झाला आहे आणि ह्यावेळी पाऊस एकवेळी कमी पडेल मात्र आपल्याला (dandruff) कोंडा मात्र भरभरून होतो, बरोबर आहे कि नाही मित्रांनो. त्यामुळे ह्या कोंड्याचा त्रास तुमच्यापासून चार हात लांब राहावा म्हणून आपण आजच्या लेखात खूप छान असा उपाय सांगणार आहोत.

आपण सहसा केस धुण्याआधी तेल लावतो आणि छान केसाला त्या तेलाची चंपी करून घेतो. पंरतु आता मात्र हि तुमची तेलाची मालिश आणखी एका सीक्रेट इन्ग्रेडिअनट्स तेलात मिक्स करून करायची आहे. हा पदार्थ कोणता आहे आणि आपण तेलाची मालिश कश्या पद्दतीने करायची आहे हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत

मित्रांनो आजच्या उपायासाठी सर्वप्रथम आपण एका बाउल मध्ये किंवा वाटीत एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्याचे आहे, त्यानंतर आपण त्या तेलाला थोडेसे गरम करून करून घ्याचे आहे व नंतर आपण त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळायचा आहे. ऑलिव्ह ऑईल व लिंबू ह्यांचे मिश्रण हे अतिशय जबरदस्त असते तुमच्या केसांसाठी हे उत्तम राहणार आहे. तिसरी गोष्ट ह्यामध्ये आपण कडीपत्त्याची पाने आपण त्यात टाकणार आहोत त्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्याचे आहे.

त्यानंतर आपण हे मिश्रण तर बनवून झाले आता हे मिश्रण आपण आपल्या स्कॅल्प ला व्यवस्थित लावायचे आहे, अगदी कोणताही पोर्शन सोडायचा नाही अगदी पूर्ण स्कॅल्प केस व केसांच्या टिप्स असे संपूर्ण केसांना हे मिश्रण आपण लावायचे आहे. अगदी हलक्या हलक्या हाताने आपण आपल्या डोक्याची ह्या मिश्रणाने मसाज करायची आहे. मसाज आपण साधारणपणे ५ ते ७ मिनटे आपण करू शकता.

मसाज झाल्यानंतर आपण एक तास आपण ते मिश्रण डोक्याला तसेच केसांना तसेच राहून द्याचे आहे, व नंतर आपण आपले केस कोणत्याही माईल्ड शाम्पू ने धुवून घ्याचे आहेत. आणि त्यानंतर आपण आपल्या केसांना कंडिशनर देखील लावा, व केस स्वच्छ धुवून घ्याचे आहे. हे असे ऑईल आहे ते आपण आठवड्यातून एकदा लावू शकता. तुम्हाला ह्याचे खूप छान परिणाम तुम्हाला दिसून येतील.

तुम्हाला जर अगोदरच कोंडा झालेला असेल तर तो ट्रीट होण्यासाठी देखील मदत होईल आणि पावसाळ्यात सहसा लोकांना हि समस्या होतेच म्हणून कोंडा होऊ नये म्हणून देखील हा उपाय खूप महत्वाचा आहे. आपण आपल्या आजच्या उपयोत तेल हे ऑलिव्ह ऑईल घेण्यास सांगितले होते त्याऐवजी तुम्ही घरातील खोबरेल तेल जरी वापरले तरी चालेल. तुम्ही हे ऑईल बनवून नक्की वापरा आणि आम्हाला हा उपाय कसा वाटला तुमचे रिस्ल्ट्स आम्हाला नक्की कंमेंट करून कळवा.

तसेच आजचा लेख तर तुम्हाला आवडला असेलच तर तो तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेयर करा, धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट