Whatever happened was for the better.
लाईफस्टाईल

जे होते ते चांगल्यासाठी होते.

आपल्या जीवनात अशा काही घटना घडत असतात त्यामुळे आपले मन खुप दुखी होते. तसेच पण नेहमी म्हणत असतो कि असे का आपल्या सोबत झाले. काही गोष्टी अशा असतात कि जर त्या आपल्या सोबत झाल्या नसत्या तर त्या पेशा खुप मोठी दुखत घटना आपल्या आयुष्यात घडली असती. त्यामुळे आपण काही वेळेस असे बोलतो कि जे झाले ते चागले झाले. आयुष्यात अशा काही घटना असता कि त्या एकमेकान जोडलेल्या असतात. पण ते आपल्या लोकर समजत नाही.

काही वाईट गोष्टी आपल्या सोबत घडल्या नंतर आपण खुप विचार करत असतो. असे आपल्या सोबत का घडले आपण तर कोणाचे वोईट चिंतन करत नाही. कॊणाला वाईट बोलत नाही तरी सुद्धा आपले सारखे वाईट होत जाते. आपण देवाची आराधना करतो रोज सकाळी उठल्यावर देवाची पूजा केल्या शिवाय बाहेर जात नाही. या सर्व गोष्टी आपण करत असलो तरी आपल्या सोबत नेहमी वाईट का होते. त्याच बरोबर जे लोक देवांनी आराधना करत नाही, कोणासोबत नीट बोलत नाही तरी सुद्धा त्याचे सर्व काही चागले होत जाते. त्या लोकांना कोणत्याही अडचणी येत नाही.

जे व्यक्ती सर्व अडचणीत आहेत अशा लोकांना आपण मदत करत असतो तरी सुद्धा आपल्या जिवंत वाईट गोष्टी होत जातात. नेहमीच सुख कमी आणि दुःख जास्त असे का होते हे काही लोकर आपल्याला समजत नाही. मित्रांनो भगवान जे काही करतात ते आपल्या भल्या साठीच करतात. आज जरी आपल्यावर वाईट दिवस आले असलेतरी भविष्यात आपल्याला काही चागल्या गोष्टी मिळणार आहेत किंवा आपल्या सुखाचा किंवा आनंदाचा काळ आपल्या आयुष्यात आल्या शिवाय राहणार नाही यात शंखा नाही.

आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनेकडे आपण नेहमी सकारात्मक विचाराने पाहिलेतर प्रत्येक समस्यावर आपल्या उत्तर मिळाल्या शिवाय राहणार नाही. एखादी वाईट गोष्ट आपल्या जीवनात घडली तरी आपण त्या गोष्टी कडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून पहिले तर त्याचे उत्तर हे नेहमी चागले येते. एक बिरबल आणि अकबर याची अशीच एक चागली गोष्ट आहे. त्यात बिरबल वाईट झाल्यानंतर सुद्धा त्या कडे एका चागल्या दृष्टिकोनातू पहातो आणि त्याचे चागले होते.

हे पण वाचा :-  केसांची वेणी बांधल्याने नेमके काय फायदे होतात, केसांची वेणी बांधावी का घ्या जाणून.

हि गोष्ट अशी आहे कि अकबर आणि बिरबल एकदा जंगलातून जात असताना अकबर राज्याला त्याच्या बोटांना इजा होते आणि त्यातून रक्त बाहेर येते. आणि अकबरला त्रास होत असतो. तितक्यात बिरबल म्हणतो जे झाले ते चागले झाले. असे वाक्य ऐकल्यावर राज्यला राग येतो आणि सेवकांना सागून बिरबल याला कैद करून जेल मध्ये टाकण्यास सागतो. काही वेळानी जंगलातील आदिवासी राज्याला कैद करून घेऊन जातात आणि त्यांची पूजा झल्यावर राज्याला बळी देणार असतात. पण त्याच्या बोटाना झालेल्या इजा मुळे त्याला सोडून देतात.

अकबर त्या जागेवरून लगेच ज्या ठिकाणी बिरबल ला कैद केले आहे त्या ठिकाणी जातो आणि त्याला सोडायला सांगतो. त्या वेळेस बिरबल पुन्हा म्हणतो जे झाले चागले झाले . अशा वेळी रजा म्हणतो मी तर तुला शिक्षा केली होती हे कसे चागले झाले. बिरबल म्हणतो जर का तुम्ही मला कैद केले नसते तर आदिवासीनी माझा बळी दिला असता. त्या मुळे प्रत्येक गोष्टी कडे किंवा घटनेकडे आपण जर सकारात्मक दृष्टिकोनातून पहिले तर आपल्याला न जमणारे काम सुद्धा सहज रित्या जमते. त्यामुळे वाईट गोष्टींचा विचार करत बसून का. भविष्यात आपल्या सोबत चागले घडणार आहे. असे विचार करून चागले काम करत चला. जे होते ते चांगल्यासाठी होते.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.