टाटा हे नावच खुप मोठ आहे. कितीतरी कंपन्या या एका नावात सामावल्या आहेत. शंभर पेक्षा जास्त कंपन्या याच नावाखाली काम करतात. प्रत्येक क्षेत्रात हि कंपनी कार्य करते. काही वेळेस असे सुदाह बोलणे वागवे ठरणार नाही. कि सुई ते विमान बनवायचे काम हा टाटा समूह करतो. फक्तच फायदा हा दृष्टिकोन न ठेवतात. समाज कार्यात सुद्धा हा समूह प्रत्येक वेळेस पुढे असतो.
टाटा कंपनी प्रत्येक वर्षी साठ हजार करोड पेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरते. तसेच कंपनीला झालेल्या फायद्या पैकी बराच भाग हा समाज कार्या साठी वापरला जातो. तसेच गेल्या वर्षी टाटानि देशाच्या मदती साठी पंधराशे करोड रुपय दिले होते. प्रत्येक वेळेस देशाच्या मदती साठी सर्वात पुढे असणाऱ्या टाटा समूहाचे प्रमुख असलेले रतन टाटा.
काही दिवसा पूर्वी त्यांनी आपला वाढदिवस हा खुप साध्या पद्धतीने साजरा केला. एक छोटासा केक आणि एकच मेणबत्ती आणि त्याच्या सोबत त्यांचा एक मित्र . इतक्या सध्या पद्धतीने साजरा केला. सर्वाना या बदल नवल वाटलेच त्याच सोबत सर्वाना एकच प्रश्न येत होता तो म्हणजे हा सर्वांत तरुण मुलगा कोण आहे जो नेहमी रतन टाटा सोबत असतो.
शंतनू हा एकटाच आहे त्यांच्या परिवारातील जो टाटांच्या सोबत काम करत आहे. टाटा एलक्ससी (tata elxsi) मध्ये काम करत असताना त्याला काही वेळेस रात्री उशिरा पर्यंत काम करावे लागत असे. आणि रात्री उशिरा घरी जाताना काही वेळेस बऱ्याच कुत्र्याचे अपघात होऊन मृत्यू झालेला असायचा. कित्येक वेळेस कुत्र्यांना दुखापत होत असे. हे पाहून त्याला नेहमी वाईट वाटत असे.
कुत्र्यांचे अपघात का होतात या बदल त्यांनी माहिती गोळा करण्याचे ठरवले. ज्या वेळेस त्याच्या जवळ माहिती तयार झाली, त्याच्या लक्षात आले कि रात्रीच्या वेळेस रस्ता ओलंडताना कुत्रे कार चालकाला दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे अपघात आहोत आहे. हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने रात्रीच्या वेळेस चमकणारे पट्टे त्याने तयार केले आणि ते कुत्र्यांच्या गळ्यात बांधण्यास सुरवात केली.
या साठी त्याने आपल्या मित्रांसोबत एक कंपनी सुरु केली त्याचे नाव आहे. मोटोपावस (motopaws) या मध्ये ते सर्व पट्टे तयार करायचे. रात्री चमकणारे पट्टे तयार करून ते कुत्र्यांना बांधायचे जेणे करून कार चालकाला कुत्री रात्रिच्या वेळेस दिसत असे आणि अपघात होत नसे. या बददलीची माहिती टाटा समूहाच्या ब्लॉग मध्ये प्रसिद्ध झाली. हि माहिती वाचून रतन टाटा यांनी शंतनू नायडू ला भेटण्यासाठी बोलवले. आणि त्याच्या कामा बददलीची माहिती जाणून घेतली.
रतन टाटा याना शंतनू यांचे काम खुप आवडले. आणि रतन टाटा यांनी त्यांच्या कंपनी साठी निधी द्याचे ठरवले जेणेकरून भटक्या कुत्र्यांचे जीव वाचतील. आणि या कामा साठीच त्यांची सातत्याने भेट होत गेली. यामुळेच त्यांच्या मैत्री तयार झाली. त्याच काळात तो पुढील शिक्षणा साठी विदेशात गेला आणि त्याच्या पदवी समारंभात स्वतः रतन टाटा उपस्थित होते.
शंतनू वापस भारतात आल्यावर त्याने रतन टाटा सोबत काम सुरू केले सध्या तो रतन टाटा यांचा व्यवसाय सहाय्यक (business assistant) म्हणून काम करत आहे. त्याच सोबत देशातील नवीन स्टार्टअप (new startup) कंपन्यासाठी मूलभूत गोष्टी कोणत्या असायला हव्यात तसेच त्यांना लागणारी मद्दत कशी करायची याबद्दल सुद्धा काम करत असतात.
या सोबत शंतनू आणि रतन टाटा यांनी मिळून एक कंपनी सुरू केली आहे जी वुद्ध लोकांसाठी काम करते. तरुण आणि वुद्ध यांच्यातले अंतर कशे कमी करता येईल यावर सुद्धा ते काम करतात. हि माहिती कशी वाटली या बद्दल आम्हला नक्की सागा.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




